घरातील चप्पल, बूट या दिशेला ठेवला तर घरी दारिद्र्य आणतात…
नमस्कार मित्रांनो,
आपल्या जीवनात वास्तू शास्त्राचे फार महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार कोणती वस्तू कोठे ठेवल्याने त्याचा आपल्या जीवनावर शुभ प्रभाव पडतो. कोणत्या वस्तूची दिशा अयोग्य असल्यास त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
वास्तुशास्त्रामध्ये अशा कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत
ज्याद्वारे आपण आपल्या सर्व दैनंदिन समस्यांपासून सुटका मिळवू शकतो. यासाठी आपल्याला वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करावे लागते.
वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करून जर आपण आपल्या घराची रचना केली तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आपल्या घरात सुखी संपदा येईल. वापरात असलेले चपला बूट नेहमी योग्य दिशेला असणे आवश्यक आहे.
वापरात नसलेले चपला बूट तसेच ठेऊ नयेत. जर ते चांगले असतील तर गरिबांना देऊन टाकावेत नाहीतर टाकून द्यावेत. घरात तसेच पडू देऊ नयेत. जुने चपला बूट तसेच ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
आणि आपल्या घरावर एकामागून एक संकटे येत राहतात. तुटलेल्या चपला बूट ठेवल्यास शनी देवही आपल्यावर क्रोधीत होतात. आपल्या आरोग्यासाठी आपले घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके असणे आवश्यक आहे.
अस्वच्छतेमुळे आपल्या आरोग्यावर तर त्याचा दूष प्रभाव जाणवतोच. परंतु आपल्या आर्थिक स्थितीवरही याचा विपरीत प्रभाव पडतो. चपला बुटा संबंधित काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टीकडे आपण लक्ष्य दिल्यास बहुतेक संकटापासून आपली सुटका होऊ शकते.
आपण जर बाहेरून आलो तर आपले चपला बूट हे घराबाहेरच काढावेत. घरात आणू नयेत. यामुळे बाहेरची धूळ, माती, नकारात्मकता ऊर्जा घरात येत नाही व घरही स्वच्छ व नीटनेटके राहते. घरात चपला बूट व्यवस्थित एकठिकाणी रचून ठेवावे.
घरातील सर्व सदस्यांनी अशी सवय लावून घ्यावी. ज्या घरांमध्ये चपला बूट इथे तिथे पसरलेले असतात अशा घरांमध्ये शनी दोष निर्माण होतो व शनी देवांचा अशुभ प्रभाव दिसू लागतो.
शनी देवांना पायांचे कारक मानले जाते. म्हणून पायाशी संबंधित कोणत्याही वस्तूला स्वच्छ व नीटनेटकेपणानेच ठेवावे. कधीही कोणाला चपला बूट भेट म्हणून देऊ नयेत. नाहीतर त्याचे दुर्भाग्य आपल्या भाग्याचा नाश करते.
वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तेथे नेहमी आर्थिक अडचण व पैशांची चणचण राहते. ज्यावेळी आपण बाहेर जातो त्यावेळी बाहेरची धूळ, माती आपल्या चपला बुटाना लागून आपल्या घरी येते.
बहुतेक व्यक्ती घरात चपला बूट वापरताना दिसतात. परंतु हे खूप चुकीचे आहे. कारण आपल्या घरातील बहुतेक जागा ही भगवंतांशी संबंधित असते. जसे ईशान्य दिशा भगवंत, किचन अन्नपूर्णा माता, तिजोरी देवी लक्ष्मी, जल देवता, अग्नि देवता असे विविध प्रकारांनी भगवंतांचे वास्तव्य आपल्या घरात असते.
आणि अशा भगवंतांच्या ठिकाणी चपला बूट घालून जाणे अगदी अयोग्य आहे. याचा आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो. तसेच जर कोणी चपला बूट घालून घरात प्रवेश केला तर राहू व केतू ग्रह ही त्यांच्या घरात प्रवेश करतात.
म्हणूनच घरात प्रवेश करताना चपला बूट सर्वात आधी बाहेर काढावेत आणि मगच घरात प्रवेश करावा. यामुळे आपल्या कार्यात अडचणी व बाधा येणार नाहीत. चपला बूट नेहमी सरळ ठेवावेत. चपला बूट उलटे ठेवल्यास त्यांचा आपल्यावर अशुभ प्रभाव पडतो.
चपला बुटाना देवघर किंवा स्वयंपाक घरांच्या आसपास अजिबात ठेऊ नये. देवघर किंवा स्वयंपाक घरांच्या भिंतीला लागूनही चपला बूट कधीही ठेऊ नये. हे तर अशुभ आहेच त्याशिवाय यामुळे आपल्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होतो.
चपला बूट घराबाहेर अशा स्थानी ठेवावे जेथून नकारात्मकता व अस्वच्छता आपल्या संपूर्ण घरात पसरू नये.चपला बूट नेहमी व्यवस्थित मांडूनच ठेवावे. इतरत्र विखुरलेल्या चपला बूटामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.
चपल स्टँड ठेवताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की मुख्य दारापासून 2 ते 3 फूट अंतरावर चपल स्टँड असावा.
चपला बूट चपल स्टँडमध्ये ठेवताना अशा प्रकारे ठेवावेत
की बाहेर दिसणार नाहीत. चपला बूट व्यवस्थित आत ठेऊन व्यवस्थित दार लावावे.
मुख्य दारापासून देवी लक्ष्मी व गणपती बाप्पाचे घरात आगमन होते आणि जर चपला बूट व्यवस्थित झाकलेले असतील तर घरात सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करीत राहते. चपल स्टँड ठेवण्यासाठी पश्चिम दिशाही योग्य दिशा आहे.
तसेच दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य दिशा ही चपल स्टँड ठेवण्यासाठी योग्य दिशा मानली जाते. म्हणून या दिशानाच आपला चपल स्टँड ठेवावा. चपल स्टँड कधीही पूर्व, उत्तर, अग्नेय किंवा ईशान्य या कोपऱ्यात असू नये.
या दिशांमध्ये चपल स्टँड ठेवल्यास घरात नकारात्मकता
पसरते आणि घरावर एका मागोमागून एक संकटे येत राहतात. बेडरूममध्येही चपला बूट कधीही ठेऊ नयेत.
यामुळे पतिपत्नीमध्ये वादविवाद होत राहतात. मित्रांनो आपल्या लक्षात आलेच असेल चपल स्टँड घरात नेमका कोणत्या दिशेला ठेवावा तो.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.