फक्त अर्धा लिंबू चा असा करा वापर घरातील कोळी, किडे 2 मिनिटात लावेल; कोणीही सांगणार नाही हा भन्नाट उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माणूस हा स्वच्छता प्रिय प्राणी आहे. त्याला सर्व गोष्टी स्वच्छ व जागच्या जागी हव्या असतात. मात्र घराची तुम्ही कितीही साफसफाई करत असले तरीही घरामध्ये कोळी हे जाळे विणल्याशिवाय अजिबात राहत नाही आणि जास्त करून छताला आणि कोपऱ्यामध्ये भिंतीला आणि ज्या ठिकाणी तुमचा वावर कमी आहे, अशा ठिकाणी तर खूप हे कोळी किडे जाळी विणत असतात.
लहान मुले देखील कोळ्यांना घाबरतात. कितीही तुम्ही साफसफाई केली तरी प्रत्येक घरामध्ये ही समस्या निश्चितच असते. आणि जर तुमचं घर दोन-तीन दिवस बंद असेल तर ही समस्या तर अजूनच जाणवते. आणि तुम्ही जर सात-आठ दिवस बाहेर असाल तुम्ही कुठे बाहेर गावी गेला असाल तर तुम्हाला घर उघडायची देखील भिती वाटते एवढ्या प्रमाणावर हे कोळी जाळून ठेवतात. तर मी आज तुम्हाला असाच एक जबरदस्त मस्त आणि स्वस्त उपाय सांगणार आहे.
ज्याचा एक वेळेस जरी तुम्ही वापर केला तरी तुम्हाला सहा महिने तुमच्या घरात एकही कोळी किडा जाळे विणताना दिसणार नाही. हा उपाय इतका सोपा आहे की कोणी ही हा करु शकते. घरामध्ये जर कोळ्यांचे जाळे झाले असतील तरी घरामध्ये अतिशय वाईट दिसतं. घर आपल्याला व्यवस्थित दिसत नाही या जाळीवर नंतर धूळ साठते. आणि ते दिसायला एकदम खराब दिसत. या किल्ल्याची सुद्धा भीती वाटते म्हणून हे जाळे घरात होऊ नये किंवा झाले असतील तरी हे कोळी आपल्या घरातून निघून जावे, यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे.
तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतो एक लिंबू. लिंबू हे एक आयुर्वेदीक गुणधर्म असलेलं फळ आहे. या लिंबाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. लिंबाचा रस पिल्याने आपल्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. सोबतच पित्ता साठी देखील लिंबाचा वापर केला जातो. तीखट कमी लागण्यासाठी देखील लिंबाचा वापर केला जातो. व याच लिंबाच्या मदतीने आपण या कोळ्यांना आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहे. याचा वापर असा करायचा आहे की एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्याचा रस काढायचा आहे, आणि एक लिटर पाण्यामध्ये तो टाकायचा आहे.
आणि असे हे कोळी किडे घराच्या कोपऱ्यांमध्ये किंवा ज्या ठिकाणी चीर पडलेली आहे अशा ठिकाणी असतात. तर अशा ठिकाणी हे लिंबूचे पाणी स्प्रे करायचे आहे. आपल्याला माहित आहे कि लिंबूला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो आणि त्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं. लिंबू हा सायट्रिक ऍसिड चा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे आणि या लिंबामध्ये जो वास असतो आणि जो सायट्रिक ऍसिड असतो त्यामुळे, कोळ्याच्या अंगातून येणाऱ्या जो दोऱ्यासारखा भाग असतो ज्याला आपण जाळे असे म्हणतो.
तो अजिबात बाहेर निघत नाही. याचा वास कोळ्याला अजिबात आवडत नाही शिवाय सायट्रिक ऍसिड मुळे कोळी त्या ठिकाणी अजिबात थांबत नाहीत. सायट्रिक ऍसिड ची चव त्यांना अजिबात आवडत नाही. आणि ज्या ठिकाणी तुम्ही हे स्प्रे केले आहे त्या ठिकाणी हा वास सहा महिन्यापर्यंत तसाच राहतो. आणि त्या ठिकाणी हे कोळी किडे अजिबात येत नाही आणि त्या ठिकाणी जाळी बनवत नाही म्हणून सहा महिन्यातून एकदा ज्या ठिकाणी भिंतीला चिर पडली आहे.
आणि कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे लिंबू पाणी स्प्रे करायचे आहे. आणि त्यानंतर हे कोळी किडे तुमच्या घरांमध्ये अजिबात येणार नाही आणि आधीच असतील तर या वासाने ते निघून जातील. हा उपाय पूर्णात: नैसर्गिक आहे याचा कोणता ही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही म्हणूनच बिनधास्त आमचा हा उपाय करा व बघाच खर आहे की नाही मित्रांनो कोळी किडे घरातून बाहेर काढण्याचा हा अत्यंत सोपा उपाय.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.