काळा पडलेला, कीड लागलेला दात वाचवायचा असेल तर दातावर एकदा हे लावाच; 10 सेकंदात दातदुखी बंद होईल.!

काळा पडलेला, कीड लागलेला दात वाचवायचा असेल तर दातावर एकदा हे लावाच; 10 सेकंदात दातदुखी बंद होईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवाचे सर्व अवयव हे महत्वाचे असतात. ज्या भागाने आपण अन्न ग्रहण करतो ते ही सर्व भाग निरोगी असणे गरजेचे आहे. आज आपण बोलणार आहोत ते आपल्या दातांबद्दल. आपले दात म्हणजे मुखगुहेत असलेली लहान व कठीण ऊतींची संरचना. अन्नाचे तुकडे करण्यासाठी आणि चर्वण करण्यासाठी दातांचा उपयोग होतो. काही प्राण्यांमध्ये मुख्यतः मां’साहरी भक्ष्य पकडण्यासाठी किंवा संरक्षणासाठी दातांचा उपयोग होतो.

आहारानुसार व उपयोगानुसार वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये दातांचा आकार, संरचना, संख्या आणि जबड्याला असलेली जोडणी यांत विविधता आढळते. मानवाचे दात असमदंती असून त्यांच्या दाताचे तीन भाग पडतात पहिला म्हणजे किरीट बाहेरील भाग नंतर दंतमूळ, हे जबड्याच्या हाडात रुतून बसलेले असते व मान म्हणजे हिरडीलगतचा आकुंचलेला भाग.

आपले दात तीन स्तरांनी बनलेले असतात. दंतिन, ज्यापासून पूर्ण दात बनलेला असतो; कठीण एनॅमल म्हणजे किरिटाच्या दंतिनावरील आवरण मग दंतमज्जा, ही संयोजी ऊतींनी बनलेली असून तीत चेता आणि रक्तवाहिन्या असतात. दातांमध्ये या रक्तवाहिन्या आणि चेता दंतमुळाच्या टोकाशी असलेल्या रंध्रांवाटे आत शिरतात.

दातांच्या किरिटावरील आवरण म्हणजेच एनॅमल अत्यंत कठीण असते. दंतमूळ हाडासारख्या भासणाऱ्या पदार्थाने बनलेले असून या पदार्थाला संधानक म्हणतात. दंतमूळ जबड्याच्या हाडाच्या खोबणीत रुतून बसलेले असते, येथे संधानकालगत परिदंत आवरण असते. हे आवरण तलम संयोजी ऊतींच्या तंतूंनी बनलेले असते. त्याने दात हिरड्यांना जोडलेले असतात.

मात्र कधी कधी तुमच्या या महत्वाच्या दातांना कीड लागू शकते. यांना कीड का लागते दातांना कीड लागणं हा तोंडामधील जीवाणुंमुळे होणारा आजार आहे. तोंडात असलेले जीवाणू दातांवर साचून राहिलेल्या अन्नकणांमधील साखरेवर प्रक्रिया करून आम्ल तयार करतात आणि या आम्लामुळे दातांच्या पृष्ठभागावरचं आवरण विरघळायला सुरुवात होते.

ही प्रक्रिया हळूहळू पण सतत सुरू राहते. या आवरणाला पडलेल्या छिद्रामध्ये अजून अन्नकण अडकतात. अधिकाधिक जीवाणू आम्ल हल्ला सुरू ठेवतात. छिद्र वाढत राहतं. दातांचा पृष्ठभाग पोखरला जातो आणि मग दाताला मोठा खड्डा पडतो. त्यालाच कॅव्हिटी म्हणतात. ही कॅव्हिटी आकाराने लहान असतानाच ती दंत चिकित्सकाकडून भरून घेणं उत्तम. दाताला एकदा छिद्र पडलं की ते आपोआप भरून येऊ शकत नाही. कारण दाताला पुनरुत्पादन क्षमता नसते. पण दातात दुखत नसल्यानं त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. मित्रांनो पण घाबरण्याचे काहिच कारण नाही आज आम्ही तुमच्या साठी नैसर्गिक व सोपा उपाय घेऊन आलो आहोत हा उपाय जाणून घेण्यासाठी हा लेख पुढे वाचा.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक वडाच्या पानाचा चिक व मीठ. वडाच्या झाडाच्या पानाचा चिक हा आयुर्वेदातील एक महत्वाचा घटक आहे. हा चिक अनेक औषधांमध्ये वापरला जातो. अगदी पुरातन काळापासून या वडाच्या झाडाच्या पानाचा चिक आयुर्वेदीक औषधी बनवण्यासाठी केला जात आला आहे. घरातील अन्नाला चव देण्याचे काम हे मीठ करते सोबतच आपल्या घरातील मीठ सुद्धा दात दुखिवर उत्तम उपाय आहे. सोबतच मीठ आपल्या हिरड्यांवर मीठ चोळल्याने हिरड्या मजबूत होतात.

हा उपाय करण्यासाठी वडाच्या पानाचा चिक व मीठ यांना एकत्रित करुन यांचे मिश्रण करायचे व जिथे आपल्या कीड लागलेल्या दातातील भागावर लावा अगदी अर्ध्या तासात तुमच्या वेदना कमी होण्यास सुरवात होईल सोबतच हा उपाय बनवणे अत्यंत सोपा व निर्धोक आहे. आम्ही सांगितलेल हा उपाय करुन नक्की पहा दात दुखी असो किंवा हिरड्यांचा त्रास त्वरित कमी होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *