तुमचे घर दक्षिण दिशेला असेल तर हे उपाय एकदा नक्की कराच.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वास्तुशास्त्र मध्ये दक्षिण दिशेला असलेले घर काही परिस्थिती वगळता अशुभ व नकारात्मक मानले जाते याशिवाय दक्षिणमुखी असलेल्या घरांना काही उपाय करून त्यातील दोष दूर केले जाऊ शकतात. या परिस्थिती नेमक्या कोणत्या आहेत व दोष करण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत. हे आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
दक्षिणेकडे घर असेल तर काय होते हे आधी आपण पाहू या. पूर्वेला सूर्य ,आग्नेय ला शुक्र दक्षिणा मंगळ, नैऋत्येला केतु ,पश्चिमेला शनि , वायव्येला चंद्र , उत्तरेला बुध ईशान्येला बृहस्पति चा प्रभाव असतो. वास्तुशास्त्रामध्ये मध्ये दक्षिण दिशेला असलेले दार अशुभ मानले गेले आहे, यालाच संकटाचे दार असेसुद्धा म्हणतात.
जर आपले सुद्धा घर दक्षिण दिशेला असून दूषित आहे तर घरातील मालकाला त्रास होतो. भावंडांमध्ये राग, द्वेष ,भांडण, कटुता इत्यादी निर्माण होत असते. त्याच बरोबर अपघात होऊनही कुष्ठरोग ,प्लेग कावीळ नेहमी हजार पण इत्यादी समस्या निर्माण होत राहतात. या दिशेला घर असल्याने अकाली मृत्यूचे सुद्धा योग बनतात.
दक्षिण दिशेला असलेले दक्षिण दोष कसे ओळखावे हे सांगणे कधीकधी कठीण होऊन बसते. दक्षिण दिशेच्या घरासमोर घराच्या आकारापेक्षा लांब जर कडुनिंबाचे झाड असेल तर दक्षिण दिशेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होतो.
याशिवाय दारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे. दक्षिण मुखी असलेल्या भूखंड मध्ये मुख्य दार अग्नेय कोनामध्ये बनलेले आहे तसेच उत्तरेकडे आणि पूर्वेकडे जास्त आणि पश्चिमेकडे कमीत कमी मोकळी जागा सोडलेली असेल तरी दक्षिण दिशेचे दोष कमी होतात.
बागेत लहान रोपटे पूर्व ईशान्य दिशेला लावल्याने दक्षिण दोष कमी होतात. अग्नी कोनातील मुख्य दार लाल किंवा तांबड्या रंगाचे आहे तर हे चांगले फळ देते याशिवाय हिरवा किंवा तपकिरी रंगाची निवड सुद्धा तुम्ही करू शकता. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही दिशेला दार असेल तर दरवाजाला काळा व निळा रंग देऊ नये.
दक्षिणमुखी भूखंडाचे दार दक्षिण दिशेला व दक्षिण ईशान्येला बनवू नये. पश्चिम व इतर दिशाला दार बनविणे लाभदायक आहे. जर आपले दार दक्षिणेला आहे तर दाराच्या समोर अगदी आरसा अशा पद्धतीने लावावा ज्यामध्ये माणसाची पूर्ण प्रतिबिंब दिसेल.
यामुळे घरांमध्ये माणसाच्या सोबत येणारी नकारात्मक ऊर्जा परत मागे फिरते. आता आपल्या लक्षात आलेच असेल की जर आपले घर दक्षिण दिशेला असेल तर आपण कोण कोणते उपाय करून त्याचे नकारात्मक परिणाम घालवू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.