पायाला गोळे आले की लगेच करा हा उपाय; पायात पेटके येणे, नसा आखडणे,चमक भरणे होईल बंद.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो शरीरातील तसे तर सर्व अवयव महत्वाचे आहेत परंतू आपले पाय आपल्याला जग फिरवतात. आपले पाय आपल्याला इथून तिथे घेवून जातात. पाय जर सलामत असतील तर माणूस परिपूर्ण असतो. मात्र आज काल आपण पाहतो की अनेक जणांना पायासंबंधी अनेक समस्या असतात त्यातील एक समान्य समस्या म्हणजे पायामध्ये गोळे येणे. हो पायात गोळे येणे ही तक्रार आता अनेकांना जाणवत आहे.
तीस ते पंचावन वयोगटातील व्यक्ती आणि विशेष करुन महिलांच्या बाबतीत हा प्रकार मोठ्या प्रमाणांत पहायला मिळतो. कारण त्यांना स्वयंपाकघरात उभ्या अथवा बसलेल्या अवस्थेत खूप काळ काम करावे लागते आणि यांमुळे कधी कधी रात्री झोपेत असताना पायात गोळे येतात. हे गोळे अतिशय वेदनादायाक असतात. गोळे यायची अनेक वेग-वेगळी करणे देखील असतात.
पायात वारंवार पायात गोळे आल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावा. मात्र बर्याच वेळा जीवनसत्व इ, जीवनसत्व क, पोटैशियम, आयरन यांसारख्या खनिजांच्या कमतरतेमुळे आणि शरीरातील वात दोष वाढल्या मुळे देखील पायामध्ये गोळे येतात. अश्या वेळी आपण अगदी काही घरगुती उपाय करुन या त्रासातून मुक्तता करुन घेवू शकतो. पुढील लेखात पाहूया नक्की काय आहे हा घरगुती रामबाण उपाय.?
मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम गरजेची आहे शेवग्याची पानांची पावडर. शेवग्याचे झाड ग्रामीण भागत अगदी सहज उपलब्ध असते. त्याच्या पानांचा रस देखील दोन चमचे या प्रमाणात आपण वापरु शकतो. मित्रांनो शेवग्याची पावडर जिथे उपलब्ध होत नाही तिथे तुम्हाला मेडिकल स्टोरमध्ये ही पावडर मोरिंगा लिव्स पावडर या नावाने विकत मिळते.
या शिवाय ही पावडर तुम्ही ऑनलाइन सुद्धा मागवू शकता. या पावडर मध्ये जीवनसत्व ई, क तसेच पोटैशियम, आयरन आणि लोह असे घटक आपल्याला मिळतात. शेवग्यामध्ये फोस्फेट आणि calcium सुद्धा मुबलक प्रमाणात असते आणि या खनिजांमुळे जर तुमच्या पायात गोळे येत असतील तर शेवग्याच्या पानांचा नक्की उपाय करा.
मित्रांनो एक वेळचा उपाय करण्यासाठी शेवग्याच्या पानांची म्हणजे मोरिंग लिव्स पावडर अर्धा चमचा एवढी घ्यावी. या नंतरचा दुसरा घटक म्हणजे आवळा पावडर. आवळ्यामध्ये अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतातच मात्र आवळ्याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होते. म्हणूनच आपण अर्धा एवढी आवळा पावडर घ्यावी आणी शेवटचा घटक म्हणजे मध.
एक ते दोन मध आपल्या आवडीनुसार घ्या आणि या तीन ही घटकांना एकत्रित करा. मधुमेह असलेल्या व्यक्तींना हा उपाय मध न घेता पाण्याच्या मदतीने करावा. तुम्ही बनवलेले मिश्रण सकाळी व रात्री दिवासातून दोन वेळा खायचं आहे. हा उपाय सलग दोन दिवस करा तुमचे पायात गोळे येणे त्वरीत कमी येईल. मित्रांनो पायात गोळा आल्यास तुमच्या कडे जे तेल असेल ते घेवून गरम करुन त्याने हलकी मसाज करा यांमुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. तसेच एक टॉवेल गरम करुन मग घट्ट पायाला बांधा सोबतच गुढग्याली उशी ठेवून झोपा जेणेकरून झटपट आराम वाटेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.