वर्षानवर्षं असणारी गाठ, तळपायात होणाऱ्या वेदना हा उपाय केल्याने होतील कायमच्या दूर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जुन्यातली जुनी वेदना, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, तळव्याच्या वेदना काही तासांमध्ये पूर्ण दूर होतील .असा एक चमत्कारिक उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा उपाय करण्यासाठी आपण अशा एका वनस्पतीचा उपयोग करणार आहोत, ती वनस्पती आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहायला मिळते परंतु या वनस्पतीचा फारसा काही उपयोग आपल्याला माहिती नसल्यामुळे या वनस्पती कडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.
ही वनस्पती डोंगराळ भागांमध्ये व शेतामध्ये सहज उपलब्ध होते. या वनस्पतीचे अध्यात्मिक दृष्टीकोनातून सुद्धा खूप मोठे महत्त्व आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जी वनस्पती वापरणार आहोत ती वनस्पती म्हणजे रुई ची वनस्पती. या वनस्पतीमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची वेदना जर होत असेल तर ती वेदना काही तासांमध्ये दूर होते.
या वनस्पतीची जेव्हा आपण पान काढतो तेव्हा या वनस्पतीच्या पानांमधून पांढरा रंगाचा द्रव्य पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ सुद्धा आपल्या शरीरावरील असंख्य समस्या साठी उपयुक्त ठरतो परंतु या वनस्पतीचा वापर करताना आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे कारण की या वनस्पती मधून निघणारे दूध आहे ते विषारी असते म्हणून लहान मुलांपासून ही वनस्पती लांब ठेवावे व या वनस्पतीचा वापर करताना काळजीपूर्वक करायला हवा.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला या वनस्पतीची पाने बारीक वाटून घ्यायचे परंतु ही पाने आपल्याला स्वयंपाक घरामध्ये बारीक करायची नाही यासाठी तुम्ही बाहेर एका दगडावर, पाट्यावर ही पाने बारीक करु शकता कारण की ही पाने काही प्रमाणामध्ये विषारी असल्याने याचा वावर स्वयंपाक घरामध्ये अजिबात करू नका. किंवा तुम्ही या वनस्पतीचे पान गरम करून ज्या ठिकाणी सूज आलेली आहे, वेदना आहेत अशा ठिकाणी सुद्धा लावू शकतो.
हा उपाय करताना आपल्याला पानांची बारीक पेस्ट करायची आहे आणि ज्या ठिकाणी शरीरावर सूज आलेली आहे व वेदना आहेत अशा ठिकाणी ही पेस्ट आपल्याला लावायची आहे. या वनस्पतीचे दूध सुद्धा अनेक आजारांवर उपयोगी ठरते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार झालेला असेल तर अशा वेळी आपण या वनस्पतीच्या दुधाचा एक थेंब प्रभावित जागेवर लावला तर खाज, खरुज, नायटा यापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची जुनी वेदना खूप काळापासून असेल तर ती वेदना कमी करण्यासाठी सुद्धा आपण या वनस्पतीचा वापर करू शकतो.
या वनस्पतीचे फुले ,पाने तर उपयोगी आहे पण त्याचबरोबर या पानांचा उपयोग आपण आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ निर्माण झालेली आहे ती गाठ कमी करण्यासाठीसुद्धा उपयोग करू शकतो, अशा वेळी ज्या ठिकाणी शरीरावर गाठ निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी रुईचे पान आपल्याला गरम करून लावायचे आहे असे केल्याने रुई तील काही औषधी गुणधर्म त्यामुळे गाठ हळूहळू कमी होऊ लागते.
हा उपाय तुम्ही साधारण पंधरा दिवस जरी सातत्याने केला तरी तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ निर्माण झाली असेल किंवा कोणत्याही प्रकारची जुनी कंबर दुखी, वेदना असेल ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल परंतु हा उपाय करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण की या पानांच्या अंगी काही विषारी घटक सुद्धा असतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.