अत्यंत मौल्यवान पण दुर्लक्षित आहे हि वनस्पती; प’क्षाघा’तावर अत्यंत गुणकारी आहे हि वनस्पती.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात त्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात परंतु त्या वनस्पती बद्दल फारशी आपल्याला माहिती नसते आणि अनेकदा या वनस्पती कडे आपण दुर्लक्ष करत असतो अशाच एका दुर्लक्षित वनस्पती बद्दल आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. ही वनस्पती आपल्याला डोंगराळ भागांमध्ये रस्त्याच्या कडेला सहज पाहायला मिळते परंतु या औषधाचे गुण, वनस्पती चे गुणधर्म आपल्याला माहिती नसल्यामुळे अनेकदा त्याचा आपण वापर करत नाही. या वनस्पतीचे नाव आहे दीपमाळ.
ही वनस्पती उत्तराखंड, उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आढळते तसेच या वनस्पतीला वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे.आयुर्वेदिक शास्त्रानुसार ही वनस्पती उष्ण व कडू ,वात नाशक आहे व कफनाशक सुद्धा आहे. आपल्याला तोंडातील फोड, ताप, वात, गजकरण यासारख्या अनेक समस्या असतात अशावेळी आपण दिपमाळ याची पाने, जांभळाची पाने व पेरूची पाने एकत्रित करून यांचा काढा बनवायला हवा.
या काढा चा सकाळ-संध्याकाळ वापर केला तर तुम्हाला दातांचा त्रास असेल, हिरड्या सुजत असतील,तोंडाचा वास येत असेल तर या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी मदत होत असते. याच्या पंचांगाचा काढा प्यायल्याने आपले लिव्हर शुद्ध होते व त्याचबरोबर आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुद्धा चांगल्या पद्धतीने होते. जर तुम्हाला पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस झाला असेल तर अशावेळी दीपमाळ वनस्पती मुळासकट उपटून आपल्याला उन्हामध्ये थोडीफार सुकवायची आहे आणि त्यानंतर त्याची पेस्ट बनवून तिळाच्या तेलामध्ये टाकून थोडेसे तेल गरम करायचे आहे आणि त्यानंतर प्रभावित जागेवर या तेलाने मालिश करायचे आहे.
असे काही दिवस गेले तर तुम्हाला पक्षघातपासून लवकरच सुटका मिळेल. आपल्यापैकी अनेकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्या सतावत असतात अशावेळी या दिपमाळ वनस्पतीच्या पानांचा लेप जर लावला तर यामुळे गुडघे दुखी, कंबर दुखी व सांधे दुखी यासारख्या समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होत असते.बहुतेक वेळा वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे किंवा पावसाळ्यामध्ये अनेकांना ओले कपडे घातल्यामुळे अनेक त्वचा विकार सुद्धा होत असतात.
जर तुम्हाला खाज, खरूज, नायटा, गजकर्ण यासारख्या समस्या असतील तर अशा वेळी या दीपमाळ वनस्पतीच्या फुलांची राख बनवून दही मध्ये मिक्स करून प्रभावी जागेवर लावल्याने तुमच्या शरीरावरील खाज पूर्णपणे मिटण्यास मदत होते. स्त्रियांच्या मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना सुद्धा या वनस्पतीच्या पंचांग काढाने दूर होत असतात त्याचबरोबर अनेकदा स्त्रियांच्या स्तनांना सूज येऊ लागते किंवा बाळंत झाल्यानंतर अनेकदा स्त्रियांना दूध येत नाही.
अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप स्तनांना लावला तर स्त्रियांच्या शरीरामध्ये दूधनिर्मिती होऊ लागते त्याचबरोबर जर एखाद्या रुग्णाला मलेरिया झाला असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा काढा प्यायला दिल्याने मलेरिया पूर्णपणे दूर होत असतो अशा प्रकारे ही वनस्पती आपल्याला जर कुठे आढळली तर या वनस्पतीचा लाभ अवश्य घ्या आणि आपल्या आरोग्यासंबधित समस्या पूर्णपणे नष्ट करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.