मायग्रेन, आमवात, संधीवात, सांधेदुखी सर्व वातविकार एका दिवसात थांबवणाऱ्या या औषधी वनस्पतीबद्दल एकदा नक्की जाणून घ्या.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अर्धशिशी ,सांधेदुखी, अर्ध डोके दुखणे, संधिवात यासारख्या समस्या अनेकांना उद्भवत असतात. या समस्येवर अनेक वेळा आपण उपचार सुद्धा करत असतो. अनेक औषध सेवन करत असतो परंतु त्या औषधांचा आपल्याला हवा तसा फरक पडत नाही परिणामी अनेकदा या औषधांमुळे आपल्याला ऍसिडिटी सुद्धा होऊ लागते म्हणूनच ही समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी आजच्या या लेखामध्ये तुमच्यासाठी आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.
या लेखामध्ये असा आपण एक उपाय करणार आहोत, या उपायामुळे आपल्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे निघून जाणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वनस्पती वापरायची आहे आणि ही एक वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे.
बहुतेक वेळा अनेक दुखणे हे आपल्याला वातामुळे होत असते. अनेकदा सांधे दुखणे, अंग दुखणे या सगळ्या समस्या त्यामागे कारण सुद्धा वात असते म्हणूनच या वातावर रामबाण औषध म्हणून ही एक वनस्पती अत्यंत महत्त्वाची ठरते त्या वनस्पतीचे नाव आहेत निर्गुडीची पाने. ही पाने जर आपण पाण्यामध्ये भिजवून त्याची वाफ घेतल्याने आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे दूर होण्यास मदत होते.
जर आपल्याला पाय लांब करायला जमत नसेल, सांधे नेहमी दुखत असतील, गुडघे दुखत असतील गुडघे सुजत असतील, चालले तरी पायाला वेदना होत असेल तर अशा वेळी निर्गुडीची पाने वाफवून आपल्या पायाला लावले तर आपल्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात. हा उपाय आपल्याला आठवडाभर करायचा आहे .असे केल्याने वात संदर्भात ज्या काही समस्या सध्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात.
जर आपली मान दुखत असेल तर अशा वेळी आपण वाफवलेली निर्गुडीची पाने तेथे लावावी किंवा निरगुडी च्या पानांची पेस्ट करून आपण मान दुखीवर लावली तरी आपल्याला फरक पडतो.
जर तुम्हाला मायग्रेन अर्धशिशीचा त्रास असेल तर अशावेळी निर्गुडीची पाने वाफवून एका कपड्यामध्ये बांधून जर आपण त्याचा रस काढून आपल्या दोन्ही नाकामध्ये दोन दोन थेंब जर नियमितपणे टाकले तर आपला मायग्रेनचा त्रास हा पूर्णपणे नष्ट होऊन जातो. हा उपाय आपल्याला कमीत कमी पंधरा दिवस तरी करायचा आहे , अशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर आपल्या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.