केस, दाढी मिशा लांबच लांब व घनदाट बनवणारा एक आगळा-वेगळा उपाय एकदा नक्कीच ट्राय करा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा सिरम लावा आणि घरच्या घरी विरळ झालेले केस दाढी-मिशा व आयब्रो चे केस काळेभोर बनवा. आज आम्ही तुमच्या साठी दाढी केस विषया वरील केस जर विरळ असतील तर केस काळेभोर करून देणारा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे आयब्रो व डोळ्यावरील केस दाट होणार आहेत तसेच अनेक पुरुषांच्या दाढी-मिशा या खूपच विरळ असतात त्यामुळे चेहरा चांगला दिसत नाही म्हणूनच हा उपाय केल्यामुळे सुद्धा दाढीमिशा वरील केस दाट होणार आहेत.
तसेच रंगसुद्धा टिकून राहणार आहे त्याचबरोबर दाढी मशीन चा रंग जर अकाली पांढरे झाला असेल तर तो सुद्धा काळा होणार आहे. असा अगदी महत्वाचा घरगुती उपचार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांद्याचा रस लागणार आहे. सर्वप्रथम कांद्याची साल काढून मिक्सर मध्ये कांद्याचा रस काढून घ्या त्यानंतर कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने हा रस काढून घ्या.
या रसांंमध्ये पाणी अजिबात टाकायची नाही. आपल्याला फक्त कांद्याचा रस हा उपाय करण्यासाठी वापरायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक लिंबू लागणार आहे. एका वाटीमध्ये अर्धा लिंबू रस काढून घ्या. कांदा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानला गेलेला आहे.
त्याचबरोबर लिंबू सुद्धा केसांसाठी उपयुक्त आहे. लिंबू मध्ये प्रोटीन सोडियम, फॉस्फेट, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन सी ,तांबा, वसा यासारखे पोषकतत्व आढळतात म्हणूनच लिंबू आपल्या केसांसाठी व स्किन साठी खूपच महत्त्वपूर्ण ठरतो तसेच कांदा देखी अँटी इन्फलामेंट्री गुणाने देखील भरपूर युक्त असतो तसेच कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फोलेट ,विटामिन सी, विटामिन ए , मॅग्नेशियम यासारखे अनेक महत्त्वाचे गुणधर्म उपलब्ध असतात म्हणूनच केसांचे आरोग्य जपण्यासाठी कांदा उपयोग करतो.
जर तुमच्या केसांची गळती होत असेल तर केस गळती थांबवण्यासाठी कांद्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यानंतर एका वाटीमध्ये एक चमचा कांद्याचा रस, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा कोरफडचा जेल आपल्या टाकायचा आहे जर तुमच्याकडे कोरफड घरी असेल तर तुम्ही त्याचा जेल टाकू शकता अन्यथा बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या जेल चा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये विटामिन ई ची एक कॅप्सूल टाकायची आहे.
अनेकदा केसांना विटामिन ई ची कमतरता असल्यामुळे या समस्या सुद्धा निर्माण होतात त्यानंतर आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे, अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे. जर तुमची आयब्रो वरील केस विरळ झाले असतील तर अशा वेळी थोडसं हे मिश्रण आपल्या आयब्रो ला लावून हलकासा मसाज करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या चेहऱ्यावरील दाढी व मिशा यांचे केस विरळ असतील तर यावर सुद्धा हे मिश्रण लावून हलकासा मसाज करायचा आहे.
हा मसाज आपल्याला कमीत कमी पंधरा दिवस तरी पाच मिनिटे तरी करायचा आहे असे केल्याने हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरील दाढी मिशा यांचे केस घनदाट होण्यासाठी मदत होणार आहे. हा उपाय केल्याने गेलेले केस सुद्धा लवकर येणार आहेत तसेच विरळ केस दाट होतील व काळे सुद्धा होतीेल. हा उपाय किमान तीन महिने तरी करा जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळेल म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.