भारतीय आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती; १६ आजार मुळापासूनच करेल बरे.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वात उपलब्ध असलेल्या या वनस्पतींच्या वापराने सोळा पेक्षा अधिक आजार दूर करू शकतो. त्याचा वापर कसा करावा हे आपल्याला माहिती पाहिजे. या वनस्पतीचे नाव आहे पुदिना. ही वनस्पती आपल्याला सर्व भाजी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते. भारतामध्ये उगवणारी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.
शरीराला थंडावा प्रदान करणारी ही वनस्पती वायू पाचक आहे. खाल्ल्याने पोट साफ होते, लघवी स्वच्छ होते तसेच तसेच पुदिनाचे सेवन केल्यामुळे लघवीचे प्रमाण सुद्धा वाढते. ही वनस्पती सर्दी ,डोकेदुखी, वात विकार यावर अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती आहे. चला तर मग जाणून घेऊया ही वनस्पती कशी वापरायची आणि आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोतत्याकरिता या वनस्पतीचा कसा वापर करायचा याबद्दल..
या वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यास अशा वेळी या पुदिन्याचे पान चुरगळून नाकाला लावल्यास चक्कर लगेच नाहीशी होते आणि त्या व्यक्तीला शुद्ध येते. जर तुम्हाला अपचन व पोट साफ होत नसेल अशी समस्या असेल तर अशावेळी तुम्ही पुदिन्याच्या पानाचा रस प्यायल्याने तुमचे पोट लवकर साफ होते व पचनाच्या समस्या सुद्धा नष्ट होतात. उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विंचू बाहेर पडत असतात.
हे विंचू चावल्यामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणाम सुद्धा पाहायला मिळतात. अनेकदा विंचू चावल्यामुळे शरीराला वेदना सुद्धा होत असतात. अशा वेळी जर तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिन्याच्या काही पानांचा रस काढून प्रभावित जागेवर तो लावावा. असे केल्याने पुदिन्याच्या पानांमुळे शरीरातील विंचू चावल्या मुळे जे विष असते ते त्वरीत बाहेर काढण्यास मदत होते आणि यामुळे आपल्याला लवकरच फरक पडतो. अनेकांना पित्ताचा त्रास असतो.
अनेक औषधे उपचार करून सुद्धा पित्ताचा त्रास काही केल्या जात नाही. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचा पुदिन्याचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गूळ टाकायचा आहे त्यानंतर सकाळी उपाशीपोटी हा काढा आपल्याला प्यायचा आहे. असे चार-पाच दिवस केल्याने पित्ताचा त्रास मुळापासून नष्ट होतो. अनेकांना ताप येण्याची समस्या वारंवार जाणवू लागते अशा वेळी आपण पॅरासिटॅमॉल सारख्या पेनकिलरचा उपयोग करत असतो. याचा अनेकदा शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला ताप आला असेल तर अशावेळी पुदिन्याच्या चहा बनवायचा आहे.
हा पुदिन्याचा चहा तुम्ही दिवसभरातून दोन वेळा प्यायल्याने तापाची समस्या दूर होते शिवाय तापामुळे शरीराला आलेला थकवा सुद्धा दूर होतो. जर तुम्हाला अतिसार, जुलाब झाले असतील तर अशा वेळी पुदिन्याच्या पानाचा रसामध्ये दोन थेंब मध टाकायचे आणि हे मिश्रण आपल्याला प्यायचे आहे, असे केल्याने जुलाब लगेच थांबतात. अनेकांना उष्णतेचा त्रास होत असतो अशावेळी पुदिन्याच्या पानांना हाताला व पायाच्या तळव्याला घासल्याने आपल्या शरीरातील उष्णता त्वरित निघून जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.