हे केश तेल चोळून लावा; केस गळती पूर्णपणे होईल बंद, भुवयांचे केस पण वाढतील.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोक्याचे केस गळणे,केसांमध्ये कोंडा होणे, डोक्याला फोड येणे, केस रुक्ष होणे,केस कोरडी पडणे अशा केसांच्या समस्या वर हा उपाय रामबाण असा आहे. या उपायामुळे केस लांब,काळे , दाट होतात शिवाय केसांचे रुक्षता जाऊन केसांना चमक येते शिवाय बर्याच भगिनींच्या भुवयाचे केस विरळ पातळ होतात. केस गळाले तर लवकर वाढत नाहीत म्हणून केसांसाठी उपयुक्त असा उपाय आहे. या उपाय साठी कोणते पदार्थ लागणार आहे.? त्यांचा वापर कसा करायचा आहे.? याची माहितीही लेखात जाणून घेणार आहोत.
पहिला पदार्थ लागणार आहे ते म्हणजे एरंडेल तेल. ते अतिशय चिकट स्वरूपामध्ये असतात त्यामुळे बरेच जण ते तेल वापरणे टाळतो पण या तेलामुळे केसांना अधिक प्रमाणामुळे पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. केसांची वाढ सुद्धा चांगली होते आणि त्यांचा आरोग्य देखील निरोगी होण्यासाठी मदत मिळते.
या तेलामध्ये केसांच्या भागातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने सुरू राहते. या तेलाचा योग्य वापर केल्यावर केसाची गळती कमी होते सोबत याच्यामध्ये अंटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुण आहे यामुळे निर्जीव झालेल्या केसांची सुद्धा समस्याही दूर व्हायला मदत मिळते शिवाय या तेलामध्ये ओलावा खेचून घेण्याची क्षमता असते यामुळे केस लांब आणि दाट येतात. रुक्षपणा जाऊन चमक येते व जर भुवयांचे केस कापले तर लवकर वाढत नसतील अशा वेळीसुद्धा हे तेल उपयुक्त आहे.
आपल्याला या तेलाचा एक चमचा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते घरात उपलब्ध असलेले खोबरेल तेल. खोबरेल तेलाचा आयुर्वेदामधे अतिशय उपयुक्त असे वर्णन केलेले आहे. हे खोबरेल तेल कोंडा असेल,केस दुभांगत असेल, केस गळतीची समस्या निर्माण होत असते ते होत नाही. केसांची वाढ सुद्धा चांगली करायला खूप उपयुक्त ठरतात.केस लांब आणि निरोगी काळेभोर सुद्धा या तेलामुळे होत असतात. या तेलाचा वापर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण करत असतो.
आपल्याला काय करायचे आहे तर एक चमचा खोबरेल तेल याच्या मध्ये ऍड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा महत्त्वाचा पदार्थ लागणार आहेत ते म्हणजे आले. आल्याचे साल काढून घ्यायचा आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि हा किसलेला जो आले आहे त्याचा रस काढायचा आहे आणि हा रस उपायासाठी वापरायचे आहे. यामुळे खूप चांगल्या पद्धतीने केसांच्या भागामधील जे रक्ताभिसरण आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने होत असते.
केसांच्या खोलवर कंडिशन होऊन पोषक घटकांचा सुद्धा पुरवठा हे आल्याचा रस करत असतात त्यामुळे केस गळती त्रास आहे तो कमी होतो आणि टाळूची त्वचा हि चमकते. तसेच गुंता झालेले केस तेसुद्धा मोकळी होतात.एक चमचा आल्याचा रस सारख्या प्रमाणात हलवून एकजीव करायचे आहेत अशा पद्धतीने रोज रात्री संध्याकाळी आपल्या डोक्याला दहा मिनिटं चोळून मसाज करून लावायचे आहे की मसाज केल्यामुळेतर केसांची वाढ वेगाने व्हायला मदत होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.