जेवणानंतर फक्त एकदाच करा हा उपाय; २ मिनिटांतच साफ होईल तुमचे पोट.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खाल्लेले नीट पचत नसेल, पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, पोटात गॅस निर्माण होत असेल तसेच पोटावर, कंबरेवर ,मांड्यांवर अतिरिक्त चरबी निर्माण होत असेल, वजन वाढत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. या उपायांमुळे आपली जी पचन शक्ती आहे ,ती अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करू लागते. जवळजवळ सत्तर टक्के आजार हे आपल्या पचनाची निगडित असतात.
पचन व्यवस्थित झाले तर बरेच आजरा पासून मानवाचे शरीर दूर राहते म्हणून आजचा हा पचना संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी रामबाण असा उपाय ठरणार आहे. शौचाला त्रास होणार नाही तसेच शरीरामध्ये अतिरिक्त फॅट जमा झालेले आहेत ते सुद्धा कमी होईल. चला तर मग जाणून घेऊया. हा उपाय कसा करायचा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ओवा.
हा पदार्थ आपल्याला प्रत्येकाच्या घरांमध्ये सहज उपलब्ध होत असतो. ओवा मध्ये अनेक अँटी गुणधर्म आहेत, जे तुमची रोगप्रतिकारक क्षमता तसेच पोटाचे आरोग्य चांगले राखते यामुळे पोटामध्ये गॅस तयार होत नाही. पोटाचे आरोग्य तसेच पचनसंस्था चांगले राहण्याची शक्ती सुद्धा प्रदान करतात म्हणूनच ओवा खाल्ल्याने पोट साफ राहते त्याचबरोबर ओवा मुळे वारंवार लागणारी भूक सुद्धा मंदावते म्हणून आपले वजन सुद्धा वाढत नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ओवा तव्यावर भाजून घ्यायचा आहे.
हा ओवा चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा. हे भाजून घेत असताना चिमूटभर मीठ सुद्धा आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर भाजलेले ओवा आपल्याला खलबत्या मध्ये टाकून त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. ही पावडर आपल्याला या उपायासाठी वापरायची आहे. आता आपल्याला एक पातेले गॅसवर ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करायचे आहे.
या पाण्यामध्ये आपल्याला बारीक किसलेले आले ॲड करायचे आहे. आपल्या सर्वांना आल्याचे गुणधर्म माहितीच आहे. आल्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते तसेच आल्या मध्ये जिंजी रोल नावाचे पोषक तत्व असते त्यामुळे शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यास मदत होतात त्यानंतर आपल्याला पातेला मध्ये लिंबूचे सात ते आठ थेंब रस मिक्स करायचे आहेत त्यानंतर आपल्या उपयोगासाठी ओव्याची पावडर तयार केलेले आहे ती पावडर या पातेल्यामध्ये मिक्स करायची आहे.
हे मिश्रण चांगले उकळू द्यायचे आहे त्यानंतर थंड झाल्यावर गाळणीच्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर हा रस आपल्याला दुपारी जेवण झाल्यानंतर द्यायचा आहे, असे केल्याने तुम्हाला लवकरच रिझल्ट पाहायला मिळेल. हा उपाय आपल्याला सलग पंधरा दिवस करायचा आहे. या उपायांमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास, पोटाच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तीने हा रस रात्री जेवणानंतर प्यायचा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.