रोज २ केली खाल्ल्यावर जे अद्भुत फायदे मिळतात त्या बद्दल तुम्ही कधी ऐकलंही नसेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बाराही महिने सहज उपलब्ध असणारी केळी आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात त्याशिवाय आपल्या शरीरासाठी बलवर्धक म्हणून सुद्धा उपयोगी असतात. केळ्यामध्ये ११० कॅलरी असतात त्यामुळे भूक लागल्यावर केळी खाणे अतिशय उपयुक्त ठरते शिवाय खनिजे, मॅग्नीज ,फॉस्फरस, कॅल्शियम, फायबर, फॉलिक ऍसिड इत्यादी कर्बोदक त्याचबरोबर अनेक जीवनसत्व सुद्धा केळ्यामध्ये समाविष्ट असतात.
केळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील मांस पेशी बळकट होतातच त्याचबरोबर आपल्या शरीरातील थकवा सुद्धा त्वरित निघून जातो. जर केळी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी खाल्ल्यास आपल्या शरीराला त्याचे उपयुक्त असे फायदे मिळतात म्हणूनच आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये केळाविषयी असे काही महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत ते तुम्ही कधीच जाणून घेतली नसेल.
केळांमध्ये नैसर्गिक रित्या फॅट व कोलेस्ट्रॉल नसते म्हणूनच आपल्या हेल्दी डायट मध्ये त्यांचा जरूर समावेश करावा. फॅट मुळे अतिरिक्त चरबी व कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रमाण होत असते परंतु केळी खाल्ल्यामुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होत राहते शिवाय एका केळ्यामध्ये चारशे एमजी पोटॅशियम असते.
आपल्या शरीराला अनेक पोषणतत्वांची गरज असते. शरीराला ज्या पद्धतीने कॅल्शिअमची गरज असते त्याच पद्धतीने पोटॅशियमचे सुद्धा गरज खूप मोठ्या प्रमाणावर भासत असते. नर्वस सिस्टम साठी व त्याचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोटॅशियम खूप गरजेचे असते. पोटॅशियम मुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते त्याच बरोबर उच्चरक्तदाब समस्या असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारामध्ये नियमितपणे सेवन केल्यास त्याचा योग्य तो परिणाम सुद्धा जाणवू लागतो.
पौष्टिक आणि सकस आहार म्हणून लहान मुलांना नियमितपणे एक केळ खाऊ घालणे हे त्यांच्या मेंदूच्या वाढीसाठी तसेच शारीरिक वाढीसाठी लाभदायक ठरते. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की जर लहान मुलांना सर्दी, खोकला असेल तर त्यांना दुपारच्या वेळेस केळी खायला द्या. केळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि लोह उपलब्ध असते त्यामुळे हा संबंधित आजार व तसेच हाडे ठिसूळ होणे यासारख्या समस्या जर तुम्हाला असेल तर त्या लवकरच दूर होतात.
ज्या व्यक्तींना शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा व्यक्तीने दिवसभरातील एक केळ नियमितपणे खायला हवे कारण की केळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोह व हिमोग्लोबिन उपलब्ध असते. जे तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढविण्याचे कार्य करते. ज्या व्यक्तीने पोटाचा त्रास आहे, ज्यांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तीने नियमितपणे केळ्याचे सेवन करायला हवे कारण की केळींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स उपलब्ध असतात त्याचबरोबर केळी खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुरळीत होते त्यामुळेच आतड्यामध्ये साचलेले मळ पुढे ढकलण्यास मदत होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.