दिवस मावळल्यानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला तुमच्या घरांमध्ये दारिद्र आमंत्रित करायचे नसेल ,जर तुम्हाला कंगाल बनायचे नसेल, तर तिन्ही सांजी म्हणजे संध्याकाळी या गोष्टी घरांमध्ये घडलाच नाही पाहिजे. जर या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर समजून जा की तुमच्या घरा मध्ये साडेसाती व पणवती प्रवेश करणार आहे. जर या गोष्टी तुम्ही सातत्याने घरांमध्ये करत असाल तर लवकरच १००% कंगाल म्हणाल. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण संध्याकाळी नेमक्या कोणत्या गोष्टी करू नये याच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे दिवस संपल्यावर ची वेळ असते तिला सायंकाळी असे म्हणतात. ही वेळ अतिशय शुभ असते. यावेळी घरामध्ये शुभकार्य घडले पाहिजे.जर तुम्ही घरातील लक्ष्मीला म्हणजे स्त्रीला विनाकारण त्रास देत असाल ,तिच्यामागे कुरकूर करत असाल ,तिला वाईट साईट बोलत असाल, विनाकारण भांडण करत असाल तर हे खूपच वाईट आहे.
तुम्ही दिवसभर काही करा परंतु तिन्ही वेळ सांजेची वेळ असते त्यावेळी जर आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतील तर त्याचा नकारात्मक प्रभाव संपूर्ण घरादारावर होत असतो आणि तुमच्यावर अनेक समस्या सुद्धा अचानक पणे निर्माण होत असतात म्हणून ही एक गोष्ट अजिबात घडू द्यायची नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकांना सवय असते की संध्याकाळी आरशामध्ये पाहण्याची म्हणूनच दिवस मावळल्यानंतर अजिबात आरशामध्ये पाहू नये. असे आपले पूर्वज आपल्याला सांगत होते कारण सायंकाळी आरसा मध्ये नकारात्मक ऊर्जा असतात त्या जागृत होत असतात आणि आरशामध्ये त्यांचे वास्तव्य असते असे म्हटले जाते. आरशामध्ये पाहिल्यामुळे आपले तोंड काळे पडते असे पूर्वीच्या काळी आपल्या ला सांगितले जात असे.
महत्त्वाचे कारण असे की आपल्या शरीरामध्ये जे काही सकारात्मक ऊर्जा असते त्या सकारात्मक व नकारात्मक मध्ये बदलण्याचे कार्य आरसा मधील ऊर्जा करत असते त्याचबरोबर दारिद्र्य तर आपल्या घरामध्ये येऊ द्यायची नसेल तर, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून हाकलून लावायची असेल तर घरामध्ये सकारात्मकता निर्माण करायची असेल तर वातावरण अगदी शांत ठेवावे.
देवपूजा करावी ,धूप अगरबत्ती यांचा जो सुगंधी सुवास आहे तो आपल्या घरांमध्ये तर दरवळला पाहिजे,असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच बाहेर पडते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वर्षा होत असतो त्यामुळे घरातील सगळं कार्य तुमच्या चांगले होत राहते. घरातील सदस्य सकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात येत असतात आणि तुमचे भविष्य उज्ज्वल होत राहते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.