या झाडाची फक्त 4 पाने, हिरड्यातून रक्त येणे, काळे डाग करतील कायमचे दूर.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा खूप जणांचे तोंड वारंवार येत असते, काही जणांचे दात दुखू लागतात, हिरड्यांमधून रक्त येत असेल हिरड्यांना सूज येत असेल व हिर ड्या मधून पु येत असेल तर शिवाय ज्या व्यक्तींना मधुमेह आहे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले आहे इत्यादी सगळ्या समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे.
त्याचबरोबर चेहऱ्यावर काळे डाग असतील वांग असतील तर सुद्धा आज या लेखांमध्ये सांगितलेल्या उपाय आधारे कमी करता येऊ शकतील.ज्या व्यक्तींना डोळ्यांचा आजार आहे जसे की डोळे लाल होणे,डोळ्यातून पाणी येणे, डोळे वारंवार दुखणे हे सुद्धा या काढामुळे कमी होणार आहे.तर चला जी सामग्री आपल्याला लागणार आहेत हे जाणून घेऊया..
एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला उंबराची दोन पाने लागणार आहेत. या उंबराच्या पानांमध्ये अँटी सेप्टिक , अँटी बॅकटेरिया इत्यादी गुणधर्म असतात. शिवाय वात,कफ, पित्त कमी करण्याचे गुणधर्म या उंबराच्या पानांमध्ये असतात.
ही पाने आपल्याला पाण्यामध्ये टाकून काही वेळ उकळत ठेवायचे आहेत. आणि चांगले उकळू लागल्यास पानांचा रंग पाण्याला आल्यास गॅस बंद करायचा आहे. पाणी थंड झाल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने हे पाणी गाळून घ्यायचे आहे.वारंवार तोंड येणे हिरड्यांमधून रक्त व पू बाहेर पडणे अशा वेळी हा काढा आपल्या तोंडामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे.
त्यानंतर हा काढा बाहेर फेकून द्यायचा आहे. सलग तीन दिवस हा उपाय केल्याने तुमच्या समस्या नष्ट होतील. ज्या व्यक्तीला मधुमेहाचा आजार आहे अशा व्यक्तीने हा काढा दिवसभरातून एकदा घ्यायचा आहे. हा उपाय एकवीस दिवस सातत्याने केल्यास तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात आलेली दिसेल.
जर समजा डोळे वारंवार दुखत असते डोळ्यांना सूज येत असेल अशावेळी या काढाच्या माध्यमातून तुमचे डोळे धुवायचे आहेत. जेव्हा चेहऱ्यावर काळे डाग व वांग निर्माण होतात अशा वेळी आपल्याला हाच काढा बनवायचा आहे फक्त या काढामध्ये दोन चमचा मध मिसळायचे आहे व त्याने आपला चेहरा धुवायचा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.