उपाशीपोटी कच्चा लसूण खाल्ल्यांनंतर होणारे फायदे पाहून तुम्हीसुद्धा चकित व्हाल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कच्ची लसूण ( Raw Garlic ) खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यातल्या त्यात जर आपण रिकाम्या पोटी थोडासा लसूण जर खाल्ला तर जे फायदे होतील ते अद्भुत असतील. हे फायदे वाचून तुम्ही आच्छर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो लसूण हि आपल्या जेवणातील चव च वाढवतो असे नाही तर हा लसूण आपल्याला कित्येक आजारांपासून आणि रोगांपासून दूर ठेऊ शकतो, कित्येक रोगांना तो मुळापासून नष्ट करू शकतो.
अनेक रोगांची वाढ या लसणाच्या सेवनाने थांबते. अनेक रोगांना बरे करण्याची क्षमता या लसणामध्ये आहे. मित्रांनो लसूण हा एक नैसर्गिक अँटिबायोटिक आहे आणि ज्यांना तारुण्य टिकून ठेवायचं आहे ज्यांना वाटतं कि ते सदैव तरुण राहावेत, ज्यांचं वय वाढत चाललेलं आहे या सर्वांसाठी लसूण हा एक नैसर्गिक अँटिबायोटिक सारखं काम करतो आणि वाढतं वय तो थांबवतो.
मित्रांनो सकाळी लवकर उठून योगासने आणि प्राणायाम करण्यापूर्वी जर आपण थोडासा लसूण दररोज कच्चा खाल्ला तरीही चालेल, जर ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जेवणापूर्वी हा लसूण चावून चावून खाऊ शकता. शारीरिक ताकद वाढवण्याचं काम हा लसूण करतो. आयुर्वेद असं म्हणतो कि तारुण्य टिकवणारी सर्वात छान आणि चांगली औषधी ज्या आहेत त्यापैकी लसूण एक आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात.
पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना जीवनामध्ये ताणतणाव येतो, जीवनामध्ये स्ट्रेस खूप आहे अशा लोकांनी या लसणाचे नक्की सेवन करावे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना बद्धकोष्ठ, कब्ज , यांसारखे आजार आहेत त्यांनी सुद्धा हा कच्चा लसूण खावा. ज्यांना श्वसन तंत्रासंबंधित समस्या आहेत , अस्थमा किंवा श्वसनसंबंधित असेल अशा लोकांनी सुद्धा कच्च्या लसणाचे सेवन करावे. कच्चा लसूण खाल्ल्याने श्वसन तंत्र मजबूत बनतं.
ज्यांना वारंवर कफ होतो अशा लोकांनी सुद्धा लसणाचे सेवन करावे. आणि ज्यांना वाटत आपल्याला भविष्यात कधीही क्षयरोग होऊ नये म्हणजेच टीबी होऊ नये अशा लोकांनी कच्चा लसूण खायला हवा.
आजकाल आपण पाहतो अगदी मोठमोठ्या लोकांना कॅन्सर ने झपाटलेलं आहे, कॅन्सर कुणालाही होऊ शकतो. कच्चा लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये कॅन्सर च्या पेशींची वाढ होत नाही. त्या पेशींना मुळापासून जाळून टाकण्याचं काम हा लसूण करत असतो आणि म्हणून कॅन्सर पासून बचाव होण्यासाठी कच्चा लसूण नक्की खावा.
तसेच ज्यांना भूक लागत नाही, ज्यांची शारीरिक ताकद अत्यंत कमी झालेली आहे, पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही त्यांनी सुद्धा कच्चा लसूण खा. लसूण खाल्ल्याने आपली भूक वाढेल आणि जी पचनसंस्था आहे तीच कार्य सुद्धा सुधारेल. ज्यांना डायरिया चा त्रास आहे पोटाचे वेगवेगळे आजार आहेत अशांनी सुद्धा या लसणाचा सेवन करावं.
ज्यांना हाय ब्लडडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा या लासनाचं सेवन नक्की करावं. याने हायपरटेन्शन कमी होतं तसेच रक्ताभिसरण आहे ते नियंत्रित होत. हृदयाशी संबंधित अनेक आजार हा कच्चा लसूण खाण्याने बरे होतात. आपलं जे यकृत आहे म्हणजेच लिव्हर ते सुद्धा व्यवस्थित काम करू लागतं. तसेच ज्यांना संधिवाह्ता आहे ज्याला आपण हिंदी मध्ये जोडो का दर्द असं म्हणतो, तर संधिवाहतांच्या रुग्णांनी सुद्धा कच्चा लसूण नक्की खावा.
मित्रांनो एक न अनेक असे या कच्च्या लसणाचे फायदे आहेत. आता आपण जाणून घेऊया कि कच्चा लसूण कधी खावा आणि कसा खावा. मित्रांनो उठल्यावर उपाशीपोटी आपण जर दररोज २ पाकळ्या काहीही न खाता जर आपण चावून चावून खाल्ल्या तर त्यामुळे आपल्याला हे सर्व फायदे मिळू शकतात.
आपल्याला अशा प्रकारे खाणं शक्य नसेल तर आपण जेवणापूर्वी म्हणजे आपलं जे सकाळचं जेवण असेल त्या जेवणापूर्वी या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या जर आपण चावून चावून खाल्ल्या आणि नंतर जर जेवण केलं तर आपली ताकदही वाढेल आणि सर्वच्या सर्व फायदे आपल्याला नक्की मिळतील.
एक अत्यंत महत्वाची गोष्ट ती म्हणजे ज्या लोकांना उष्णता खूप जास्त आहे किंवा ज्यांना मुळव्याधाचा त्रास आहे अशा लोकांनी मात्र लसणाच सेवन कमीतकमी करावं. जेणेकरून त्यांना कोणतेही तोटे सहन करावे लागणार नाहीत.
तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या सर्व गोष्टींचा फायदा होईल.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.