मुंबईत मराठीच.! मनसेचा जबरदस्त झटका.. तारक मेहता का उलटा चष्म्याधील कलाकाराने मागितली माफी..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो अमराठी लोकं मुंबईत राहून मराठीच्या मुळावर उठलेत. हे आपण तारक मेहतांच्या उलट्या चस्मा मध्ये आपण बघितलं असेल. सीरिअल च्या प्रसिद्धी साठी हे लोकं आपल्या मराठी भाषेची केविलवाणी चेष्टा करू पाहतात. त्याबाबत मुंबईसह महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांना झालेल्या प्रकारची माफी मागावी लागली.
तारक मेहता का उलटा चस्मा मालिकेत तो वादग्रस्त विडिओ काय होता हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा. छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उलटा चस्मा हि सब टीव्हीवरील कॉमेडी मालिका तब्बल १० वर्षांपासून जास्त वर्ष मनोरंजन करत आहे. हि मालिका १८ जुलै २००८ रोजी सुरु झाली होती.
त्याचे गोपालधामची दुनियादारी हे डब व्हर्जन २४ डिसेंबर पासून मराठी मध्ये प्रेक्षकांना भेटीस आलेलं आहे. मात्र या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात गोकुळधाम सोसायटी मधील रहिवाशांमध्ये मातृभाषेवरून भांडण सुरु असल्याचा एपिसोड दाखवण्यात आला.
जेठालालचे वडील बापूजी यांच्या तोंडी हिंदी हि मुंबईची भाषा आहे, म्हणूनच आपण हिंदीतच सुविचार लिहितो असं दाखवण्यात आलं. आणि त्यानंतर मालिकेवर चहू बाजूंनी टीका झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्षेप घेत सब टीव्ही ने हा भाग कट करून याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.
सोशल मीडियावर मराठी वरून वाद उफाळल्यानंतर मालिकेचे निर्माते असीत कुमार मोदी यांनी ट्विट करत दाखवलेल्या सीन बद्दल माफी मागितली आहे.
तर तुम्हाला या प्रसंगाविषयी काय वाटतं हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि हि माहिती शेअर करायला विसरू नका.