कोरोना व्हायरस चा क्रिकेटलाही जबरदस्त फटका.. प्रेक्षकांशिवाय होणार सर्व सामने..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्थांची संख्या वाढून आता १४ वर पोहोचली आहे. यामध्ये पुण्यात ९ रुग्ण, मुंबई मध्ये ३ तर ठाणे आणि नागपूर मध्ये २ रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्थांची सर्वाधिक संख्या हि परदेशात राहणाऱ्या व्यक्तींची आहे.
म्हणजेच परदेशी गेल्यांनतर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १३ जणांची प्रकृती आता स्थिर आहे, पण त्यातील एक रुग्ण ज्यांचं वय जास्त आहे ते रुग्ण आयसीयूमध्ये भरती आहे. त्याचबरोबर भारतामध्ये कोरोनाचा पहिला बळी देखील गेला आहे. म्हणजेच कर्नाटकातील कलबुर्गी येथील ७६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
वय जास्त असल्या कारणाने त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. त्यामुळेच त्यांचं मृत्यू झालीच सांगण्यात येत आहे. मित्रांनो कोरोना व्हायरस चा फटका हा क्षेत्रांना बसलेला दिसत आहे. अगदी त्याच पद्धतीने क्रिकेटला देखील कोरोना व्हायरस चा फटका बसत आहे.
cricketcounty.com
बीसीसी ने घोषणा केली कि भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील उर्वरीत १-२ दिवसीय सामने हे प्रेक्षकांशिवाय मोकळ्या स्टेडियम मध्ये खेळवण्यात येणार आहेत. म्हणजेच आता प्रेक्षकांना तिकीट काढून हे सामने स्टेडियम मध्ये जाऊन पाहता येणार नाहीयत.
त्याचबरोबर राजकोट मध्ये असलेल्या रंजी चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामनाही प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर रोड सेफ्टीबद्दल एक टी ट्वेंटी सिरीज खेळवली जात आहे. ज्यामध्ये ९० च्या दशकातील दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर उतरले आहेत. या स्पर्धांना खूप मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत आहे.
scroll.in
कारण या स्पर्धांमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रेन लारा, दिलशान, युवराज सिंग, इरफान पठाण अशा प्रकारचे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसत आहेत. पण आता या टीट्वेंटी सिरीज चे उर्वरित सामने प्रेक्षकांसाठी बंद राहणार आहेत. म्हणजे उर्वरीत सामने आता प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार आहेत.
यात खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर आयोजक हि स्पर्धा पुढे ढकलण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे याबद्दलचा अंतिम निर्णय लवकरचं जाहीर केला जाणार आहे. मित्रांनो अशाप्रकारचे आणखी क्रिकेट सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जात आहेत. पण हे सर्व प्रेक्षकांना टीव्ही वरती पाहता येणार आहेत.
navbharattimes.indiatimes.com
त्याचबरोबर कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना काही नियम देखील दिले आहेत. याशिवाय बीसीसीआयने असंही म्हटलं आहे कि केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या आम्ही संपर्कात आहोत. आणि त्यांच्याबरोबर चर्चा करूनच आम्ही अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत.
मित्रांनो कोरोना व्हायरस चा फटका हा पुढील आयपीएल स्पर्धांना देखील बसू शकतो. कदाचित आयपीएल चे हे सामने प्रेक्षकांशिवाय देखील खेळवले जाऊ शकतात. किंवा हि स्पर्धा पुढे देखील ढकलली जाऊ शकते. त्यामुळेच आता आयपीएल बद्दल बीसीसीआय काय निर्णय घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
तर मित्रांनो या बद्दल तुमचं मत काय..? आयपीएल चे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जावेत कि हि स्पर्धा पुढे ढकलली जावी हे आम्हाला नक्की कळवा. आणि हि माहिती पुढे शेअर करायला नक्की विसरू नका.