चहा आणि कॉफी पिण्याआधी पाणी का प्यावे..?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी पिण्याची असते. सकाळी चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. सवय चुकीची अनेकांना याची जाणीव आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला माहितेय का रिकामी पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास याचा आपल्या शरीरावर याचा खूप परिणाम होतो.
कॉफी किंवा चहा पिण्याआधी ग्लासभर पाणी प्यावे याची अनेकांना कल्पना नसते. सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी पिताना पाणी अवश्य प्या. हि सवय खूप आरोग्यदायी आहे. मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल कि चहा किंवा कॉफी पिण्यापुर्वी पाणी का प्यावे..?
तर मित्रांनो चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी पिण्याचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. चहा सुमारे ६ph म्हणजे एसिडिक असतो आणि कॉफी ५ph ऍसिडिक असते. म्हणूनच तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ चहा किंवा कॉफी पिता तेव्हा तुमची ऍसिडिटी वाढते. तसेच कॅन्सर किंवा अल्सर्स सारख्या धोक्याचीही शक्यता असते.
जर तुम्ही चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी पियालात तर पोटातील ऍसिडिटीची पातळी काहीशी सौम्य होते व पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. त्याचबरोबर चहाच्या अधिक ऍसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी पियाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून मदतही होते.
तर मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल कि चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी पिणे किती आवश्यक असते. आम्हाला आशा आहि कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्कीच विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.