2022 मध्ये लाखो करोडोंची संपत्ती कमावणार या 6 भाग्यवान राशी.

2022 मध्ये लाखो करोडोंची संपत्ती कमावणार या 6 भाग्यवान राशी.

नमस्कार मित्रांनो,

मकर रास –
आर्थिक लाभ करून देणारे वर्ष आहे. गुरु शुक्र नव पंचम योग करीत आहेत. प्रतिष्ठा वाढेल. शुभ कार्य घडतील भाग्यात मंगळ बुध शुभ फळ देणारा ठरेल. धार्मिक गोष्टीमध्ये मन रमेल. प्रवास छोटे किंवा मोठे फल देणारे ठरतील. अधिकारी व्यक्तीशी परिचय होतील. आरोग्य ठिक राहील. घरातील शांतता भंग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. उत्तम सप्ताह.

कुंभ रास –
अष्टमात प्रवेश करणारा मंगळ प्रवासात जपून रहा असं सुचवत आहे. कोणाशीही वाद करू नका. शत्रू टपले आहेत. स्थान बदल संभवतो. उच्च शुक्र अनेक प्रकारे भाग्याचे मार्ग मोकळे करेल. करार सफल होतील. आर्थिक बाजू चांगली राहिल. आरोग्य थोडे जपा. काहींना भावंडाची चिंता सतावू शकते. मात्र गुरु सर्व चिंता हरण करेल.

मीन रास –
जोडीदाराला जपा, सोबत प्रवास, खरेदी, खर्च असा साल आहे. अष्टमात येणारा शुक्र उच्च शिक्षण, गूढ शास्त्राची आवड निर्माण करणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. मधुमेही व्यक्तीनी जपून राहावं. शत्रू वर मात करणार आहात. उत्तरार्ध अनुकूल. गुरु उपासना करावी. शुभम भवतु!!

कर्क रास –
चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा शुक्र गृहसौख्य उत्तम देईल. घरात नवीन वस्तू खरेदी कराल. नोकरीसाठी फार चांगला काळ आहे. आईवडील तुमच्यावर फार खूश राहतील. मंगळाचा प्रवेश राशीच्या तृतीय स्थानात होणार आहे. संभाषण चातुर्य कमालीचं वाढेल. वकील, कलाकार यांना उत्तम राहील. पण कटू शब्द, वाद टाळा. त्याने गैरसमज होतील. प्रवास योग आहेत. जरा जपून, गुरू अष्टमात आहे. उपासना करीत रहा.

सिंह रास –
धन स्थानात प्रवेश करणारा मंगळ खर्चात अतोनात वाढ करेल. वाणी कठोर होईल. कुटुंबात कलह होण्याची शक्यता. कटू वचन टाळा. डोळ्याचे त्रास संभवतात. गुरु बळ आहे. त्यामुळे निभावून न्याल. तृतीय स्थानात येणारा शुक्र कलाकारांना शुभ फळ देणारा ठरेल. तुमच्या बुद्धीचा वापर करून एखाद्या नवीन कामाला गती द्याल. पराक्रम व चिकाटी वाढवेल. नवीन कलेमध्ये रुची निर्माण होईल. एकूण मिश्र फळ देणारा साल आहे.

कन्या रास –
राशीत प्रवेश करणारा मंगळ व बुध स्वभाव आक्रमक करतील. प्रकृतीकडे लक्ष असू द्या. स्त्रियांनी काही विशेष तक्रार असेल तर लवकर तपासणी करा. गुरु कृपेचा लाभ होईल. धन स्थानात येणारा शुक्र अतिशय सुंदर फळ देईल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कपडे दागिने खरेदी कराल. गुरु नोकरीसाठी प्रयत्‍न केला तर यश मिळवून देईल. एकूण साल शुभ फळ देईल.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *