घरातील महिलांनी अशा पद्धतीने झोपल्याने येते दारिद्र्य; हे आहे त्यामागील महत्वाचं कारण.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे तसेच आपल्या अनेक धर्म ग्रंथांमध्ये सुद्धा वास्तुशास्त्राचे वर्णन करण्यात आलेले आहे.वास्तुशास्त्रामध्ये एखादी वास्तू , मंदिर कशा पद्धतीने बांधली गेलेली असावी व आपले घर कोणत्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असते व घराची बांधणी करताना कोण कोणत्या दिशा योग्य असतात याबद्दल सविस्तर वर्णन या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत तसेच या शास्त्राचा अभ्यास करून अनेक वास्तू बांधण्यात सुद्धा आलेले आहेत.या वस्तू जगामध्ये प्रसिद्ध सुद्धा आहेत.
वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना घराची दिशा उत्तम असणे गरजेचे आहे.जर आपण चुकीच्या दिशेला घरबांधणी केली तर त्याचा विपरीत परिणाम माणसाच्या जीवनावर होतो आणि मनुष्य जीवनामध्ये अनेक अडी अडचणी येऊ लागतात.अनेक संकटांचा मारा होऊ लागतो. वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घराचे मुख्य द्वार, प्रवेशद्वार स्वयंपाक घर, बाथरूम या प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट दिशा सांगण्यात आलेली आहे आणि जर आपण या आदेशाचे पालन केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख शांती वैभव यांचे आगमन होत असते.
जर आपण आपले घर वास्तुशास्त्रानुसार बांधल्यास आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदते पण त्याचबरोबर घरांमध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास करत असते.आजच्या लेखामध्ये आपण अशाच काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला झोपण्याच्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत तसेच वास्तुशास्त्रामध्ये आपण कोणत्या पद्धतीने झोपले पाहिजे याबद्दल सुद्धा सांगण्यात आलेले आहे विशेष करून आपल्या घरातील महिलांनी कशा पद्धतीने झोपावे आणि यामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम होतो. याबद्दल सुद्धा सांगण्यात आलेले आहे त्याबद्दल आज आपण या लेखामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत.
वास्तुशास्त्रानुसार जर आपण चुकीच्या दिशेला डोके करून झोपल्यास त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर पडतो पण त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा दारिद्रता प्रवेश करते. यामागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहे आणि म्हणूनच अनेकदा वास्तुशास्त्राला वैज्ञानिक शास्त्र सुद्धा मानण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार दिवसभरातून आठ तास झोप आपल्यासाठी चांगले मानण्यात आले आहे परंतु रात्री जास्त काळ जागरण करणे आणि सकाळी उशिरा उठणे हे वास्तुशास्त्रामध्ये चांगले मांनण्यात आलेले नाही, असे केल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते.
ज्या घरातील महिला सकाळी लवकर उठत नाही.या महिलांना जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व त्याच बरोबर त्यांच्या घरामध्ये सुख शांती सुद्धा वास्तव्य करत नाही आणि परिणामी दारिद्रतेला त्यांना सामोरे जावे लागते. सकाळी स्वयंपाक घरामध्ये जाण्याआधीच घर आधी स्वच्छ करायला हवे व त्याचबरोबर आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक घर मध्ये जेवण बनवायला हवे.
जर आपण आंघोळ न करता जेवण बनवले तर जेवण खाणे योग्य राहत नाही व खाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याचे पुण्य लाभत नाही. वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण या मूळ दिशा आहेत. वास्तुशास्त्रात पूर्व दिशा खूपच महत्त्वाची मानली गेली आहे कारण की ही दिशा इंद्र देवाची दिशा मानली जाते तसेच सूर्य सुद्धा पूर्व दिशेला उगवत असल्याने अनेक शास्त्रामध्ये पूर्व दिशेला महत्त्व देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी पूर्व दिशेला डोके करून झोपल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास होतो आणि माता सरस्वती त्यांच्यावर नेहमी प्रसन्न होते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला डोके करून झोपणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे.
घरातील महिलांनी या दिशेला डोके करून अजिबात झोपू नये असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहायला गेले तर आपल्या वर चुंबकीय आकर्षण निर्माण होऊन त्याच्या लहरी आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि म्हणूनच उत्तर दिशेला डोके ठेवून झोपू नये. उत्तर दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि म्हणूनच या दिशेला चुकून सुद्धा झोपू नये त्यानंतरची दिशा म्हणजे दक्षिण दिशा.
दक्षिण दिशेला डोके करून झोपणे शुभ मानली जाते.या दिशेला झोपल्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर या दिशेला झोपल्याने आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा फायदा होतो कारण की आपल्या डोक्यावरून ते पायापर्यंत चुंबकीय लहरीचे वहन होते आणि सकाळी उठल्यावर सुद्धा आपल्या रक्तप्रवाह सुरळीत असतो. पश्चिम दिशेला तोंड करून झोपल्याने संकटांना आमंत्रण दिल्यासारखे असते.
अशा दिशेला तोंड करून झोपणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी संकटे येत असतात. अशा प्रकारच्या व्यक्ती नेहमी उदास असतात. जेवण करताना ज्या व्यक्तीचे मुख पूर्व व दक्षिण दिशेला असते अशा व्यक्तींना नेहमी समाजामध्ये मान-सन्मान मिळतो आणि आपण जे पदार्थ खातो ते आपल्या अंगी सुद्धा लागतात.
आंघोळ करताना सुद्धा आपले मुख पूर्व दिशेला असणे गरजेचे आहे, असे केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांती तर येतेच पण त्याचबरोबर सूर्य देवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आपले मूख उत्तर दिशेला करूनच अभ्यासाला बसला पाहिजे असे मानले जाते की उत्तर दिशेला माता सरस्वती यांचा वास असतो आणि जे लोक व विद्यार्थी उत्तर दिशेला बसून अभ्यास करतात त्यांच्यावर माता सरस्वती नेहमी कृपा वर्षाव करत असतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.