स्त्रिया नारळ का नाही फोडत.? स्त्रियांनी नारळ फोडल्याने काय होते.? जाणून घ्या यामागचं खरं सत्य.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही कोणत्याही मंदिरात जा. तुम्हाला तिथे दिसेल बरेच नारळ फोडतात. मात्र या नारळ फोडणाऱ्यांमध्ये फक्त पुरुषचं असतात. स्त्रिया, महिला या चुकूनही नारळ फोडत नाहीत. बऱ्याचदा आपण आपण पाहतो कि त्या मंदिराचे जे पंडित असतात ते नारळ फोडण्याचं काम करतात. मात्र स्त्रिया या तुम्हाला नारळ फोडताना कधीही दिसणार नाहीत.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजेसाठी श्रीफळाचं असं विशेष महत्व आहे. तुम्ही कोणत्याही देवीदेवतांची पूजा करा त्या पूजे मध्ये नारळ हा आवश्यक असतोच. नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. मित्रांनो असं मानलं जात कि नारळ चढवल्याने आपल्याला पैशा संबंधीच्या समस्या , धन संपत्ती बद्दल समस्या दूर होतात
मित्रांनो नारळाला श्रीफळ असंही म्हटले जाते. मात्र हिंदू धर्माप्रमाणे स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. शास्त्रानुसार स्त्रियांनीं नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य देखील वाटेल आणि रागही येईल. मात्र या मागे एक कथा हि अशी प्रचलित आहे.
हि कथा अशी आहे की जे ब्रह्मऋषि विश्व-मित्र होते त्यांनी या विश्वाची निर्मिती केली. मात्र हे विश्व् निर्माण करण्यापूर्वीच ब्रह्मऋषि विश्व-मित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती. आणि म्हणूनच या नारळाला मानवाचं प्रतिरूप मानलं जात.
नारळ हे बीजरूपी असल्या मुळे ते प्रजनन क्षमतेशी जुळलेलं आहे. म्हणजेच आपण प्रजनन करून जी उत्पत्ती करतो अगदी त्याच्याशी या नारळाचा संबंध आहे. आपल्याला माहिती असेल कि स्त्रिया या बीजरूपातच बाळाला जन्म घालतात. आणि म्हणूनच हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. किंबहुना स्त्रियांनी नारळ फोडणे हे हिंदू शास्त्रांमध्ये अशुभ मानलं जातं.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.