चवळीच्या शेंगासारख्या असणाऱ्या मुली लग्नानंतर लठ्ठ का होतात.? जाणून घ्या याचं खरं कारण..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो लग्नाच्या आधी ८० टक्के मुली या चवळीच्या शेंगासारख्या असतात. पण लग्न झाल्यांनतर त्यांच्यात कमालीचा लठ्ठपणा दिसून येतो. याची नक्की काय कारणे आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो यातील पाहिलं कारण म्हणजे डाएट चेंज. मित्रांनो लग्नानंतर सासरी त्यांच्या आवडीनुसार स्वयंपाक केला जातो. सासरकडची मंडळी जास्त फॅट असलेलं अन्न खात असतील तर लग्न झालेल्या नवीन मुलीलाही जास्त फॅट असलेले अन्न खावे लागते. यामुळे मुलींना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो.
दुसरे कारण म्हणजे हेवी फूड. लग्नानंतर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी नेहमी नॉनव्हेज पदार्थ बनवले जाते. तसेच मित्रमंडळी आणि नातेवाइकांकडेही जेवणाचे आमंत्रण असतात. यामध्ये जास्त कॅलरी असलेले अन्न खाल्ल्यामुळे वजन वाढते.
तिसरे कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस. लग्नानंतर बदलेल्या जीवन शैलीमुळे वेगवेगळे हार्मोनल चेंजेस होत असतात. हे सर्व मुलींच्या वजन वाढीला कारणीभूत ठरतात.
चौथे कारण आहे ते म्हणजे स्वतःकडे लक्ष नसणे. लग्नानंतर मुलींच्या प्राथमिक गरजा बदलतात. सासरकडील कुटुंबातील सदस्य तसेच पतीच्या रूटीन नुसार वागावे लागते. याचमुळे मुलीचे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होते आणि वजन वाढते.
पाचवे कारण आहे ते म्हणजे निष्काळजीपणा. लग्नापूर्वी मुली आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतात. नियमित व्यायाम करतात आणि आपलं शरीर फिट ठेवतात. पण लग्नानंतर बीसी लाईफ मुळे मुली आपल्या शरीराकडे व आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊ शकत नाहीत.
सहावे कारण ते म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणे. नवीन लग्न झालेले कपल रोज संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी घराबाहेर हॉटेलमध्ये जास्त कॅलरी असलेले पदार्थ खातात. यामुळे कमरेजवळ हळू हळू फॅट जमा होतो. आणि आपोआपच लठ्ठपणा येतो.
आणि सर्वात शेवटचे सातवे कारण ते म्हणजे अपूर्ण झोप. लग्नानंतर मुलीच्या झोपण्याची वेळ बदलते. तसेच संपूर्ण रूटीन च बदलले जाते. यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. आणि काई झोपेमुळे वजन वाढू लागते.
तर मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.