शनिवारी काय करावे, काय करू नये; ९९% लोकांना माहित नसलेलं खरं सत्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शनिवारी काय करावे व काय करू नये याबद्दल अनेकांना माहिती नसते. शनिवार हा शनी देवाचा वार आहे आणि या दिवशी अशी काही कामे करू नयेत ,ज्यामुळे शनिदेव आपल्यावर नाराज होतील आणि शनिदेव प्रसन्न होतील अशी कार्य शनिवारी आपल्या हातून झाली पाहिजेत.सौर मंडळ मधील ग्रह आपल्या जीवनावर प्रभाव निर्माण करत असतात.
ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळी ग्रह नेमक्या कोणत्या दशांमध्ये आहेत त्या सर्वांचा परिणाम आपल्यावर होत असतो, याच कुंडलीवर आपले पुढील संपूर्ण आयुष्य अवलंबून असते. हा ज्योतिष शास्त्राचा नियम आहे ते जसे आपण पुढे जातो तेव्हा आपल्या हे लक्षात येते की वेगवेगळ्या ग्रहांचे ज्याची त्याची काही विशेष आवड निवड आणि स्वभाव असतात ज्यावर आपले जीवन अवलंबून असते.
तसे पहायला गेलो तर सर्व नवग्रह प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचे असतात परंतु शनीदेवाची वेळ येते त्यावेळी प्रत्येक जास्त सजग होतात कारण शनी देव हे न्यायाचे देवता आहेत ,त्यांनी मनात आणले तर ते भिकाऱ्याला ही राजा बनवू शकतात परंतु जर त्यांची वक्र दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर भिकारी व्हायला वेळ लागत नाही. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी राईचे तेल व तिळाचे तेल एकत्र करून शनिदेव यांना हे तेल अर्पण करावे असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिवारी जर काही खरेदी करायची असेल तर शनिदेवांचा विचार करून मगच खरेदी करावी. शनिवारी लोखंडाचे खरेदी करू नये.
शनिवारी मिठाची खरेदी केल्यास दारिद्र्य येते. शनिवारी लाकडाची खरेदी करणे ही नुकसानदायक समजले जाते. शनिवारी रईचे तेल खरेदी करू नये पण तुम्ही हे राईचे तेल दान करू शकता पण हे तेल खरेदी करू नये. शनिदेवांना काळे उडीद वाहिले जातात म्हणून काळे उडीद ,काळे तीळ सुद्धा शनिवारी खरेदी करू नयेत तसेच शनिवारच्या दिवशी चप्पल सुद्धा विकत घेऊ नये त्याचबरोबर काळे कपडे सुद्धा शनिवारी विकत घेऊ नये.
कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक वस्तू किंवा छत्री यांची खरेदी शनिवारी करू नये यापैकी काही वस्तूंची तुम्हाला खरेदी करायचीच असेल तर एक दिवस अगोदरच त्या वस्तूंची खरेदी करून घ्यावे कारण शनिवारी ज्या वस्तूंची खरेदी करण्यास मनाई केली आहे त्या वस्तूंची खरेदी कधीही करू नये यामुळे शनि देव नाराज होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे संपूर्ण सृष्टीचे न्यायदेवता मानले जातात आपल्या कर्माचे फळ आपल्याला देतात.
ज्या व्यक्तींचे कर्म वाईट असतात त्यांच्यासाठी शनिदेव वाईट फळे देतात आणि कोणत्याही कार्यात त्यांना यश मिळत नाही त्या बरोबरच जीवनात अडचणी वाढतात आणि म्हणूनच या दिवशी अशी कामे करण्यापासून वाचले पाहिजे. शनिदेवाच्या वाईट दृष्टी पासून आपल्याला वाचायचे असेल व त्याचबरोबर शनि देवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर शनिवारच्या दिवशी गरीब लोकांना अन्नदान करायला हवे.
वस्त्र दान करावे.कुणाचा अपमान करू नये यामुळे शनि देव नाराज होऊ शकतात म्हणून कधीही शनिवारी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे व मगच पुढे जावे. शनिवारी कधीही कोणाकडूनही भेट म्हणून चपला किंवा बूट घेऊ नये. शनिवारी किंवा बुटांचे दान केल्याने आपल्या कुंडलीत शनि दोष निघून जातो. शनिवारी पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे शुभ असते परंतु सूर्योदयापूर्वी केलेल्या पिंपळाच्या पूजनाचे लाभ कितीतरी पटीने अधिक मिळतात.
शनिवारी देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी पिंपळाच्या झाडावर असली तरीही सूर्योदयापूर्वी आपल्यावर तिचा काहीही प्रभाव पडत नाही म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पिंपळाचे पूजन करावे परंतु हे पूजन सूर्योदयापूर्वी करावे व उत्तम फळाचे प्राप्ती करावी. तीळ दान हे सर्वोत्तम मानले जाते. जर ही वरील कामे तुम्ही शनिवारी कराल तर निश्चितच शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील व त्यांची शुभ फले आपल्याला मिळतील आणि आपल्या घरात शांतता व समाधान सदैव राहील आणि शनी देवाचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळत राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.