कोल्ड्रिंक प्यायल्याने शरीरामध्ये काय होते.? जर तुम्हाला सुद्धा या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर हा लेख अवश्य वाचा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोल्ड्रिंग तर आपल्या सर्वांचा जीव की प्राण आहे. आपण अनेकदा बाहेर गेल्यावर कोल्ड्रिंग पित असतो घरी कोणी पाहुणे आले तरी आपण त्यांना सुरुवातीला कॉल्ड्रिंकस प्यायला देत असतो परंतु हे कोल्ड्रिंक्स आपल्या शरीराला चांगले असते का? त्याचा काही आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो का? हे जाणून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते.हे प्यायल्याने त्या जीवाला शांतता, थंडावा मिळत असतो परंतु पोटाच्या आत मध्ये गेल्यावर त्याचा काही उपयोग होतो का.? हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
अनेकदा दूरचित्रवाणीवर रेडिओवर वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या जाहिराती पाहत असतो. या सगळ्या जाहिराती आपल्याला आकर्षित करत असतात आणि म्हणूनच आपण अनेकदा या जाहिरातींना भुलून त्यांना बळी पडून आपण वेगवेगळ्या ब्रँडचे कोल्ड्रिंक्स विकत घेत असतो आणि आपली तहान भागवतो.या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला कोल्डड्रिंक्स बद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत ,ही माहिती जाणून घेतल्यावर तुम्ही भविष्यात कोल्ड्रिंक पिणार की नाही पिणार याची खात्री नाही म्हणून आपल्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला नक्कीच काही तरी चांगल्या गोष्टी सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
आपल्या जीवाला बरे वाटावे म्हणून आपण थंड कोल्ड्रिंक पीत असतो परंतु हेच थंड कोल्ड्रिंक शरीरामध्ये गेल्यावर त्याचा आपल्यावर काय विपरीत परिणाम होतो याबद्दल कोणी विचार केला आहे का? अनेकदा कोल्ड्रिंक्स मध्ये काही पदार्थ असतात, त्यातील शुगर पदार्थ असतो परंतु शुगर फक्त नावापुरता असते पण यामध्ये अजून सुद्धा असे काही घटक पदार्थांचे आपल्या शरीराला विपरीत परिणाम करत असतात.
अनेकदा आपल्या मनामध्ये एक गोष्ट बिंबलेली असते की त्याने आपल्या पोटातील गॅस बाहेर निघतो परंतु तसे नाही आहे. कोल्ड्रिंक बनवण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा वापर केला जातो येथे पाणी म्हणजे आपल्या घरातील साधे पाणी नाहीतर कार्बोनेट वॉटर जे असते त्याचा वापर केला जातो. यालाच सोडावॉटर नावाने सुद्धा ओळखले जाते.
हे अशा प्रकारचे पाणी असते ज्यामध्ये कार्बन-डाय-ऑक्साईड आधीच मिसळलेला असतो. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड आपल्या शरीरामध्ये गेल्यावर त्याने आपल्या शरीरावर कब्जा केला जातो आणि हाच गॅस बाहेर पडण्यासाठी मदत होतो आणि आपल्या सर्वांना असे वाटते की आपल्या पोटातील गॅस बाहेर पडत आहे. कोल्ड्रिंक असे एक ड्रिंक आहे की जे पचवण्यासाठी अगदी सहज असते म्हणून ते आपल्या शरीराला र”क्ता”पर्यंत सहजरित्या पोहोचते. कोल्ड्रिंक्स मध्ये 40 ते 50 ग्रॅम साखर उपलब्ध असते जर आपण पाहायला गेले तर साधारणतः सात ते आठ चमचे साखरेचे एवढी साखर कोल्ड्रिंक्स मध्ये उपलब्ध असते.
जेव्हा जास्त प्रमाणामध्ये साखर आपल्या शरीरामध्ये जाते तेव्हा आपल्या शरीरातील इन्शुलिन नावाचा घटक बाहेर पडण्यासाठी येत असतो यामुळे म*धु”मे”ह यासारखे आजार होण्याची शक्यता सुद्धा असते. जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने आपल्याला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते आणि यामुळे ल”ठ्ठ”प”णा वाढण्याची शक्यता निर्माण होते. साखरेचे अतिक्रमण यामुळे आपल्या पोटातील चांगले जीव नष्ट होतात आणि यामुळे आपली पचन संस्था चांगल्या पद्धतीने कार्य करू लागत नाही त्याचा विपरीत परिणाम पचनसंस्थेवर होतो आणि कालांतराने आपल्या पोटाच्या समस्या वाढू लागतात.
कोल्ड्रिंक मध्ये अनेक रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो, त्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड चा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. यामुळे साखरेची चव कमी होते पण त्याच बरोबर कोल्ड्रिंक्स ला विशेष चव प्राप्त करण्याचे कार्य सुद्धा फॉस्फरिक ऍसिड च्या माध्यमातून केले जाते. हे रासायनिक पदार्थामुळे आपल्या शरीरातील हाडांचे विघटन होऊ लागते आणि कालांतराने आपल्या शरीरातील कॅल्शियम ची मात्रा हळूहळू कमी होऊ लागते.
आपल्याला गु”डघे संबंधित विविध आजार होण्याची शक्यता असते. कोल्ड्रिंक्स मध्ये कार्बोनिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड फॉस्फरिक ऍसिड यासारखे वेगळे उपलब्ध असल्याने आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. जेव्हा हे तिन्ही पदार्थ एकत्र येतात तेव्हा त्यांचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो म्हणजे जेव्हा आपण हे कोल्ड ड्रिंक्स पीत असतो तेव्हा त्याच्या थर आपल्या दातांवर जमा होऊ लागतो आणि हा थर दातावर जमा झाल्यामुळे आपल्या दातांवरील जो भाग आहे तो हळूहळू कमजोर होऊ लागतो.
कालांतराने दात किडू लागतात व दातावरील जो पृष्ठभाग असतो तो पातळ होऊ लागतो यामुळे भविष्यात आपल्याला दातांच्या समस्या उद्भवू लागतात. कोल्ड्रिंक ला सॉफ्ट ड्रिंक सुद्धा म्हटले जाते परंतु हे सॉफ्ट ड्रिंक अनेकदा अशा पद्धतीने आपल्या शरीरावर कार्य करते ते कधी शरिराची वाट लावेल हे सुद्धा आपल्याला कळत नाही त्याचबरोबर वारंवार कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आपल्या शरीराला व्यसन सुद्धा लागते आणि यामध्ये कॅफिन नावाचे घटक असल्याने आपल्याला फ्रेश वाटते परंतु त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि यामुळे तुमची झोप तर उडतेच पण शरीराच्या कार्यपद्धतीवर सुद्धा ताण निर्माण होतो.
म्हणून जर तुम्ही सुद्धा जास्त प्रमाणामध्ये कोल्ड्रिंकचे सेवन करत असाल तर आत्ताच थांबवा अन्यथा तुम्हाला भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. जर तुम्हाला तुमच्या आरोग्य चांगले ठेवायचे असेल शरीराची संस्था चांगल्या पद्धतीने कार्य करावी अशी वाटत असेल तर आजपासूनच कोल्ड्रिंक पिणे कमी करायला हवे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.