दातांमधील घाण आणि कीड घालवण्यासाठी करा हा जबरदस्त उपाय.!

दातांमधील घाण आणि कीड घालवण्यासाठी करा हा जबरदस्त उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आपले व्यक्तिमत्व सुंदर दिसण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतो. आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी व सुंदर दिसण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात त्यातील एक महत्त्वाचे घटक म्हणजे आपले दात. आपला चेहरा जसा आपण स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपले दात स्वच्छ करणे गरजेचे आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण आपल्या चेहर्याची इस्माईल म्हणजेच हास्य देत असतो यावरूनच आपले दात व आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसते म्हणूनच प्रत्येक जण दात स्वच्छ दिसण्यासाठी वेगळे उपाय योजना करत असतात.

परंतु काही केल्या जात आपले स्वच्छ होत नाही आणि आपल्या दातांवर पिवळा थर तसाच राहतो. आपल्यापैकी अनेक जण दिवसभरातून दोन ते तीन वेळा दात घासतात परंतु पिवळा थर काय जाण्याचे नाव घेत नाही. जर तुम्ही सुद्धा अनेक उपयोग करत असाल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ही माहिती वाचल्याने तुम्ही तुमचे दात लवकर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न कराल, चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल..

आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या दातांची काळजी घेत असतो आणि दातांची काळजी घेत असताना दिवसभरातून अनेकदा दात ब्रश ने सुद्धा घासत असतो परंतु तरीही दातांवर पांढरा थर जमा होतो.हा थर जमा होतो कारण की अनेकदा आपण जे काही पदार्थ खातो त्या पदार्थांमुळे त्यात प्रोटीन असते आणि आपल्या दातातील कीड त्या प्रोटीनचे सेवन करतात आणि कालांतराने आपल्या दातांच्या वर व आत मध्ये एक पांढरा थर जमा होतो त्याला प्लाकर असे म्हणतात खरे तर हे एक पांढरी थर असते परंतु हा थर जास्त वाढल्यावर आपल्याला पिवळसर दिसू लागतो.

हा थर ब्रश केल्याने निघतो परंतु अनेकदा आपण घाई घाई मध्ये व दातांच्या आतील बाजूला ब्रश न केल्यामुळे सुद्धा याचा थर जमा होतो आणि कालांतराने दात पिवळे होऊ लागतात. आपले दात पिवळे होऊ लागतात त्याला टारटर असे म्हणतात. हे दूर करण्यासाठी आपण अनेकदा डेटिंस्ट वर अवलंबून राहतो परंतु हे लवकर आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तसतसे यांचा थर वाढू लागतो आणि जेव्हा आपण गोड पदार्थ चॉकलेट यासारखे पदार्थ सेवन करतो त्यामुळे हे थर अजूनच आपल्या दातांवर जमा होऊ लागतात.

जसे आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तसे आपल्या दातांवर इनॅमल म्हणजेच दातावरील जो भाग असतो तो पातळ होत जातो आणि कालांतराने त्यामध्ये कीड निर्माण होऊ लागते. जेव्हा दातामध्ये काळसरपणा निर्माण होतो अशा वेळी दात असतो तो पोकळ होत गेलेला असतो आणि दाताला कीड लागली आहे असे आपण म्हणू शकतो. या सर्वांपासून सुद्धा आपण सुटका मिळू शकते.

त्यासाठी आपण जो उपाय करणार आहोत तो अत्यंत साधा सोप्पा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या तीन पदार्थ लागणार आहे.असे पदार्थ म्हणजे टमाटर मीठ आणि संत्र्याचे साल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला संत्र्याची साल आणि टमाटर मिक्सरमध्ये बारीक वाटून द्यायचे आहे आणि त्यानंतर हे मिश्रण काढून आपल्याला थोडेसे ब्रशवर लावायचे आहे आणि त्यावर थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि त्याने आपल्याला दात घासायचे आहे ,ज्या ठिकाणी पिवळा थर निर्माण झालेला आहे अशा प्रभावित जागेवर आपल्याला ब्रश करायचा आहे.ब्रश सावकाश करायचा आहे कोणत्या प्रकारची ताकद आपल्याला लावायची नाही.

पाच ते सहा मिनिट चांगल्या पद्धतीने दात घासल्यानंतर आपल्याला आपण जे नियमित पणे टूथपेस्ट लावतो त्या पेस्टने दात घासायचे आहे असे केल्याने आपल्या दातावरिल थर लवकरच दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर संत्र्याची साल आणि टमाटर यामध्ये विटामिन सी ची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यामध्ये ॲन्टीऑक्साईड गुणधर्म सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच स्टार्टर निर्माण करणाऱ्या जंतूंना लढण्यासाठी मदत होते आणि परिणामी आपल्या दातांना कीड सुद्धा लागत नाही.

जर अशा पद्धतीने आपण हा उपाय सातत्याने तीन दिवस केला तर तुमच्या दाता वरील पिवळे थर व काळसरपणा लवकरच दूर होण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर आपण दुसरा उपाय करणार आहे त्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे ते म्हणजे नारळाचं तेल, बेकिंग सोडा आणि मीठ. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा नारळाचे तेल अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि दोन चुटकीभर मीठ घ्यायचे आहे.

त्यानंतर हे मिश्रण एकजीव केल्यावर आपल्याला हाताने व ब्रशने सुद्धा आपण बसू शकतो बेकिंग सोड्याचा वापर पूर्वीच्या काळापासून दात घासण्यासाठी करण्यात येतो असे केल्याने आपल्या दातांवर जो पिवळा थर जमा झालेला आहे तो लवकरच निघण्यासाठी मदत होते. हे एक अँटासाईड म्हणून काम करते व आपल्या तोंडाची पीएच लेवल सुद्धा नियंत्रणात राहते आणि यामुळेच आपल्या तोंडाची दुर्गंधी सुद्धा बाहेर येत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *