जर चेहऱ्यावर झाले असतील पांढरे डाग तर करा हा उपाय; काही दिवसात त्वचा होईल पहिल्यासारखी.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारत देश हा विविध वनस्पती, प्रजातींचा देश मानला जातो. या देशांमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीचा आपल्याला साठा उपलब्ध होत असतो आणि या वनस्पतीच्या आधारेच आपण आपले जीवन व्यतीत करत असतो परंतु आपल्या आजूबाजूला अशा काही औषधी वनस्पती असतात याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते.
या वनस्पती कडे आपण फक्त शोभेच्या वनस्पती म्हणून पाहत असतो म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्या वनस्पती आहेत त्यांचा औषधी दृष्टिकोनातून जास्तीत जास्त वापर करण्याचा नेहमी प्रयत्न कराल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
आज आपण ज्या वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत या वनस्पतीचे नाव आहे घाणेरी.ही वनस्पती अनेकदा आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते. या वनस्पतींच्या वापराने आपल्या शरीरावर जे काही सफेद डाग निर्माण झालेले असतात, ते सफेद डाग पूर्णपणे नष्ट होतात. हा एक प्रकारचा त्वचा विकार आहे आणि या त्वचा विकारांमध्ये मानवाच्या शरीरावरील वेगवेगळ्या भागांवर पांढरे डाग पाहायला मिळतात यालाच आपण कोडे पडले असून सुद्धा म्हणतो.
खरेतर हा आजार कुणालाही कधीही होऊ शकतो परंतु जर तुम्हाला हा आजार झालेला असेल तर घाबरण्याचे कारण नाही. सुरुवातीला डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेत असताना आपण अशा अनेक आयुर्वेदिक वनस्पती चा सुद्धा वापर करू शकतो, ज्यामुळे तुमच्या शरीरावर हे जे काही पांढरे डाग पडलेले आहेत त्याची तीव्रता व मात्रा कमी होऊ शकते.
ही वनस्पती प्रामुख्याने आपल्याला गवताळ भागात जास्त पाहायला मिळते. या वनस्पतीचे फळ विषारी असते म्हणून बकरी व इतर प्राणी अजिबात खात नाही. गावी या वनस्पतीचा उपयोग डासांपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो म्हणून अनेकदा आपल्याला घराच्या आजूबाजूला ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. ही जर वनस्पती तुमच्या आजूबाजूला असेल तर डास आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही.
जर एखाद्या व्यक्तीला मा”य”ग्रे”न सा”य”न”स आजार असेल तर अशा व्यक्तीने या वनस्पतीच्या पानांचा लेख तयार करून कपाळावर लावल्याने या समस्येपासून सुटका मिळतो. बहुतेक वेळा आपल्याला सर्दी झाल्यामुळे आपले नाक बंद झालेले असते, जर अशा वेळी आपण या वनस्पतीचे एक पान चोळून त्याचा वास घेतला तरी आपले नाक मोकळे होऊन जाते एवढी प्रचंड शक्ती या पानांमध्ये असते.
या वनस्पती चे पान हिरवेगार असते आणि फळ फुल हिरवे ,गुलाबी, निळ्या रंगाचे असतात. या वनस्पतीच्या सहाय्याने आपण आपल्या शरीरावर जे काही पांढरे डाग निर्माण झालेले आहेत त्यावर उपचार करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घाणेरीच्या सात ते आठ पानांचा वापर करायचा आहे. काही फळे व त्याच्या बिया यांचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो.
हे सारे आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या साह्याने बारीक वाटून घ्यायचे आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या अंगावर पांढरे डाग निर्माण झालेले आहेत त्या ठिकाणी ही पेस्ट आपल्याला लावायची आहे.
रात्रभर आपल्याला पेस्ट तशीच ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचे आहे, असे जर आपण महिनाभर जरी केले तरी आपल्या अंगावरील काळे डाग पांढरे डाग पूर्णपणे कमी होण्यासाठी मदत होणार आहे.हा उपाय करताना आपल्याला वेळ लागेल कारण कोणताही त्वचाविकार मुळापासून नष्ट होण्यासाठी त्याला वेळ लागतो आणि म्हणूनच हा उपाया चा परिणाम प्राप्त करताना आपल्याला जास्त दिवस सुद्धा लागू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.