जर तुमच्या हाडांमधून कटकट आवाज येत असेल तर आजच खाण्यास सुरुवात करा हे तीन पदार्थ.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले आयुर्वेदिक शास्त्र खूप संपन्न आहे परंतु आपण आयुर्वेदिक शास्त्राचा अभ्यास न करताच मेडिकल सायन्स कडे आलेलो आहोत आणि आपल्या सर्वांना लवकर बरे व्हायचे असते, अशा वेळी आपण आयुर्वेदिक शास्त्राकडे अनेकदा दुर्लक्ष करतो आणि मेडिकलमध्ये जाऊन व डॉक्टरांकडे जाऊन खूप सारे औषध खात असतो. हे सगळे औषध खाल्ल्याने आपल्याला त्वरित फरक जाणवतो पण त्यानंतर आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होताना पाहायला मिळतो.
आपल्यापैकी अनेकांना सांधे दुखी, कंबर दुखी, मानदुखी समस्या उद्भवत असतात. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या शास्त्रामधील एक महत्त्वाचा उपाय आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते अतिशय साधे सोपे व सहज रित्या उपलब्ध होणार आहेत चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल..
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकांना सांधेदुखी, कंबर दुखी, मान दुखी, हाडांच्या समस्या, हाडांमधून कटकट आवाज येणे व वाताच्या समस्या उद्भवत असतात या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या तेलांचा वापर सुद्धा करतात परंतु काही केल्या आपल्याला फरक जाणवत नाही म्हणूनच आज आपण एक प्रभावी उपचार जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे काळी तीळ.तीळ ही उष्णता प्रदान करणारी असते आणि म्हणूनच अनेकदा या तीळ चा उपयोग आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो. आपल्यापैकी अनेक जण या तेलाचे वापर करून आपल्या केसांची निगा राखत असतात. जर तुमचे केस गळत असतील, केसांमध्ये कोंडा झाला असेल, केस वारंवार तूटत असतील तर अशा वेळी सुद्धा हे तेल अत्यंत महत्त्वाचे ठरते. हा उपाय करण्यासाठी आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे अळशीच्या बिया.
अळशीच्या बिया या सुद्धा किराण्याच्या दुकानात सहज उपलब्ध होऊन जातात यामध्ये लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन्स उपलब्ध असतात. तसेच यामध्ये ओमेगा फॅटी एसिड असेल उपलब्ध असते आणि हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. हा उपाय करण्यासाठी आपल्या तिसरा पदार्थ लागणार आहे ती म्हणजे पांढरे तीळ. पांढरी तीळ सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे तसेच ही तीळ सुद्धा किराण्याच्या दुकानात सहज उपलब्ध होते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला पांढरे तीळ आधी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या साहाय्याने त्याची बारीक पावडर करायचे आहे. ही पावडर आपण दिवसभरातून एकदा दुधासोबत सेवन केली तर आपल्या शरीरातील हाडांची मजबुती तर होतेच पण त्याचबरोबर हाडांचा आवाज सुद्धा येत नाही. बहुतेक वेळा आपल्या हाडमधील वंगण संपल्यामुळे सुद्धा हाडांचा आवाज येऊ लागतो.
जर आपण दुधामध्ये एक चमचा तीळ पावडर टाकून सेवन केले तर आपल्याला फरक जाणवतो त्याचबरोबर अळशी थोडेसे भाजून आपण रात्री झोपतांना चावून चावून खाल्ल्याने सुद्धा त्याचा अर्क आपल्या शरीरामध्ये उतरतो यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम ची मात्रा संतुलित राहते आणि परिणामी आपली हाडे मजबूत राहतात.
आपण रात्री झोपताना एक चमचा अळशीच्या बिया टाकून सुद्धा ठेवू शकतो आणि हे पाणी सकाळी उपाशी पोटी सेवन केल्याने आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर आपण जी काळी तीळ घेतली आहे ते सुद्धा आपण भाजून व त्याची पावडर करून सकाळी उपाशीपोटी पाण्यामध्ये चमच्या पावडर बनवून प्यायले तर आपल्या शरीराला लवकर फरक जाणवतो त्याचबरोबर जर आपल्या शरीरांमध्ये कोणत्याही प्रकारचे विषारी घटक निर्माण झाले असतील तर ते बाहेर पडण्यास मदत होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.