तोंडली चे हे फायदे लाखो रुपये खर्च करून सुद्धा मिळणार नाहीत; आरोग्यासाठी खूपच वरदान आहे तोंडली.!

तोंडली चे हे फायदे लाखो रुपये खर्च करून सुद्धा मिळणार नाहीत; आरोग्यासाठी खूपच वरदान आहे तोंडली.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निसर्गाने माणसाला भरभरुन दिलेले आहे. निसर्गामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत की त्याच्या माध्यमातून मनुष्य आपले जीवन समृद्ध करू शकतो. काही वनस्पती इतके आयुर्वेदिक आहेत की त्यांच्या सेवनाने आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होत असते तसेच अनेक वनस्पती चे पान ,फळ, फूल, बिया या सुद्धा इतके प्रभावी असतात की आपल्या शरीरावर त्यांचा मोठा प्रभाव आपल्याला दिसतो अशाच एका वनस्पती बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाची मानली गेलेली आहे पण त्याचबरोबर अनेकदा या वनस्पतींच्या फळाची भाजी सुद्धा बनवली जाते आणि ही भाजी चवीला अत्यंत स्वादिष्ट असते. ही भाजी आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होते चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आजच्या या लेखामध्ये आपण ज्या वनस्पतीच्या भाजी विषयी व फळा विषयी जाणून घेत आहोत त्याचे नाव आहे तोंडली. तोंडली ही बाजारामध्ये सहज उपलब्ध होते आणि आपल्यापैकी अनेक जण तोंडलीची भाजी वेगवेगळे मसालेदार पदार्थ टाकून चविष्ट बनवत असतात परंतु ही भाजी चवीला उत्कृष्ट आहेत पण त्याचबरोबर या भाजीचे औषधी गुणधर्म सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. ही वनस्पती जेव्हा उगवते तेव्हा आपल्याला हिरव्या रंगाचे फळ प्राप्त होते तसेच कधीकधी हे फळ पिकल्यावर आतून लाल दिसते परंतु हिरवे फळांमध्ये जास्त औषधी गुणधर्म आपल्याला प्राप्त होत असतात. हे फळ ज्या व्यक्तींना डायबिटीस जास्त प्रमाणामध्ये आहे अशा व्यक्तीने या फळाचे नेहमी सेवन करायला पाहिजे तसेच आपल्या आहारामध्ये या भाजीचा सुद्धा समावेश करायला हवा.

जर आपल्या शरीरावर कुठेही जखम झाली असेल तसेच कोणताही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल, खाज, खरुज, नायटा अशा वेळी आपण या वनस्पतींच्या पानांची पावडर व पानांचा लेप प्रभावी जागेवर लावल्यास आपल्याला त्वरित फरक जाणवतो. जर आपल्या शरीरामध्ये चरबीची गाठ निर्माण झाली असेल तर अशा वेळी खोबरेल तेलामध्ये हे पान चांगल्या पद्धतीने उकळून या तेलाने आपण मालिश केल्याने आपल्या शरीरातील गाठ सुद्धा वितळण्यास मदत होते.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना सांधेदुखी, कंबर दुखी ची समस्या उद्भवत असतात अशावेळी आपण मोहरीच्या तेलामध्ये या वनस्पतीचे पान चांगल्या पद्धतीने उकळून व तळल्यास आणि हे तेल आपण आपल्या सांध्यांना लावल्यास सांधेदुखी लवकर बरी होते आणि त्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढल्याने तोंड येऊ लागते अशा वेळी सुद्धा जर आपण तोंडली चावून चावून खाल्ल्यास आपले तोंड व्यवस्थित होऊन जाते.

तसेच या फळांमध्ये अँटी अँटिऑक्सिडंट व गुणधर्म असल्याने आपल्या शरीरावर कोणतीही जखम लवकर भरून जाते तसेच या वनस्पतीच्या पानांमध्ये अँटी फंगल गुणधर्म असल्याने आपल्या शरीरावरील खाज खरुज लवकर बरी होते म्हणूनच प्रत्येकाने ही भाजी आपल्या आहारामध्ये अवश्य समाविष्ट करायला हवी तसेच या भाजीच्या सेवनाने आपल्या शरीरातील शुगर ची पात्रता व पातळी सुद्धा नियंत्रणात राहते म्हणून जर हे फळ तुम्हाला कुठे उपलब्ध झाल्यास या फळाची भाजी अवश्य खा आणि आपले आरोग्य चांगले बनवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *