या कारणामुळे घरात येते कायमची गरिबी; ९९% लोकांना याबद्दल माहीतच नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घरात गरिबी येण्याचे काही महत्त्वाची कारणे आज आपण जाणून घेणार आहोत.खरे तर प्रत्येकाला मोठे व्हायचं असतं,यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येक जण प्रचंड प्रमाणावर मेहनत सुद्धा करत असते.परंतु एवढ्या सगळं करून सुद्धा प्रचंड मेहनत काबाडकष्ट करून सुद्धा एखाद्याच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही. माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नेहमी रुष्ट असते. याचे कारण म्हणजे आपल्या हातातून कळत-नकळत घडणाऱ्या काही प्रकारच्या चुका.
अशी ही काही कामे केल्याने आपल्या हातून चुका होत राहतात.वास्तुशास्त्रानुसार हे कामे केल्यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तु दोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्ती च्या घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य लागते ,दारिद्रता निर्माण होऊ लागते आणि मग आपण आपल्या भाग्याला दोष देत असतो. आपल्या नशिबाला बोल लावत असतो.चला तर मग जाणून घेऊया नेमकी ही कारणे कोणती आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यात गरिबी दारिद्रय आता निर्माण होते.
घरामध्ये दारिद्र्य येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे जे आपल्या हातून कळत नकळत करत असतो ते कारण म्हणजे लसूण आणि कांदा यांचे जे आवरण आहे त्याला आपण छीलके असेसुद्धा म्हणतो किंवा त्याला आपण मराठीमध्ये पापुद्रे असे सुद्धा म्हणतो. हे पापुद्रे चुकूनही जाळू नयेत.ज्या घरामध्ये लसूण व कांदा यांचे पापुद्रे जाळले जातात, अशा घरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केतू दोष निर्माण होतो.
लसूण व कांदा या दोन वस्तूंचा थेट संबंध केतु ग्रहाशी आहे म्हणून जेव्हा आपण लसूण व कांदा यांचे पापुद्रे घरामध्ये जाळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दोष निर्माण होतात. घरामध्ये पैसा येत नाही व घरात असलेल्या पैसा टिकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे झाडू कधी खरेदी करू नये. हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.जर कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नसेल तर अशावेळी गुरुवारच्या दिवशी कधीही चुकून झाडू खरेदी करू नये.
गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीविष्णूला अर्पित केलेला दिवस आहे. या दिवशी झाडू ची खरेदी करणे कटाक्षाने टाळा.तिसरी गोष्ट म्हणजे जर सूर्य मावळल्या नंतर तुमच्याकडे कोणी काही वस्तू मागितल्या तर काही वस्तूंना वगळता त्या देण्यास नकार देऊ नये म्हणजे रात्री त्या वस्तू अवश्य द्याव्यात. त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर दोष निर्माण होत राहतात. यामध्ये काही गोष्टी अपवाद आहेत, त्या गोष्टी चुकून सुद्धा द्यायच्या नसतात.
चौथी सर्वात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट आहे ती म्हणजे स्मशानभूमीमध्ये हसणे. प्रत्येक ठिकाणाची स्वतःची अशी एक विशिष्ट ऊर्जा असते. स्मशानभूमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते. म्हणून जर तुम्ही कळत नकळत जर स्मशानभूमी मध्ये हसला तर त्याचा आपल्या नशिबावर भाग्या वर विपरीत परिणाम होतो.पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी व्यक्ती आपल्या वयापेक्षा मोठे आहेत.
आपले आई-वडील आहेत व आपले नातेवाईक आहेत त्यांच्या सोबत चुकीचे वर्तन करणे. त्यांचे मन दुखावणे एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की कोणत्याही व्यक्तीचे मन कधीही दुखवलं असेल तर लगेच क्षमा मागा कारण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचे मन दुखावले असेल तर त्या व्यक्तीचे मन तुम्हाला नेहमी शिव्या शाप देत असते त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते म्हणून जर तुमच्या कडून असे काही झाली असेल तर त्वरित क्षमा मागा आणि विषय तिथेच संपवा.
कारण या सगळ्या गोष्टी मुळे दुखावलेलं मन तुम्हाला नेहमी श्राप देत असतं आणि या सर्वांचा परिणाम तुमच्या नशिबावर होत असतो म्हणून शक्यतो सगळ्यांशी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये त्यांना सामील करून घ्या, असे केल्यामुळे त्यांचे मन तुम्हाला नेहमी शुभ आशीर्वाद देत राहील. जर तुमच्या घरा मध्ये कितीही केल्या तरी गरीबी जात नसेल तर अशावेळी तुमचे जे केस आहे त्यांना चाळीस दिवसाच्या कक्षा जास्त अधिक राखू नका ४० दिवसाच्या आत ते कापा.
अनेकांना घरामध्ये जुन्या वस्तू तुटलेल्या वस्तू साठवून ठेवण्याची आवड असते परंतु घरामध्ये खूप दिवसापासून जर वस्तू डून असल्यास त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते आणि या सर्वांचा परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरा मध्ये राहतेस त्याचबरोबर या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या जीवनावर सुद्धा होत असतो म्हणूनच अशा वेळी तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत राहतात. घरांमध्ये सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडतो ,कटकटी, भांडण इत्यादी सारख्या समस्या वारंवार घडू लागतात म्हणून या जुन्या तुटलेल्या भंग पावलेल्या वस्तू घरामध्ये अजिबात ठेवू नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.