स्वस्तिक काढताना तुम्ही या चुका करत नाही ना?

स्वस्तिक काढताना तुम्ही या चुका करत नाही ना?

नमस्कार मित्रांनो,

आपल्याला माहित आहे की, स्वस्तिकाला हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल जात. त्याबद्दल हिंदू धर्मामध्ये मोठी श्रद्धा देखील आहे. स्वस्तिक हे केवळ भारतात नाही तर जगातील इतरही देशांमध्ये काढल्या जातात.

स्वस्तिकाचा अर्थ असा असतो कल्याण असो म्हणजे जिथे जिथे ही स्वस्तिक काढलं जातं त्या ठिकाणी त्या सर्वांचं कल्याण होऊ दे. ती वास्तू सुद्धा शुद्ध होऊ दे. स्वस्तिकामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. म्हणूनच शांती समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून स्वस्तिकाचा वापर केला जातो.

कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्याआधी त्या ठिकाणी स्वस्तिक काढलं जात. स्वस्तिकाचे चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आहेत आणि स्वस्तिकाचे जे चार बाहू आहेत ते भगवान श्रीहरी विष्णूंचे चार हात आहेत अशी मान्यता आहे.

त्यामुळे या आपल्या सभोवतालच्या चारी दिशांचे रक्षण हे चार बाहू करत असतात. आज आपण स्वस्तिकाचा वापर कुठे आणि कसा करावा याविषयी जाणून घेणार आहोत. कारण हे केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या आकांक्षा काम मार्गी लागतील.

यासाठी आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह एखाद्या विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट पद्धतीने काढावा लागणार आहे. मित्रानो स्वस्तिक हे भगवान सूर्यनारायणाचे स्थान आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या शक्ती स्वस्तिकामध्ये सामावलेले आहेत.

आपल्याला माहित आहे का स्वस्तिकाची जी आडवी रेष असते ती म्हणजे संपूर्ण ब्रम्हांडाचा मार्ग आहे आणि जी उभी रेष आहे ती या विश्वाचे उत्पत्तीचे मुख्य कारण आहे. अशा या स्वस्तिकाचा जो मध्यबिंदू आहे तो म्हणजे भगवान विष्णूंचे नाभिकमळ आहे. याच नाभिकमळातून श्री ब्रम्हा यांची उत्पत्ती झाली होती.

अशा अनेक कारणांमुळे स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे. एखाद्या देवासमोर एखाद्या महिलेने स्वस्तिक काढलं तर अस म्हटलं जातं की, तिला वैधव्याचे भय राहत नाही. म्हणजे तिच्या पतीला अखंड सौभाग्य प्राप्त होते. भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक चिन्ह आहे.

स्वस्तिक काढताना ते नेहमी स्वच्छ आणि सुंदर जागेतच काढाव. तसेच वाकडातिकडा आडवातिडवा कधीही काढू नये. दुसरी गोष्ट म्हणजे स्वस्तिक काढताना ती जागा पवित्र असावी. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर घरातील देवघरात हळदीने स्वस्तिक काढा.

आपल्या अडचणी दूर होतील, सर्व कामे मार्गी लागतील अस म्हंटल जात. तसेच आपली एखादी विशिष्ट प्रकारची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असे आपल्याला वाटत आहे तर त्यासाठी आपण घरातील देव्हाऱ्यासमोर कुंकवाने स्वस्तिक काढा. कुंकूवाचे स्वस्तिक काढल्याने आपल्या इच्छा त्वरित पूर्ण होतात.

आपल्याला त्वरित लाभ मिळतो. मित्रांनो अशा या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला साध्यासुधा वाटतात. पण शास्त्रानुसार या गोष्टींकडे पाहिले तर त्याला खूप महत्त्व आहे. अशा प्रकारच्या गोष्टी केल्याने अनेकजणांचे संकल्प पूर्ण झाले आहेत.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *