फक्त 4 मिनिट याने मालिश करा; केसातील उवा आणि लिखा गळून पडतील, केस वेगाने वाढतील.!

फक्त 4 मिनिट याने मालिश करा; केसातील उवा आणि लिखा गळून पडतील, केस वेगाने वाढतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केसामधील उवा आणि लिखा मारण्यासाठी करा हा घरगुती उपाय. केसांमध्ये उवा आणि लिखा होणे हे आजार किंवा आजाराचे लक्षण नसते पण यामुळे सतत आणि विनाकारण डोके खाजत राहते. लहान असो की मोठा अगदी कोणाच्याही केसांमध्ये उवा होऊ शकतात. अगदी दररोज केस धुतले जात नसतील तर बाजारातील केमिकलयुक्त हे प्रोडक्ट चा वापर करण्यापेक्षा किंवा त्याचे दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा पद्धतीने बनवलेला घरगुती उपाय तुम्ही फक्त चार ते पाच दिवस करा. तुमच्या केसातील उवा लिखा पूर्णपणे नष्ट होतील. चला तर जाणून घेऊया त हा उपाय कसा बनवायचा..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे नारळाचे तेल. यामधील साधारण एक ते दोन चमचा नारळ तेल आपल्याला घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्याकडे कोणते तेल वापरू शकता. आता आपल्याला आवश्यक आहे भीमसेन कापूर. हा कापूर कोणत्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक मेडिकल मध्ये उपलब्ध होतो. या कापूर अंगी अनेक औषधी गुणधर्म असतात आणि याच कारणामुळे आपण साधारण एक छोटा तुकडा किंवा एक ग्रॅम बारीक पावडर करून या तेला मध्ये ऍड करायचे आहे.

आता हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत.हे दोन्ही घटक जास्त प्रमाणात घेऊन चार ते पाच दिवस पुरेल एवढे ते एकदाच स्टोअर करून ठेवू शकता.केस धूण्यापूर्वी अर्धा तास या तेलाने केसांची आणि केसांच्या मुळाची मालिश करायचे आहे आणि अर्धा तास एखाद्या सुती कपड्याने केस बांधून ठेवायचे आहे. केस धुण्यासाठी एक साधा उपाय करायचा आहे यासाठी एक भांडे घेऊन त्यामध्ये दोन ग्लास एवढे पाणी किंवा तुमच्या केसांच्या लांबी प्रमाने पाणी घ्यायचे आहे.

आता आपल्याला आवश्यक आहे कडुलिंबाची ताजी पाने. एक वाटी घेऊन या पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळून घ्यायचे आहे मित्रानो कडूनिंबाच्या पानांच्या अंगी अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे उवा आणि लिखा मरतात आणि केस विचारताना अगदी सहजपणे त्या गळून पडतात याशिवाय केसांमध्ये चाई पडली असेल, केसांमधील कोंडा किंवा केसांमधील फंगल इन्फेक्शन देखील या पाण्याने केस धुतल्याने नष्ट होतात.

पाणी उकळून झाल्यानंतर हे पाणी थोडे थंड होऊ द्यायचे आहे यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे. केस धुण्यासाठी या पाण्याचा वापर करायचा आहे. तुमच्याजवळ कडू लिंबाचे झाड असेल तर हा उपाय नक्की करायचा आहे किंवा एकदाच जास्त प्रमाणात पाणी आणि कडुलिंबाची पाने घेऊन असे पाणी बनवून ठेवू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *