वास्तु शास्त्रानुसार दुकान चालण्यासाठी दुकानात हा फोटो लावून म्हणा हा एक मंत्र.!

वास्तु शास्त्रानुसार दुकान चालण्यासाठी दुकानात हा फोटो लावून म्हणा हा एक मंत्र.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांचे दुकान असते, उद्योग धंदा , व्यवसाय असतो मात्र तो व्यवस्थित चालतच नाही, आपल्याकडे भांडवल व्यवस्थित आहे जागा सुद्धा अगदी मोक्याच्या ठिकाणी असते. आपण भरपूर कष्ट करतोय मात्र दुकान काही केल्या चालत नाही,गिऱ्हाईक येत नाही यामागे अनेक काही कारणे असू शकतात पहिली गोष्ट आहे तुमचे दुकान आहे त्या वास्तूमध्ये काही दोष असू शकतात त्यांना वास्तुदोष असे म्हणतात तसेच जी व्यक्ती दुकान व्यवसाय उद्योग धंदा करते त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये दूषित ग्रहांची, काही दूषित ग्रहांची महादशा चालू असू शकते आणि या अशा कारणास्तव किंवा काही गुप्त शत्रू असतात या गुप्त शत्रूंचा कारवाईसुद्धा चालू असू शकतात.

काही लोकांची तुमच्या दुकानात तुमच्या गिऱ्हाईक यांना नजर लागू शकते सर्व कारणास्तव तुमचे दुकान व्यवस्थित चालत चालत नसेल किंवा या सर्व शंका कुशंका असू शकतात त्या गोष्टी अवश्य पालन केले तर आपल्याला दिसेल की आपले दुकान आपला व्यवसाय उद्योग धंदा व्यवस्थित झालेला आहे त्याची फरफट होत नाही आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट लोकांचे दुकान चालत नाही, व्यवसाय चालत नाही, भरभराट होत नाही अशा लोकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या दुकानात माता लक्ष्मीची असा फोटो ठेवा की ज्यामध्ये माता लक्ष्मी च्या दोन्ही बाजूस सोंड उंचावलेले हत्ती आहेत, माता लक्ष्मी या बसलेल्या अवस्थेत असाव्यात आणि त्यांचे आसन हे कमळाचे फूल असावे थोडक्यात मध्यभागी कमलासनावर बसलेली माता लक्ष्मी आणि त्यांच्या दोन्ही बाजूला आणि उजव्या बाजूला उंचावलेले हत्ती असायला हवे.

या प्रतिमेस गजांत वैभव लक्ष्मी असे म्हणतात. माता लक्ष्मी हे गजान्त वैभव लक्ष्मी आहेत. वैभव लक्ष्मी ज्या व्यवसायाच्या ठिकाणी असते तेथे दुकानात भरभराट नक्की होते. मात्र हा फोटो आपल्या दुकानात किंवा कार्यालयात स्थापित केल्यानंतर रोज फोटोस उदबत्तीने ओवाळणे ,त्या ठिकाणी दिवा लावणे आणि कमीत कमी मंगळवारी व शुक्रवारी मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवणे म्हणजे काहीतरी गोडधोड नैवेद्य त्या ठिकाणी अर्पण करणे महत्त्वाचे असते.

आपण माता लक्ष्मी यांना आपल्या दुकानात आलेल्या आहे तर अशावेळी आपल्या दुकानात साफसफाई असणे स्वच्छता असणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या दुकानाच्या ज्या काही नको असणाऱ्या वस्तू असतील तर ते वेळीच दूर करा. दुकानाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर मुख्य प्रवेशद्वारावर आपण सर्व देवी देवतांचा वास असतो तिच्या दोन्ही बाजूस छोट्या छोट्या रांगोळी काढायला अजिबात विसरु नका. आपल्या व्यवसायाची प्रगती करण्यासाठी चिनी मातीचे भांडेमध्ये आपल्याला पाव किलो तुरटी आवश्यक ठेवायची आहे.

एक वाटी आपण तेथे ठेवायची आहेत आणि त्यानंतर अशी ही वाटी आपल्या दुकानात आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही कोपर्‍यात नेऊन ठेवा. तिला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या मात्र ही तूरटी ठेवल्या नंतर प्रत्येक महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी ही तुरटी आवश्यक बदला.  जुनी तुरटी वाहत्या पाण्यातचविसर्जन करा. वाहते पाणी नसेल तर अगदी आपण आपल्या बेसिनमध्ये किंवा इतर कोणत्याही पाण्यात टाकून द्या असे केल्याने आपल्या दुकानाला कोणाचीच नजर लागणार नाही.

त्याचबरोबर असे केल्याने आपल्या दुकानांमध्ये जर कोणताही वास्तुदोष असेल तर तो दोष पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. आपला व्यवसाय नीट चालण्यासाठी आपण एक गोष्ट आवश्यक करु शकतो ती म्हणजे आपल्या दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्चित असायला हवी.

बहुतेक वेळा आपण कधीही दुकान उघडतो आणि कधीही दुकान बंद करत असतो अशावेळी आपले दुकानाची जे काही गिऱ्हाईक असतात ते आपल्यावर नाराज होऊन दुसरीकडे निघून जातात आणि कोणत्याही व्यवसायामध्ये गिऱ्हाईक हेच आपली लक्ष्मी असते आणि जर अशा वेळी जर गिऱ्हाईक आपल्यावर रूसून दुसऱ्याकडे निघून गेले तर परिणामी माता महालक्ष्मी सुद्धा आपल्यावर रागावून दुसऱ्याकडे निघून जाते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या दुकानाची वेळ निश्चित करायला हवी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *