पालक जूस पिण्याचे फायदे ऐकलेत का.? शरीराला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवेल पालक.!

पालक जूस पिण्याचे फायदे ऐकलेत का.? शरीराला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवेल पालक.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोणत्याही व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती खूप महत्त्वाची ठरते म्हणूनच बहुतेक वेळा आपण अनेकदा आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी चांगली राहील याची काळजी घेत असतो. रोग प्रतिकारशक्ती चांगली असलेली व्यक्ती अनेक आजारापासून स्वतःचे संरक्षण करू शकते.सध्याच्या काळामध्ये अनेकदा आपल्याला कोरोनाचे प्रमाण पसरताना दिसत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी आपण सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून आजार हरवायचे असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली बनवायची नितांत आवश्यकता आहे.पालक या भाजी पासून जर तुम्ही रस तयार केला तर शरीरासाठी तो उपयुक्त ठरतो. पालकांमध्ये अनेक पोषक घटक तत्व असतात त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे तत्व मिळतात.

रोज सकाळ-संध्याकाळ पालक या भाजीचा रस जर प्यायला तर आपण मलावरोध पासून तसेच वेगवेगळ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो.पालका मुळे व त्याच्या रसामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. पालक मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलिक ऍसिड, लोह, प्रोटीन, खनिजे,तंतुमय पिष्टमय पदार्थ ,जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. आयुर्वेदिक शास्त्रानुसार पालक शितल, पचण्यास सुलभ असणारी अशी वनस्पती आहे त्याच बरोबर पित्तनाशक सुद्धा आहे.

या सर्व गुणधर्मामुळे पालकाची भाजी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याचबरोबर अनेक आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी पालकातील गुणधर्म आपल्याला उपयुक्त ठरतात. आरोग्याच्या दृष्टीने आपले संरक्षण करण्यासाठी शाकाहारी जेवणामध्ये पालकांचा समाविष्ट करण्यात नेहमी चांगले ठरते कारण की मटन, चिकन ,अंडी ,मासे यांच्या तुलनेत जेवढे प्रोटीन शरीराला मिळते तेवढेच प्रोटीन पालकच्या भाजीतून आपल्या शरीराला मिळत असते म्हणूनच मांसाहारी न करणाऱ्या व्यक्तींसाठी पालकाचे सेवन अत्यंत महत्त्वाचे ठरते.

पालकाच्या भाजी मध्ये लोह आणि कॉपर याचा अंश असल्यामुळे एनिमिया सारख्या रोगापासून आपले संरक्षण होते त्याचबरोबर या भाजीमध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्यामुळे शरीरामध्ये जी रक्ताची कमतरता असते ती भरून निघते .पालक रक्त शुद्ध करते. हाडांना बळकटी देते. पालक ,टोमॅटो ,कांदा, काकडी यांची कोशिंबीर बनवून थोडेसे लिंबू पिळावे. लिंबू मध्ये उपलब्ध असणारे क जीवनसत्व त्याचबरोबर पालक भाजी मध्ये उपलब्ध असणारे अ जीवनसत्त्व यामुळे पालकांमध्ये असणारे सर्व घटक सोसण्याची ची शक्ती आपल्या शरीराला मिळत असते.

पालक या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॉलिक ऍसिड असल्यामुळे गर्भवती महिलांनी आणि स्त्रियांनी या भाजीचे सेवन आपल्या आहारामध्ये अवश्य करावे यामुळे गर्भाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. अनेक महिलांना वजन वाढणे, धाप लागणे, अशक्तपणा वाटणे, जुलाब होणे असे अनेक लक्षणे गर्भवती महिलांमध्ये पाहायला मिळतात असे होऊ नये म्हणून गर्भवती महिलांनी आपल्या आहारामध्ये पालकाचा नियमितपणे समावेश करावा.

अ जीवनसत्व अशी परिपूर्ण असलेली ही पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या संबंधीचे काही आजार असतात ते सुद्धा लवकरच दूर होतात म्हणूनच रातांधळेपणा व नजर कमी असणे व लांबचे न दिसणे यासारख्या समस्या वर पालक उपयुक्त असे रामबाण औषध आहे. पालक ची भाजी जीवन शक्तीचे मूळ स्त्रोत आहे जर एखाद्या मातेला स्तनपान करण्यासाठी पुरेसे दूध येत नसेल तर बाळ चार महिने एवढे मोठे झाल्यानंतर बाळाला त्याच्या वाढीसाठी पालकाचे सूप खायला दिल्याने त्याच्या शरीराची योग्य रीत्या वाढ होते त्याच बरोबर अंगावर सूज येऊन गाठ निर्माण झाली असेल तर अशावेळी पालकाच्या पानाचा पोटीस गरम करून त्या जागेवर लावा.

पालकांमध्ये रक्त शोषकाचे गुणधर्म असल्यामुळे काविळ या आजारास वर उपयुक्त ठरते.आपल्या शरीरातील आतड्यांचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी रोज सकाळी उपाशी पोटी जर पालकाचे रस प्यायल्यामुळे मलावरोध सारख्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळते. शौचास साफ होऊन पोट स्वच्छ राहते तसेच शहाळा सोबत जर नियमितपणे एक ग्लास पालकाचा रस प्यायल्यामुळे लघवीद्वारे मुत्राचे प्रमाण वाढते त्याचबरोबर लघवीच्या येथे होणारी जळजळ थांबवून मुत्रविकार संबंधित सर्व आजार दूर होतात. अशा पद्धतीने आपल्या जीवनाला सर्व पद्धतीने निरोगी करण्याचे कार्य पालक करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *