पेन किलरमुळे होणारे नुकसान जाणल्यावर तुम्ही सुद्धा त्यांचे सेवन करणे बंद कराल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्यामुळे याबद्दल माहिती देणार आहोत. पेन किलर म्हणजे वेदनानाशक औषध, आजकालचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. या पूर्ण व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळच राहिलेला नाहीय. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधी व वेदनांना सामोरे जावे लागते.
कधी कधी या वेदना असह्य होतात व आपल्याकडे वेळ नसल्यामुळे वेदनानाशक गोळ्या घाव्या लागतात. जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल. या गोळ्या घेतल्याने कायमस्वरूपी इलाज होत नाही, तो इलाज तात्पुरता असतो.
आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते कि पुढे जाऊन त्यांना या वेदनानाशक गोळ्यांचे साईड इफेक्ट होऊ शकतात. तर आता सगळ्यात आधी आपण पेन किलर गोळ्यांमुळे कोणते नुकसान होतात हे जाणून घेऊया.
पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने आपण वयस्कर दिसू लागतो. रिकाम्या पोटी कधीही पेन किलर घेऊ नका, कारण यामुळे किडनी संबंधी समस्या होऊ शकतात. रोज पेन किलर घेतल्याने लिव्हर संबंधी समस्या उदभवतात. तसेच आपल्याला घाबरल्यासारखे वाटते व अस्वस्थता वाढते.
पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने सुस्ती येते व रक्तदाब कमी होतो. काही खास गोष्टी लक्षात घेऊन आपण पेन किलर घेऊ शकता. जसं कि जेवल्यानंतर ३० मिनिटांनी या गोळ्या घ्या. पेनकिलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा. पेनकिलर नेहमी पाण्यासोबतच घेतल्या पाहिजेत.
जर वेदना सारख्या सारख्या होत असतील आणि असह्य होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो पेनकिलर बद्दल हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.