फक्त १ बटाटा चेहऱ्यावरील काळे वांग, डाग, सुरकुत्या करेल तीन दिवसातच कमी.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक व्यक्तींचे वय कमी असतं परंतु अनेक जण आपल्याला विचारत असतात की तुमचे वय जास्त आहे का.? कारण आपले वय प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त वाटू लागते त्यामागे अनेक कारणं असू शकतात त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर पडणारे सुरकुत्या. अनेकदा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या , काळे डाग , पिंपल्स यासारख्या समस्या निर्माण होत असतात. अनेकदा आपण रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्या ऐवजी जास्तच जास्तच प्रमाणामध्ये काळे डाग व वांग तयार होत असतात.
अनेकदा रासायनिक द्रव्य पदार्थामुळे आपली त्वचा काळसर पडू लागते आणि त्याचा विपरीत परिणाम चेहऱ्यावर सुद्धा होत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाचा असा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहराच्या संबंधित सर्व समस्या नष्ट होणार आहेत. हा उपाय अतिशय सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी एक फेशियल तयार करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहे.
सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर हे बटाटे किसणीच्या सहाय्याने आपल्याला किसायचे आहेत. तुमच्या चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पिंपल्स असतील तर आंघोळ केल्यानंतर व दिवसभरातून कधीही तुम्ही तुमचा चेहरा आधी स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे असे थंड पाण्याने आपण चेहरा दिवसभरातून दोन तीन वेळा तरी धुतला तरी आपल्या शरीरातील घाण निघून पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते.
जर तुमच्या चेहऱ्यावर वांग असतील तर अशा वेळी अक्रोडचा रस खूपच लाभदायी ठरतो अक्रोडचा रस चेहर्यावर लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील वांग निघून जातात. बटाटे किसून आल्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर हे किसलेले बटाटे टाकायचे आहेत आणि चांगला रस काढून घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन ते चार चमचा रस लागणार आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हिरव्या मुगाच्या डाळीचे पीठ.
हे पीठ बाजारात सुद्धा उपलब्ध होते आणि त्याच बरोबर आहे तुम्ही हे पिठ घरच्या घरी मिक्सरमध्ये मुगाची डाळ बारीक वाटून त्याचे पीठ सुद्धा बनवू शकतात त्याचबरोबर या मुगाच्या डाळीच्या पीठामध्ये झिंक खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते यामुळे आपल्या चेहर्यावरील मृतपेशी निघून नवीन चांगल्या पेशी निर्माण होण्याचे कार्य करते.त्याच बरोबर विटामिन ए व विटामिन सी मुळे आपली त्वचा नेहमी चांगली राहते. बटाटाच्या रसामध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करायचे आहे.
हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे तसंच ठेवायचे आहे त्यामुळे ते व्यवस्थित एकजीव होणार आहे त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सर्कुलर वाईज हे फेशियल पॅक लावायचा आहे. अर्धा तास तसेच ठेवून त्यानंतर थंड पाण्याने हा पॅक धुवायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण एक महिनाभर हा उपाय केला तर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग , वांग चेहऱ्यावर पडलेल्या सरकूत्या लवकरच दुर होणार आहे आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसू लागेल म्हणूनच हा घरगुती उपाय अवश्य करा आणि तुमचा चेहरा सुंदर बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.