100% मूळव्याध बरा करील असा एक घरगुती उपाय एकदा नक्कीच करा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुळव्याध झाल्यानंतर काहीजण घरगुती उपचार करतात तर काहीजण औषधांचा उपयोग करतात. या लेखामध्ये मुळव्याधावर रामबाण उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमचा मूळव्याध लवकरच बरा होईल. म्हणूनच सांगितलेला हा उपयोगी असा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे तुमची सुटका लवकरच होईल. सर्वांना नारळ माहिती असेल.
या नारळाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी करत असतो. देवाला अर्पण करण्यासाठी पूजाविधीमध्ये किंवा घरातील अन्न पदार्थांची चव वाढवण्यासाठी नारळाचा महत्वपूर्ण उपयोग होत असत. याचा उपयोग करत असताना नारळावरील चे केस असतात ते आपण फेकून देतो परंतु या केसांचा उपयोग आपण मुळव्याध नष्ट करण्यासाठी करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल बद्दल..
मूळव्याध दूर करण्यासाठी आपल्याला नारळावरील जे काही केस आहेत ते आपल्याला जमा करून त्यांना जाळायचे आहेत व त्याची राख तयार करून घ्यायचे आहे. हि राख तयार करताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे. अनेकदा लोक जमिनीवरच्या नारळाच्या केसांची राख तयार करतात त्यामुळे अनेकदा त्यामध्ये माती मिसळते परंतु ही राख तयार करत असताना एका भांड्यामध्ये नारळाचे केस ठेवून पेटवायचे जेणेकरून त्यात कोणत्याही प्रकारचे पदार्थ मिसळणार नाही.
एकदा राख तयार झाल्यावर एका कापडाच्या सहाय्याने गाळून घ्या आणि एका भांड्यामध्ये भरून ठेवा . या राखेचा उपयोग आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचा आहे त्यानंतर आपल्याला एकग्लास ताक घ्यायची आहे. या ताकामध्ये आपल्याला एक चमचा राख मिसळायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला प्यायचे आहे. हा उपाय करताना आपल्याला सकाळी उपाशी पोटी करायचा आहे.
हा उपाय केल्यामुळे तुमचे पोट साफ होईल, आतड्यातील जखमा बऱ्या होतात, पोटामधील उष्णता दूर होते त्याचबरोबर गूदाजवळ असणाऱ्या जखमा सुद्धा नष्ट होतात त्याचबरोबर तुमचा मूळव्याध लवकर नष्ट होण्यास मदत होत असते. हा उपाय आठवड्यातून आपला तीन दिवस करायचा आहे परंतु हा उपाय करताना सलग तीन दिवस करू नये.
एक दिवसाआड या उपायांचा वापर करावा. हा उपाय करताना आपल्याला काही नियम पाळणे सुद्धा गरजेचे आहेत ते म्हणजे जास्त मसालेदार पदार्थ न खाणे, तेलकट पदार्थ न खाणे, बाहेरील पदार्थांचा अन्नामध्ये कमी सेवन करणे किंवा समावेश करणे अन्यथा या उपायाचा तुम्हाला लवकर लाभ मिळणार नाही. तसेच तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असल्यामुळे मसालेदार व तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे तसेच चिकन-मटण यासारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये कारण की या पदार्थांमध्ये उष्णता खूप मोठ्या प्रमाणावर असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.