काय असते एमआरआय स्कॅन.? कशा पद्धतीने केली जाते एमआरआय स्कॅन.? जाणून घ्या यामागील संपूर्ण माहिती.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या काळामध्ये अनेक जण आजारी असतात. या आजारपणामुळे डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट सुद्धा करायला सांगतात परंतु आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखामध्ये एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. अनेकांना डॉक्टर यांनी एमआरआय स्कॅन करायला सांगितले जाते परंतु अनेकांना येणार ही टेस्ट म्हणजे काय असते हे माहिती नसते.ही टेस्ट करण्यासाठी किती खर्च येतो? ही टेस्ट कशा पद्धतीने केली जाते याबद्दल अनेकांना कल्पना नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या बद्दल सांगणार आहेत..
एम आर आय स्कॅन मध्ये एका मशीन मध्ये आपली बोडी म्हणजेच आपले शरीर पूर्णपणे तपासले जाते. एम आर आय चा फुल फॉर्म आहे मॅग्नेटिक रेझोनन्स इमॅजिन. या टेस्ट च्या माध्यमातून आपले शरीर पूर्णपणे स्कॅन केले जाते आणि जर आपल्याला कोणता त्रास असेल तर तो त्रास आपल्याला या टेस्ट च्या माध्यमातून कळतो.
ही टेस्ट करताना आपल्या शरीरावर भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेटिक वेव टाकले जातात आणि यामुळेच आपल्या शरीरातील छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला स्कॅनिंग मधून दिसून येतात. जेव्हापासून एमआरआय स्कॅन ही टेस्ट विकसित झाली तेव्हापासून आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आहे.बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये एखादी जखम झालेली असते एखादा अपघात घडलेला असतो त्याच बरोबर अनेक दिवसापासून एखादा आजार असतो परंतु काही औषधोपचार करून सुद्धा आपल्या त्याचे निदान होत नाही अशा वेळी या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला निदान करता येते.
ही टेस्ट करताना मनुष्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची चिरफाड केली जात नाही त्याच बरोबर एखादा व्यक्ती औषध उपचार घेत असेल तर त्या औषधोपचारांचा त्याच्यावर कोणता असर पडतो की नाही हे सुद्धा या टेस्टमधून आपल्याला कळते. आपल्या मेंदू मधील कोणता भाग जास्त सक्रिय आहे हे तपासण्यासाठी सुद्धा आपल्याला ही टेस्ट करावी लागते त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मेंदू संबंधित काही समस्या असेल, तक्रारी असतील अशा वेळेस सुद्धा डॉक्टर आपल्याला ही टेस्ट करण्याची संधी देतात.
आता आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की ही टेस्ट कशा पद्धतीने केली जाते तर ही टेस्ट करत असताना सर्वप्रथम रुग्णाच्या शरीरावर हे सगळे कपडे काढून घेतले जातात आणि डॉक्टरानी कपडे दिलेले असतात ते रुग्णाला परिधान करायला सांगितले जाते आणि त्याच बरोबर जर रुग्णाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे मेटल म्हणजेच धातू सोने काही असेल तर तेसुद्धा काढायला सांगितले जाते त्याच बरोबर आपल्या जीन्सला धातूचे बटन असते.
अशा मुळे आपल्याला आपण जे कपडे घातलेले असते ते कपडे काढायला सांगितले जाते यामुळे ही टेस्ट करतांना मॅग्नेट भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि ह्या सगळ्या वस्तू त्या मॅग्नेटिकला चीपकु शकतात म्हणून शक्यतो डॉक्टर द्वारे रुग्णाला नवीन कपडे दिले जातात त्यानंतर रुग्णाला मशीनमध्ये टाकून मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोडल्या जातात आणि यामुळे कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपल्या शरीरातील प्रोटान च्या मदतीने एक प्रतिमा तयार होते.
तसेच ही सगळी प्रतिमा आपले संगणक रेकॉर्ड करत असतो आणि यामुळेच शरीरात मध्ये कोणकोणते आजार आहे याचे निदान होण्यासाठी मदत होत असते, डॉक्टरांना सुद्धा आपल्याला नेमकी काय समस्या आहे हे कळून येते आणि त्या पद्धतीने डॉक्टर रुग्णांवर उपचार करायला मोकळे होतात. जेव्हा एम आर आय स्कॅन कराल अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
जर तुम्ही ग’र्भ’वती असाल तर अशा वेळीसुद्धा डॉक्टरांना अवश्य कळवा कारण की या टेस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक बाहेर पडत असतात आणि हे गर्भात असणाऱ्या बाळासाठी धोकादायक ठरू शकतात त्याचबरोबर तुमची कोणत्याही प्रकारची सर्जरी झाली असेल तर तेसुद्धा सांगा कारण की त्यानंतर कोणताही त्रास झाला तर डॉक्टरांना नेमके काय कारण आहे याबद्दल समजू शकते. तसेच ही टेस्ट करण्यासाठी साधारणपणे चार ते पाच हजार व त्यापेक्षा जास्त खर्च असू शकतो. प्रत्येक ठिकाणी या साठी लागणारा खर्च वेगळा वेगळा असतो आणि आशा करतो की तुम्हाला आजच्या लेखामध्ये सांगितले माहिती आवडली असेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.