मृ’त व्यक्ती स्वप्नात आल्यास मिळतात हे ७ संकेत; वेळीच सावधान व्हा नाहीतर….

मृ’त व्यक्ती स्वप्नात आल्यास मिळतात हे ७ संकेत; वेळीच सावधान व्हा नाहीतर….

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जवळची एखादी ‘मृ’त’ व्यक्ती आपल्याला स्वप्नात दिसली तर आपण घाबरतो. ही व्यक्ती आपल्या स्वप्नात का आली असेल ? आणि या स्वप्नाचा काय अर्थ असेल या गोष्टीचा आपण विचार करत राहतो. स्वप्न शास्त्रामध्ये अश्या अनेक स्वप्नांचा आणि त्या मागच्या करणांचा उल्लेख दिलेला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तिचा जर अकस्मीत ‘मृ’त्यू’ झाला तर आपले मन ही गोष्ट लवकर मान्य करत नाही. त्याच्या जाण्याने आपल्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो पण कधी-कधी अश्या व्यक्ती आपल्या स्वप्नात येतात व आपल्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतात.

आपल्या स्वप्नात येवून काही तरी संकेत देत असतात. आपल्या आयुष्यात येणार्या पुढील घटनांबद्दल ते सांगत असतात. पुढे येणार्या घटना शुभ आहेत की अशुभ हे सुद्धा आपल्या ते स्वप्नांद्वारे सांगत असतात. हे संकेत काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत.

‘मृ’त’ व्यक्ती जर आपल्याला ‘न’ग्न’ अवस्थेत दिसली किंवा तिच्या पायात चप्पल नसली अथवा ते भुकेलेल आहेत असे आपल्याला दिसले तर समजून जावं की ते आपल्याकडे कसली तरी मागणी करत आहेत. म्हणूनच अस स्वप्न जर तुम्हाला कधी पडल तर अशी वस्तू एखाद्या गरजवंताला किंवा ब्राम्हण देवतेला दान करावी. नही तर एखाद्या मंदिरात सुद्धा तुम्ही ही वस्तू दान करु शकता.

दान करताना आपण मनोमन अशी प्रार्थना करा की ‘ मी जे दान करतोय ते माझ्या पुर्वजांपर्यंत माझ्या नातेवाईकांपर्यंत पोहचू दे आणि त्यांची इच्छा पुर्ण होवो’. गंभीर आजाराने जर आपला नातेवाईक अथवा मित्र-मैत्रीण ‘मृ’त्यू’ पावला असेल आणि आपल्या स्वप्नात ती व्यक्ती जर तंदुरुस्त दिसत असेल तर समजून जा जाणारा व्यक्ती हा सुखरूप आहे आणि त्याचा पुनर्जन्म खूप चांगल्या ठिकानी झालेला आहे.

त्याच बरोबर ते आपल्याला सांगत असतात की माझ्या बद्दल जास्त विचार करुन दु:खी होवू नका स्वप्न शास्त्रात अश्या स्वाप्नांना आश्वासिक स्वप्न असे संबोधले जाते. या उलट जर एखादा स्वस्थ व्यक्ती मरण पावला असेल आणि तो आपल्या स्वप्नात आजारी दिसत असेल तर समजून जाव की त्या व्यक्तीची कोणती ना कोणती इच्छा अपुरी राहिली आहे जी तो आपल्याला सांगत आहे. अश्या स्वाप्नांचा अर्थ आपण समजून घ्यायचा आणि ‘मृ’त’ व्यक्तीची एखादी प्रबळ इच्छा अपूर्ण राहिली आहे का ते पहावे आणि ती पुर्ण करावी आपण त्यांच्या आकांक्षाची पूर्ती करताच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. याने आपल्या घराला देखील सुख-शांती आणि समृद्धीची प्राप्ती होते.

एखाद्या जिवंत व्यक्तिचा जर स्वप्नात आपल्याला ‘मृ’त्यू’ दिसला तर त्याचे आयुष्य खूप जास्त असते. असे स्वप्न हे दिर्घ आयुष्याचे सुचक असतात. स्वप्नात कधी-कधी आपले पूर्वज येतात परंतू ते आपल्याशी बोलत नसतील अथवा उदास असतील तर अश्या स्वप्नाचा अर्थ असा होतो की भविष्यात आपल्या हातून अशी गोष्ट घडणार आहे जी त्यांना पसंत नाही आहे.

अश्या वेळी हे कार्य तुम्ही करु नये असे त्यांना वाटते आणि स्वप्नांमध्ये येवून त्यांनी हसत मुखाने आशिर्वाद दिला तर समजावे की तुम्ही घेतलेल्या कार्याने ते खुश आहेत शिवाय त्या कार्यात तुम्हाला हमखास यश मिळणार आहे हे जाणून घ्या. एखादा स्वर्ग-वासी झालेला व्यक्ती जर आपल्याला उंच व आपल्यापासून दूर गेलेला दिसत असेल तर समजून जावे की त्या माणसाला मोक्ष प्राप्ती झाली आहे.

जर तोच व्यक्ती आपल्याला स्वप्नात घरात दिसत असेल घराच्या बाजूबाजूला दिसत असेल तर समजून जा की तो व्यक्ती अजून ही घराच्या मोहापासून सुटलेल नाही तसेच असे स्वप्न तुम्हाला पडले तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पित्र शांती करयला हवी व पित्रांच्या तृप्ती निमित्त गायींना गोर गरिबांना वस्तूंचे दान करायचे आहे याने आपल्या पित्रांची शांती होते. मित्रांनो स्वप्नांचा अर्थ समजून घ्या जर पूर्वज सारखे स्वप्नात येत असतील तर त्यांना मुक्ती मिळाली नाही हे समजून घ्या व त्यांच्या मुक्तीसाठी भगवतगीतेचे रोज पठण करा अश्याने तुमच्या पुर्वजांच्या आत्म्यास शांती लाभेल आणि तुमच्या परिवाराला सुख आणि शांती लाभेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *