वास्तू शास्त्रानुसार करोडो रुपयाच्या आहेत या वस्तू; तुमच्याकडे असतील तर आताच करा असा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कवडी चे माता लक्ष्मी यांच्या पूजनात फार महत्त्व आहे. कवड्या विविध रंगात येतात ,जसे पांढऱ्या पिवळ्या, भुरकट असतात. कवडी ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगाचे कवडी श्री विष्णू यांना प्रिय आहे. आजच्या लेखामध्ये आपण कवडी बद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत तसेच या कवडी च्या सहाय्याने कशा पद्धतीने धन प्राप्ति करता येते याबद्दलची महत्त्वाची माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत.
माता महालक्ष्मीची कृपा दृष्टी तर आपल्याला प्राप्त करायची असेल तर अशावेळी माता महालक्ष्मी यांच्या पूजा सोबतच अकरा कवडीची सिद्ध पूजा सुद्धा करायची आहे. या कवडीची सिद्ध पूजा केल्यानंतर पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. हा उपाय केल्याने माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपल्या जीवनामध्ये नेहमी धनाचे योग येऊ लागतात.
तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहते. आपल्या घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दारावर लाल कापडात बांधून द्यावी असे केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते, त्याबरोबरच आपल्या घरात कोणतीही नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. जर वाईट नजरेपासून आपला बचाव करायचा असेल तर एक पिवळ्या रंगाची कवडी दोऱ्यात टाकून गळ्यात धारण करावी असे केल्याने कोणतीही वाईट नजर आपल्याला स्पर्शही करू शकत नाही.
शुक्रवारचा दिवस माता महालक्ष्मी चा दिवस मानला जातो. या दिवशी काही विशिष्ट उपाय करून आपण माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो. ज्योतिष शास्त्रामध्ये पिवळ्या कवडीचा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे तसेच हा उपाय सिद्धता प्रदान करतो. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी कवडीचा टोटका अतिशय प्रभावी ठरतो.
या दिवशी जर आपण कवडी चा उपयोग केला तर या उपायामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता महालक्ष्मी चा कृपाशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. शुक्रवारच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अकरा सिद्ध कवडी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे केसर,एक चांदीचे नाणे घेऊन आपल्याला पुरचुंडी बांधायची आहे.
आता ही पुरचुंडी आपल्याला माता महालक्ष्मीच्या चरणी लावून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या तिजोरीमध्ये धनाची वाढ होते तसे शुक्रवारच्या दिवशी गरजू व्यक्तीला दान केल्याने आपल्या ध्यानामध्ये वाढ होते. या वस्तूंमध्ये आपण तांदूळ ,पीठ ,साखर व अन्य पांढऱ्या रंगाची वस्तू सुद्धा दान करू शकतो. ज्या व्यक्तीने शुक्रवारच्या दिवशी काही इच्छा व्यक्त केले असतील तर अशा व्यक्तीने या दिवशी तीन किंवा सात कुमारिका पूजन करून त्यांना खीर खायला द्यायचे आहे असे केल्याने माता महालक्ष्मी तर आपल्यावर प्रसन्न होते पण त्याच बरोबर माता भगवती सुद्धा आपल्यावर कृपा वर्षाव करते.
जर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी असे जर वाटत असेल तर अशा वेळी माता महालक्ष्मी च्या फोटो समोर 11 पांढऱ्या कवडी आपल्याला घ्यायचा आहेत आणि अशा ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या तुपाच्या दिव्यामध्ये एक-दोन केसरच्या काड्या सुद्धा टाकायच्या आहेत असे केल्याने धनामध्ये वाढ होते. ज्या घरामध्ये श्रीविष्णू यांची पूजा अर्चना मनोभावे केली जाते अशा घरांमध्ये सुद्धा माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते. ज्या ठिकाणी माता महालक्ष्मी असते त्या ठिकाणी श्रीविष्णू सुद्धा उपस्थित असतात.
जर आपण दक्षिणावर्ती शंख मध्ये पाणी भरून अशाने श्रीविष्णु यांच्या मूर्तीची विधिवत पूजा केल्यास आपल्याला श्रीविष्णू यांचा कृपाशिर्वाद प्राप्त होतोच पण त्याचबरोबर माता महालक्ष्मी यांच्या शंभर व्रत पूजेचे पुण्य सुद्धा लाभते. जर आपले कोणतेही काम होत नसेल प्रत्येक कार्यामध्ये अडचणी निर्माण होत असेल तर शुक्रवारच्या दिवशी चार मुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये लाल रंगाच्या वाती लावायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला माता महालक्ष्मी व श्री हरी विष्णू यांच्यासमोर प्रज्वलित करायचा आहे. असे केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते.
आपल्या पतीला दीर्घायुषी लाभावे तसेच आपले सौभाग्य नेहमी सुरक्षित रहावे यासाठी आपण शुक्रवारच्या दिवशी सौभाग्य व शृंगार सामान दान करायला हवे, असे केल्याने आपल्या पतीच्या जीवनामध्ये वाढ होते तसेच आपला प्रति आपल्यावर प्रेम करू लागतो. जर आपल्याला नोकरी हवी असेल आणि नोकरीसाठी आपण खूप प्रयत्न करत असू तर अशा दिवशी शुक्रवारी आपल्याला 21 पांढ-या रंगाच्या सिद्ध कवडी आणायच्या आहेत.
तसेच पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून माता महालक्ष्मीच्या अष्टक मंत्राने त्या पवित्र करायचे आहेत आणि त्यानंतर माता महालक्ष्मी यांना लाल रंगाचे गुलाबाचे फुल अर्पण करायचे आहे असे केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला नोकरी लागेल आणि अप्रत्यक्षरित्या महालक्ष्मीची कृपा आशीर्वाद व त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील. आपल्या जीवनामध्ये पैशाची कधीच कमतरता निर्माण होऊ नये म्हणून अशावेळी गुरूवारच्या दिवशी व शुक्रवारच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रची पूजा करायची आहे व त्याचबरोबर यंत्र आपण हळदी-कुंकू वाहून माता महालक्ष्मी चरणी अर्पण करायचे आहे.
असे केल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये धनाची कधीच कमतरता भासत नाही तसेच शुक्रवारच्या दिवशी माता महालक्ष्मीला मनोभावे शरण जायचे आहे आणि आपल्या जीवनामध्ये नेहमी कृपादृष्टी असावी तसेच सर्व भक्तांवर नेहमी आशीर्वाद असावा अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे व न विसरता श्री देवी सूक्त व श्री महालक्ष्मी अष्टक मंत्राचा जप अवश्य करायला हवा असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदू लागेल माता महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नेहमी प्राप्त होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.