हा घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करा..उंची इतकी वाढेल की लोकांना मान वर करून तुम्हाला बघावे लागेल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो अनेक पालकांची तक्रार असते कि माझ्या मुलाची किंवा मुलीची उंची अपेक्षित प्रमाणामध्ये वाढत नाही. वय वाढत चाललं आहे पण त्याप्रमाणात उंची मात्र वाढली नाही. जर तुमच्या पाल्यांना सकस आहार देऊनही जर उंची वाढत नसेल तर आजचा हा उपाय एकदा नक्की करा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा दिसून येईल.
काही मुलांचे आईवडील उंचीने कमी असतात, अशा मुलांनी देखील हा उपाय केल्याने त्यांची देखील उंची या उपायाने वाढते. तर मित्रांनो चला पाहुयात हा उपाय नेमका कसा करायचा.
मित्रांनो उंची न वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमचे योग्य प्रमाणात अभिशोषण न होणे. म्हणूनच आजच्या या उपायाचा पहिला घटक म्हणजे दही. दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. याशिवाय दही पचायला दुधापेक्षा हलकी असते, दही खाण्याचे आपल्या शरीराला इतरही अनेक फायदे आहेत.
आपण एक वेळच्या वापरासाठी अर्धा कप दही घ्यायचा आहे. त्यानंतर आपण दह्यामध्ये गव्हाच्या दाण्याएवढा मिसळायचा आहे. त्यानंतर ते व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. मित्रानो चुन्यामध्ये कॅल्शियम मुबलक असतेच पण चुना हा सर्वच पोषक तत्वांच्या आतड्यामधील अभिशोषण करण्यासाठी मदत करतो.
कॅल्शियमसह व्हिटॅमिन डी ,व्हिटॅमिन सी आणि इतर घटक शरीरामध्ये अभिशोषण झाल्याने शरीराचा विकास होतो व पर्यायाने उंची वाढण्यास याची मदत होते. हे दोन्ही घटक मिक्स केल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला. हे मिश्रण सलग वर्षभर खायला द्यायचे आहे. उंची वाढणे हे काही १-२ महिन्यामध्ये शक्य नसल्याने हा उपाय तुम्हाला केवळ वर्षभर तरी करावा लागेल.
दररोज जरी हे खाणे शक्य झाले नाही तर दिवसाआड तरी याचे सेवन नक्की करावे. सोबतच शरीरात रक्ताची कमतरता जाणवू नये म्हणून बिटाचा जूस किंवा सलाड मध्ये बिटाचा वापर अवश्य करावा. कारण लहान मुलांना ऍनिमियाची शक्यता जास्त असते. तर मित्रांनो हा होता उंची वाढवण्याचा घरगुती उपाय. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.