आपल्या घरामध्ये गरिबी व दारिद्रता येण्याची संकेत देत असतात या काही गोष्टी.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मनुष्य आपल्या कर्माच्या सहाय्याने आपल्या जीवनामध्ये सुख, शांती व वैभव मिळवू शकतो. जर आपले कार्य चांगले असतील तर आपल्या जीवनामध्ये घटनासुद्धा सकारात्मक घडत असतात परंतु जर आपण एखादी वाईट काम करत असू तर येणारा काळ सुद्धा आपल्यासाठी वाईटच ठरतो याची काळजी आपल्याला घ्यायला हवी आणि म्हणूनच मनुष्य ने नेहमी कर्म सुद्धा चांगले करायला पाहिजे परंतु अनेकदा आपण अशा काही गोष्टी करत असतो ज्या आपल्या हातून कळत नकळत घडून जातात.
आपल्याला त्याबद्दल फारशी माहिती सुद्धा नसते म्हणूनच अनेकदा आपण खुप सारी चांगले कार्य करून सुद्धा आपल्याला त्या कार्याची चांगले फळ प्राप्त होत नाही, अशा वेळी जर आपल्या जीवनामध्ये नकारात्मक घटना वारंवार घडू लागल्या तर आपण निराश होतो आणि अनेकदा आपल्या भाग्याला दोष देऊ लागतो. या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. जर ही काही लक्षणे तुमच्या बाब तीत सुद्धा घडत असतील तर तुमच्या जीवनामध्ये गरिबी व दारिद्रता प्रवेश करणार आहेत म्हणूनच या काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
तुमच्या घरांमध्ये या काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी आपल्याला स्वतःहून बाहेर काढणे गरजेचे आहे किंवा आपण असे काही कार्य करत असून अत्यंत चुकीचा आहे. या कार्यामुळे आपण आपल्या हाताने आपले जीवन उध्वस्त करणार आहोत. आपल्या घरातील पहिली वस्तू म्हणजे पाणी. पाणी हे नेहमी शुद्ध आणि स्वच्छ असायला हवे. आपण ज्या ठिकाणी आपल्या घरातील पाणी चे भांडे ठेवतो ती जागा अत्यंत स्वच्छ असायला हवी. त्याचबरोबर रात्री झोपताना कधीही पाणी उघडे ठेवू नये.
ज्या ठिकाणी पाणी असते त्या ठिकाणी देवी देवतांचा वास मानला जातो आणि पाणी हे आपल्या शरीरासाठी अमृत समान असते म्हणूनच पाण्याची काळजी घेणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. जर पाणी च्या आजूबाजूला काही घाण असेल तर ती घाण आताच स्वच्छ करायला हवी अन्यथा नकारात्मक ऊर्जा तुमच्या पाण्याच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करेल आणि तुमचे जीवन सुद्धा नकारात्मक होऊन जाईल.
त्याचबरोबर रात्री कोणत्याही झाडाखाली चुकून सुद्धा लघवी करू नये. रात्रीच्या वेळी कोणत्याही झाडाखाली अनेक शक्ती वास्तव्य करत असतात आणि अशा वेळी जर आपण कोणत्याही झाडाखाली लघवी केली तर त्या शक्तींचा अपमान केल्यासारखा होतो आणि म्हणूनच रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा कोणत्या ही झाडाखाली लघवी अजिबात करू नये. आपल्या घरामध्ये फुटलेली काच फुटलेला कंगवा असेल तर तो अजिबात ठेवू नका.
या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करत असते पण त्याच बरोबर आपल्या घरामध्ये गरिबी येण्याचे संकेत सुद्धा आहे म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये तुटलेला काच असेल तर तो बदलून नवीन काच अवश्य लावा. प्रत्येकाने आपले घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. ज्या ठिकाणी स्वच्छता नसते अशा ठिकाणी देवी-देवता कधीच वास करत नाही त्या ठिकाणी नेहमी वाईट शक्ती अवदसा पिडा राहतात आणि म्हणूनच आपले घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे.
ज्या व्यक्तींचे घर नेहमी स्वच्छ असते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते, त्या ठिकाणी सकारात्मक उर्जा नेहमी राहते. जेव्हा आपण चपाती खातो तेव्हा ती चपाती दाताने तोडून नाही खायची. आपण आपल्या हाताने अलगद पणे तुकडा तोडून ती चपाती खायला पाहिजे. जर तुम्ही चपाती दाताने तोडून खात असाल तर हे अतिशय वाईट लक्षण आहे यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी तर येते पण त्याचबरोबर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या सुद्धा उद्भवू लागतात तसेच कधीही फाटलेले कपडे घालू नका. फाटलेले कपडे घालने सुद्धा नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.
जी व्यक्ती नेहमी फाटलेले कपडे घालतात त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी फाटून जातात म्हणजेच त्या नष्ट होतात. आपल्यापैकी अनेक जण नख खातांना पाहायला मिळतात त्याच बरोबर अनेक जण दातांनी नखे कुरतडत असतात जर तुम्हाला सुद्धा ही सवय असेल तर ही सवय आत्ताच थांबवा अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतील असं त्याचबरोबर तुमचे भाग्य सुद्धा तुमच्यावर रागावू शकते.
जी व्यक्ती सूर्या उदयानंतर जास्त वेळ झोपून जाते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी अंधार असतो म्हणूनच सूर्योदय झाल्यानंतर जास्त वेळ झोपू नये. जी व्यक्ती सकाळी लवकर उठते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक घटना घडू लागतात आणि सुखाचे दिवस सुद्धा येतात. जर आपल्या घरासमोर चपला-बूट अस्ताव्यस्त पडलेले असतील तर ते चुकीचे आहे.
त्याचबरोबर अनेकांच्या घरासमोर चप्पल उलटी असते तर तुमच्या सुद्धा घरासमोर उलटी पडलेली असेल तर ती सरळ करायला हवी. उलटी चप्पल हे दारिद्र्याचे निशान मानले जाते व त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चप्पल घालून सुद्धा प्रवेश करू नये कारण की चप्पल जेव्हा आपण बाहेर घालत असतो तेव्हा आपल्या सोबत अनेक नकारात्मक ऊर्जा सुद्धा वास्तव्य करत असतात आणि जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तर कळत नकळत सुद्धा करत असाल तर आत्ताच सावधान व्हा अन्यथा तुमच्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडू लागतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.