फक्त 1 फुल दिसताच तोडून घ्या. फायदे इतके की, यापुढे संजीवनी बुटी फेल…

फक्त 1 फुल दिसताच तोडून घ्या. फायदे इतके की, यापुढे संजीवनी बुटी फेल…

नमस्कार मित्रांनो,

आज तुम्हाला एका महत्त्वपूर्ण अशा वनस्पतीची माहिती सांगणार आहे आणि त्याचे उपाय सांगणार आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन सुखमय आणि सुखकारक बनवाल. मित्रांनो आज आपण पाहतोय की, लोकांचा आयुर्वेदाचा विश्वासू जो आहे सध्या बऱ्याच अंशी वाढायला लागला आहे. कारण ज्या वेळेस आपण पाहतो. जुना काळ पाहिला तर त्यावेळेस बऱ्याच सोयी सुविधा नव्हत्या.

त्या वेळेस सुद्धा जीवन एकदम सुखकारक जगण्यासाठी खूप लोक प्रयत्न करायची आणि ती म्हणजे आयुर्वेदाच्या साहाय्याने, तर मित्रांनो आजची जीऔषधी वनस्पती आहे ती औषधी वनस्पती आहे दिव्य औषधी वनस्पती अशी आहे त्याचं नाव आहे अपराजिता. त्यालाच गोकर्ण म्हणतो काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत. विष्णुकांता या नावाने सुद्धा ओळखला जातो. त्याचा शास्त्रीय नाव क्लीटोरिया टर्नटी आहे.

फुलाचा आकार गाईच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण नाव पडलं. गोकर्णाच्या फुलाचा रंग गडद निळा असतो. फिकट गुलाबी सफेद या रंगाची फुल आढळतात. गर्द हिरव्या पानात ही फुले उठून दिसतात. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात फुले काय अक्षरशा बहर येतो. याच्या कोवळ्या शेंगाची भाजी सुद्धा केली जाते. भाजी एकदम टेस्टी लागते. याचा जर चहा तुम्ही पिला तर तुम्ही सगळे चहा तुम्ही जे पीता आहे ते सगळे चहा याच्यापुढे फिके पडतील.

फक्त एकदा करून बघा याला काही पैसे पडणार नाहीत. त्याचे फक्त दोन चार फुल घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. त्याच्यामध्ये ही फुले चांगली उकळवा ज्यावेळेस त्याचा रंग निळा होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये साखर टाका आणि प्या. वा क्या बात हें असच म्हणाल. एवढा भारी चहा याचा असतो. याला ब्लु टी अस सुद्धा म्हंटल जातं. गोकर्णच वेल आधार घेत वर चढतो. बाल्कनीमधील ग्रीलवर सहज जम बसवतो. पानाचा वापर औषधात केला जातो.

पंचकर्मातपण या वेलीचा वापर केला जातो. का केला जातो? शरीरातील जे काही त्रिदोष आहेत त्या त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी तसेच शरीरातील जे नको असणारे विषारी घटक आहेत ते बाहेर काढण्यासाठी याचा वापर केला जातो. गोकर्णाची फुल, शेंगा, पाने, साल, मूळ या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारावर गोकर्ण हे औषधी आहे.

मित्रांनो थोडा विश्वास ठेवा तसेच त्वचाविकार आणि रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा या गोकर्णाचा वापर केला जातो. गोकर्ण कधीच पराजित होत नसतो म्हणूनच गोकर्णाला अपराजिता असे नाव आहे. याच्या फुलाचा चहा आपण तर पिलाच बनवायचा कसा ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. याला आणखी एक नाव दिले जाते ते म्हणजे बटरफ्लाय टी असंपण म्हटलं जातं. हा कसा चहा बनवायचा ते पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. मित्रांनो हा जो चहा आहे तो का प्यायचा?

तर शरीरातील जे काही विषारी घटक आहेत विषारी पदार्थ आहेत ते बाहेर काढण्यासाठी हा चहा शरीराची आतून सफाई करण्याचे काम करतो. हा चहा एक युमिनिटी बूस्टर म्हणून वापरला जातो. आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्याचं काम हा चहा करत असतो. मित्रांनो शुगर लेव्हल मेंटेन करण्यासाठी सुद्धा हा अतिशय फायदेशीर आहे. हा चहा चेहऱ्यावरचे डाग दब्बे, सुरकुत्या या कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला कसलाही थकवा आलेला असेल थकवा तुमचा घालवायचा असेल काही सेकंदांमध्ये तर हा बटरफ्लाय ती तुम्ही आवश्यक प्या.

थकवा तुमचा दोन मिनिटाच्या आत जाणार म्हणजे जाणार. एकदा करून बघा फक्त आणि एकदा पिऊन बघा आणि मग आमच्या वायरल मराठी या पेजवर कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. एवढा एकदम बेस्ट असा चहा, या चहा एवढा तुमचा कोणताच चहा बेस्ट नसतो. फक्त एकदा करून बघा तुमचा थकवा दूर करण्याचं काम जबरदस्त करत असतो. ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे अशा लोकांनी याची जी काही पान आहेत या पानांचा लेप जर तुमच्या कपाळावर जर लावला तर तुमचा मायग्रेनचा त्रास जो आहे तो नक्कीच कमी व्हायला मदत होते.

मायग्रेन पेन जो आहे त्या मायग्रेन पेनविषयी जी काही माहिती आहे ती माहिती रत्नावली नावाचा जो काही आयुर्वेदिक ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये याचं वर्णन करण्यात आलेला आहे. तुमचं जर अर्ध डोक दुखत असेल तर काय करायचं? या गोकर्णाची किंवा या अपराजिताची मूळ काढायची, मुळाची पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट डोक्यावर हळुवारपणे लावायची तुमचा मायग्रेन जो आहे तो मायग्रेन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

मित्रांनो त्या रत्नावली ग्रंथामध्ये त्याचं वर्णन असं पण आलेला आहे की, जर ताप येत असेल तर या मुळीची तुकडे करून या मुळीची माळ गळ्यात बांधायची. माळ गळ्यात बांधल्यानंतर ताप जातो हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे मित्रांनो पण असे सांगितले गेलेले आहे. मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही ताप कमी करण्यासाठी अ त्यं त उपयुक्त अशी गोष्ट आहे. खोकला लागल्यास काय करायचं मीर घ्यायचं आहे.

1 मीरा घ्यायचा आणि तुळशीची पानं घ्यायची दोन ते चार आणि अपराजिताच 1 से.मी. मूळ घ्यायचं हे सर्व एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायचं उकळून घ्यायचं आणि अर्धा क्लास करायचा आणि प्यायचं. एकदाच करायचं जास्त वेळ करायची गरज नाही याच्यामध्ये तुमचा खोकला बरा होऊन जाईल. ज्यांना टॉनसेन आहे अशा लोकांनी काय करायचं अपराजिताची पान आणि पेरूची पाने घेऊन काय करायचं उकलायचं आणि हे दोन्ही उकळून काय करायचं गुळण्या करायचं.

गुळण्या केल्यानंतर काय होईल तुमचं जे काही टॉनसिल आहे ते टॉनसिल कमी होयला मदत होईल. नंतर अपराजिताच काय करायचे तुम्हाला पिऊ वाटत नसेल, एखाद्याला कसं होतीय एखादे औषध पानाचा रस वगैरे पिऊ वाटत नाही मग त्याने काय करायचं अपराजिताच्या पानांची पेस्ट बनवायची आणि ती बाहेरून लावायची गळ्याच्या बाहेर लावायची. त्यामुळे तुमचं टॉनसिलचा जो त्रास आहे तो कमी होईल.

नंतर अर्थोराईटसाठी सुद्धा या पानांची पेस्ट बनवायची. ज्याठिकाणी दुखतंय त्याठिकाणी जर लावला तर खूप फरक पडत असतो. अशा अनेक अपराजिताच्या फुलाच्या, वेलीच्या, पानांच्या आणि मुळांच्या औषधी गुणधर्म आहेत. याचा तुम्ही अवश्य वापर करून पहा तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *