साखरेऐवजी करा गुळाचे सेवन; इतके चमत्कारी फायदे होतील कि तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक पदार्थ बनवताना त्या पदार्थांमध्ये साखरेचा वापर करत असतो.साखरे शिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे असे म्हणत असतो परंतु साखर ही आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. साखरे ला पांढरे विष असे संबोधले जाते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशी एक माहिती जाणून घेणार आहोत, त्या माहितीच्या आधारे आपण आपल्या जीवनाला वाचणार आहोत त्यासाठी आपण एक पदार्थ वापरणार आहोत तो पदार्थ म्हणजे गूळ.
गूळ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते त्याचबरोबर आपण साखरेचे सेवन करतो अशा वेळी आपल्या शरीरामध्ये आम्ल निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होते परंतु नियमितपणे सेवन केले तर आपल्या शरीरामध्ये आम्लाची निर्मिती होत नाही त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये गुळाला अमृत मानले गेलेले आहे.
गुळामध्ये असे काही महत्त्वाचे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी ठरतात म्हणूनच जेवण झाल्यानंतर दहा ते पंधरा वीस मिनिटात झाल्यावर थोडातरी गुळ खाणे महत्त्वाचे मानले जाते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण गुळा विषय अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घ्याव्यात त्याबद्दल.
गुळ हे आपल्या शरीरासाठी वरदान मानले गेले आहे. गुळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील पचनक्रिया चांगली राहते त्याचबरोबर अन्न पचण्यासाठी सुद्धा लवकर मदत होते त्याच तुलनेमध्ये साखर खाल्ल्याने आपल्या शरीरात अन्न लवकर पचत नाही. पुरुषांपेक्षा स्त्रिया आपल्या त्वचेची अति प्रमाणामध्ये काळजी घेत असतात म्हणूनच आपल्याला साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा आहे.
गुळामध्ये असे काही घटक उपलब्ध असतात जी आपल्या शरीरातील टॉक्सिक म्हणजे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात परिणामी आपल्या शरीरावर व त्वचेवर, चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचे काळे डाग ,पिंपल्स राहत नाही. गुळाचे सेवन केल्याने आपले रक्त शुद्ध होते व आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ राहण्यास मदत होत असते.
नियमितपणे गूळ खाल्ल्याने आपल्या शरीराला कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये मिळते त्याचबरोबर गुळामध्ये फॉस्फरस सुद्धा उपलब्ध असते त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत असतात उलट साखरेमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण असते पण फॉस्फरस चे प्रमाण अजिबात नसते कारण की साखर बनवताना चे तापमान उच्च असते अशा वेळी फास्फोरस पूर्णपणे निघून जाते आणि यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरातील हाडांवर सुद्धा होतो.
जर आपल्याला हाडे मजबूत बनवायचे असतील तर नियमितपणे गुळाचे सेवन करायला पाहिजे. जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल शरीरांमध्ये भरपूर प्रमाणात उष्णता निर्माण झाली असेल किंवा मूत्राशयात संदर्भात एखादी समस्या तुम्हाला त्रास देत असेल तर अशावेळी जर तुम्ही गुळ खाल्ला तर काही तासांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल.
अनेकांना ल’घ’वी होताना आग होत असते, लघवी थांबून थांबून राहते, अशा वेळी डॉक्टरसुद्धा गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो त्याच बरोबर जर आपण रात्री झोपताना गुळा सोबत दूध प्यायले तर आपले शरीर पूर्णपणे चांगले राहते व आपल्याला कोणत्याच प्रकारचा त्रास या संदर्भातील आजार उद्भवत नाही.
गूळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील दुर्बलता म्हणजेच अशक्तपणा सुद्धा दूर होतो. जर आपण चणे खाताखाता गुळ सुद्धा त्यामध्ये मिसळून खाल्ले तर आपल्या शरीरातील अशक्तपणा पूर्णपणे निघून जातो आणि आपल्या शरीरातील मांसपेशी मजबूत बनतात. जर आपल्याला वारंवार उचकी लागत असेल तर अशावेळी गुळ नेहमी खा त्याच बरोबर थोडेसे सुंठ सुद्धा जेणेकरून तुमची उचकी थांबेल.
अनेकांना मायग्रेन म्हणजे अर्धशिशीचा त्रास होतो अशा वेळीसुद्धा गूळ रामबाण उपाय ठरतो. मायग्रेनचा समस्येवर जर आपण गूळ आणि तूप यांचा एकत्रित पणे उपाय केला तर आपली समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते. आपलीच स्मरण शक्ती मजबूत बनवण्यासाठी तसेच बुद्धी तल्लख राहण्यासाठी जर आपण गाजरचा हलवा मध्ये गूळ टाकून खाल्ला तर आपली स्मरणशक्ती मजबूत बनते.
जर आपल्याला सर्दी-खोकला-ताप छातीमध्ये कफ झाला असेल तर अशा वेळी आपण गूळ ,काळी मिरी व दालचिनी यांचा काढा बनवून पिऊ शकतो त्याचबरोबर गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असल्याने आपल्या छातीतील कफ पातळ होण्यासाठी मदत होतो आणि यामुळे आपल्याला कोणत्याच प्रकारचा श्वास संदर्भातील आजार होत नाही आणि सध्याच्या दिवसांमध्ये आपले फुप्फुसे नियंत्रणामध्ये राहणे अतिशय गरजेचे आहे म्हणून सध्याच्या दिवसांमध्ये गूळ हा अतिशय महत्त्वाचा ठरत आहे.
जर तुम्हाला दमा असेल तर अशावेळी दमा दूर करण्यासाठी गूळ लाभदायी ठरतो त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह उपलब्ध असल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी गूळ मदत करतो आणि एनिमिया सारख्या आजारावर पासून आपले संरक्षण करतो म्हणूनच नियमितपणे आपल्या आहारामध्ये गूळ समाविष्ट करा आणि आपले आरोग्य जपा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.