या हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप कफ होणारच नाही, हे ‘४ सुपर फुड्स’ आजच खायला सुरु करा.!

या हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप कफ होणारच नाही, हे ‘४ सुपर फुड्स’ आजच खायला सुरु करा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये गारवा पसरलेला असतो. या वातावरणामध्ये आपल्यापैकी अनेकांना सर्दी ,खोकला, ताप, छातीमध्ये कफ साचणे यासारख्या समस्या उद्भवत असतात परंतु जर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपल्याला कोणत्याही वायरल इन्फेक्शन पासून संरक्षण प्राप्त होते आणि म्हणूनच या हंगामात आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे.

यासाठी काही आहार सेवन करणे सुद्धा गरजेचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत. ज्या गोष्टींचे पालन जर आपण केले तर आपल्या शरीराला एक संरक्षक कवच प्राप्त होईल आणि आपल्याला कोणत्याच आजारापासून त्रास होणार नाही चला तर मग जाणून घ्या त्याबद्दल..

या हंगामात अनेक आजार सुद्धा येत असतात. थंड हवामानात खोकला ,सर्दी ,ताप यासारख्या समस्या जास्त प्रमाणात दिसून येत असतात. या वातावरणामध्ये आपल्या शरीराला मजबुती व स्फूर्ती देण्यासाठी काही पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे.जे आपण आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजेत जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती उत्तम राहील. विशेषत लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते त्यांना हिवाळ्यामध्ये हमखास सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या उद्भवत असतात. मुलांसाठी रोग प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या लोकांसाठी काही पदार्थ आम्ही सांगणार आहे ते आपल्या आहारामध्ये अवश्य समाविष्ट केले पाहिजे.

हे पदार्थ विविध आजारांपासून संरक्षण करतील.आपल्या शरीराला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मजबुती प्रदान करण्यासाठी सर्वात पहिला पदार्थ म्हणजे आले. आले हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. आले हे सर्दी ,खोकला यासारखे आजारांमध्ये आराम मिळतो.यामध्ये अँटी ऑक्सीडेंट जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून अश्या वेळी अनेक व्हायरल इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो.

दुसरा पदार्थ आहे तो आहे मध. आपल्या घरामध्ये तर हिवाळ्यामध्ये मध आवश्य असलाच पाहिजे. लहान मुलांमध्ये सुद्धा या दिवसांत व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच आपण मधाचे सेवन सुद्धा केले पाहिजे. मध सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते तसेच खोकला व सर्दी पासून आपली सुटका सुद्धा होते त्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला मजबुती प्रदान करत असतात व आपले आरोग्य चांगले ठेवत असतात.

अनेकदा लहान मुलांना हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला घशामध्ये दुखणे, खवखव होणे यासारख्या समस्या होत असत अशा वेळी जर आपण मध लहान मुलांना चाटायला दिल्यास त्वरित आपल्याला फरक जाणवतो. अशांसाठी आपण आपल्या घरामध्ये मध उपलब्ध करून ठेवला पाहिजे आणि त्यांना दिले पाहिजे. तिसरा पदार्थ आहे लसुन. लसुन चे असे अनेक आपल्या सर्वांना गुणधर्म माहिती आहेत.

हा असा पदार्थ आहे जो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे व आपण अनेक पदार्थांमध्ये लसूणाचा वापर आवर्जून करत असतो लसूणामध्ये अँटी बॅक्टरियल गुणधर्म असतात ते आपल्या शरीराला कोणत्याही वायरल इन्फेक्शन पासून बचाव करतात. आपल्या शरीराचे कार्य व्यवस्थित रित्या पार पाडण्याची शक्ती लसूण मध्ये असते तसेच आपली शरीर व त्वचा यामुळे स्वच्छ होते.चौथा पदार्थ आहे चिकन सूप.

आपल्यापैकी अनेकांना चिकन सूप आवडत असते आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपण चिकन सूप प्यायले तर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते कारण की या दिवसांमध्ये आपले शरीर थंड असते आणि या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते आणि अशा वेळी जर आपण चिकन सूप प्यायले तर आपल्या शरीराला बरे वाटते.

आपण घरच्या घरी सुद्धा हे चिकन सूप बनू शकतो यासाठी काही सामग्री लागते ती सामग्री आपण घरामध्ये सुद्धा उपलब्ध करू शकतो. चिकन सुप प्यायल्याने आपल्या शरीरातील पचन व्यवस्थित होते तसेच असे काही गुणधर्म आपल्या शरीराला प्राप्त होतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते. लहान मुलांना ताप सर्दी खोकला समस्या निर्माण झाल्यावर भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते कारण की लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्तीही अन्य लोकांपेक्षा कमजोर असते आणि म्हणूनच अशा वेळी जर आपण लहान मुलांना चिकन सूप दिले तर आपल्याला फरक जाणवतो. पाचवी गोष्ट आहे दही.

अनेकांना असे वाटते की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये थंडी असते आणि अशा दिवसांमध्ये दही खाल्ली तर आपल्याला सर्दी खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकते परंतु जर तुमच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारची शंका असेल तर ती आत्ताच काढून टाका. दही मध्ये असे काही औषधी गुणधर्मासाठी आपल्या शरीराला आतून संरक्षण कवच प्रदान करत असतात. आपली पचन संस्था चांगली राहते.

पोटात कळा आणि डायरिया मध्ये सुद्धा या पासून आराम मिळत असतो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केळी आवर्जून खायला पाहिजे तसे तर आपण काही अन्य ऋतूमध्ये केळी खातो परंतु या दिवसांमध्ये केळी खाणे अत्यंत लाभदायक मानले जाते. तर तुम्हाला सर्दी झाली असेल तर अशा वेळी सर्दीपासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी काही आवश्यक घटक आपल्याला गरजेचे असतात आणि हे सारे घटक केळी मध्ये उपलब्ध असतात तर ही होते काही महत्त्वाचे पदार्थ जे थंडीच्या दिवसांमध्ये हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला सेवन करायला पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *