दुसऱ्याच्या घरी जाताना चुकूनही या वस्तू भेट म्हणून घेऊन जाऊ नका.!

दुसऱ्याच्या घरी जाताना चुकूनही या वस्तू भेट म्हणून घेऊन जाऊ नका.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो देवाण घेवाण आपण अगदी लहानपणापासूनच बघत आलो आहोत आपल्यावर सुद्धा आपल्या आई वडिलांनी तसेच कुटुंबातील मोठ्या माणसांनी देवाण घेवाण करण्याचे संस्कार केलेले आहेत. मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मित्राकडे जाताना किंवा इतर कोणाकडे जाताना काही तरी गोड धोड अथवा काही भेट वस्तू घेऊन जायची प्रथा आहे.

आपली संस्कृती अस सांगते की कोणाच्या ही घरी जाताना रिक्त हातांनी म्हणजेच रिकाम्या हाताने कधीच जावू नये. जर लहान मुल असतील तर त्यांच्यासाठी काही ना काही खाऊ जर वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्यासाथी फळे नाहितर भेट वस्तू घेऊन जावे. मित्रांनो हिंदू-धर्म शास्त्राआधारे तंत्र मंत्र हे देखील एक शास्त्र आहे आणि या शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला भेटायला जाताना चुकूनही ह्या गोष्टी घेऊन जाऊ नयेत.

एखाद्या नातेवाईकांच्या घरी आपण जर ह्या वस्तू घेऊन गेलो तर त्यांच्या मधले आणि आपल्या मधले संबंध खराब होवू शकतात. मित्रत्वाच रुपांतर शत्रुत्वात होवू शकतं. एखाद्याच्या घरी जाताना पुढिल वस्तू कधीच घेऊन जाऊ नयेत. तंत्र मंत्र शास्त्रानुसार कोणती ही आंबट वस्तू किंवा पदार्थ दुसर्यांच्या घरी घेऊन जाऊ नये या आंबट पदार्थांमध्ये संत्र, मोसंबी, लोणचे, लिंबू, किंवा अगदी लोणचे देखील दुसर्यांच्या घरी जाताना घेऊन जाऊ नये.

तसेच आंबट मिठाई नेणे वर्ज मानले गळे आहे. मित्रांनो या सर्व पदार्थांमध्ये ‘A’C’I’D’ आहे आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की ‘A’C’I’D’ चे काम तोडण्याचे आहे. ज्या वस्तू वर आपण ‘A’C’I’D’ टाकतो ती वस्तू काही क्षणात जळून खाक होते. असे आम्लयुक्त पदार्थ जर आपण एखाद्याच्या घरी घेवून गेलो तर त्यां सोबतचे आपले संबंध तुटू शकतात. काही दिवसांमध्ये आपल्या मैत्री मध्ये शत्रुत्व निर्माण होवू लागते.

मित्रांनो एक-दोन महिन्याच्या कालावधीत काही ना काही करणांनी भांडण होईल. मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही मुली अनेकदा माहेरुन सासरी जाताना लोणचे घेऊन जातात लोणचे हा आम्लयुक्त पदार्थ आहे आणि असा आम्लयुक्त पदार्थ जर आपण माहेरुन सासरी घेऊन जाता तर माहेर आणि सासर यांच्या तील संबंध खराब होवू शकतात.

मित्रांनो तुम्हाला जर काही द्यायचे असेल तर गोड वस्तूंची देवाण घेवाण करा. यां मुळे संबंध मधुर बनतात. तुम्हाला जर तुमच्या एखाद्या शत्रूशी मित्रत्व करायचे असेल किंवा चांगले संबंध बनवायचे असतील तर अश्या वेळी त्या व्यक्तीच्या घरी जाताना गोड पदार्थ घेऊन जा. यांमुळे तुमच्या मधील जे संबंध आहेत ते मधुर होवू लागतील. जर तुम्हाला एखद्याला लिंबू, चिंच, मोसंबी, संत्री अश्या प्रकारची आंबट व्यंजने द्यायची असतील तर त्या आधी काही तरी गोड-धोड भेट वस्तू नक्की द्यावी.

यांमुळे या आंबट पदार्थांचा प्रभाव थोड्या प्रमाणात क होईना पण कमी होईल. सोबतच नेहमी एखाद्याचया घरी जर कोणता कार्यक्रम असेल तर जाताना काळ्या रंगाचे कपडे कधी परिधान करुन जाऊ नये. मित्रांनो काळ्या रंगाचे कपडे हे तंत्र मंत्र शास्त्रानुसार अशुभ व अशांतीचा प्रतीक मानला गेला आहे म्हणूनच कोणाच्या ही घरी कार्यक्रमाला जाताना काळ्या रंगाचा पोशाख शक्यतो टाळावा. त्या ऐवजी तुम्ही सफेद कपडे घातलेत तर तुम्ही त्या कार्यक्रमात सकारात्मक शक्ती घेवून जात आहात तसेच सफेद कपडे हे शुभ आणि शांतीचे प्रतीक मानले जातात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *