लग्न झालेल्या स्त्रीने रात्री चुकूनही करू नका हि ३ कामे; नाहीतर आयुष्यभर पच्छाताप करत बसावे लागेल.!

लग्न झालेल्या स्त्रीने रात्री चुकूनही करू नका हि ३ कामे; नाहीतर आयुष्यभर पच्छाताप करत बसावे लागेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार संध्याकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर ही वेळ दिवसाची सुद्धा नसते तर रात्रीचे सुद्धा नसते. दिवस व रात्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा संध्याकाळी असे म्हणतात. संध्याकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची असते त्याचबरोबर आता महालक्ष्मीच्या आगमनाची सुद्धा ही वेळ ठरलेली असते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की, माता महालक्ष्मी प्रसन्न करायचे असेल तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

संध्याकाळच्या वेळी पूजेशिवाय अशी काही कामे आहेत ते आपल्याला चुकून सुद्धा करायचे नाही अन्यथा माता महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नाराज होते. जर माता महालक्ष्मीची अवकृपा आपल्यावर झाली तर राजासुद्धा भिकारी होण्यास वेळ लागत नाही.या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या आपल्याला संध्याकाळच्या वेळेला चुकून सुद्धा करायचा नाही.

संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये कधीच झाडू मारू नये. संध्याकाळची वेळ ही माता महालक्ष्मी च्या आगमनाची वेळ असते आणि जर आपण संध्याकाळच्या वेळी घरामध्ये झाडू मारू लागलो तर अशामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये दारिद्रता निर्माण होऊ लागते. असे केले तर आपल्या घरातून माता महालक्ष्मी नाराज होऊन निघून जाते.

तुळशीला नेहमी तुपाचा दिवा लावायला पाहिजे परंतु संध्याकाळी तुळशीला कधीच जल अर्पण करू नये. सकाळी तुळशीला दिवा जरूर लावावा परंतु संध्याकाळी तुळशीला पाणी अर्पण करू नये त्याच बरोबर तुळशीचे पाने सुद्धा संध्याकाळच्या वेळी तोडू नये. तुळशीला जल अर्पण करण्याची योग्य वेळ सकाळी मानलेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेला माता महालक्ष्मी आपल्या घरी आगमन करत असते त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला अजिबात झोपू नये. जर आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती व वृद्ध व्यक्ती असेल तर या व्यक्तीने सुद्धा संध्याकाळच्या वेळेला थोडेसे उठून बसावे व त्यानंतर झोपले तरी चालेल.

ज्या घरातील व्यक्ती संध्याकाळी झोपलेले असतात अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही त्याच बरोबर संध्याकाळी झोप घेणे हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक मानले जाते. क्रोध करणे हे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे आपल्या घरातील वातावरण भंग पावते आणि घरातील शांतता निघून जाते व त्याच बरोबर सदस्यांमध्ये कलह सुद्धा निर्माण होतो.

ज्या घरामध्ये नेहमी भांडण क्लेश होत असतात अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी चुकून सुद्धा प्रवेश करत नाही. संध्याकाळच्या वेळेला पती-पत्नी संबंध ठेवू नये त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये अतिशय धार्मिक व पवित्र वातावरण असायला हवे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्या घरांमध्ये स्त्रियांची निंदा केली जाते असे घर वाईट घर मानले जाते.

ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान केला जातो त्यांना वाईट-साईट बोलले जाते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणून आपल्या घरातील स्त्रियांना नेहमी सन्मानाने वागायला पाहिजे कारण की आपल्या घरातील स्त्रिया हे माता महालक्ष्मीचे प्रतिरूप असतात आणि जर आपण आपल्या घरातील स्त्रियांचा अपमान केला तर साक्षात माता महालक्ष्मीचा अपमान केला असे मानले जाते.

स्त्रियांच्या अपमानाला महापाप असे म्हटले जाते आणि जे पुरुष स्त्रियांचा अपमान करतात त्यांना माता महालक्ष्मी कधीच सुखी ठेवत नाही त्यांच्यावर नेहमी काही ना काही संकट येत राहते त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात म्हणून जर तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचे अडथळे येऊ नयेत आपले जीवन नेहमी सुखाने समृद्धीने भरलेले असावे तर चुकून सुद्धा कोणत्या ही महिलेचा अपमान भविष्यात करू नका. इतरांबद्दल वाईट बोलणे निंदा करणे हे अत्यंत चुकीचे आहे असे केल्याने आपल्याला प्रत्यक्ष काही फायदा तर होत नाही परंतु जर आपण संध्याकाळच्या वेळेला एखाद्या व्यक्तीचे निंदा केली तर आपल्याला भविष्यात समाजामध्ये मानसन्मान मिळत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *