डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असा स्वभाव या 4 राशींचा
नमस्कार मित्रांनो,
वायरल मराठी या फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे. आपल्यापैकी काही जणांना परिस्थिती कशीही असो संयमाने काम करता येत. अनेक वेळा त्यांची सवय आपल्याला आश्चर्यचकित करते. कठीण प्रसंगातही हे स्वतःला शांत कसे घेऊ शकतात असा प्रश्नही आपल्याला पडतो.
काहीही झालं तरी आपला संयम कसा गमवायचा नाही हे देखील अशा लोकांकडून आपण शिकू शकतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अशा काही राशी आहेत ज्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असते चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.
1) कर्क रास – कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि त्यामुळे चंद्राची शीतलता या राशीच्या स्वभावात असते आणि म्हणूनच परिस्थिती कशी पण असो डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून या व्यक्ती काम करतात. प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. तसा या राशीचा स्वभाव मुळातच कोमल, हळवा आणि प्रेमळ असतो.
2) मीन रास – या राशीची लोक शांतपणे काम करतात. कोणाच्याही कामामध्ये व्यतेय आणत नाहीत. या राशीचा स्वामी गुरु आहे आणि त्यामुळेच या राशीचा स्वभाव मुळातच प्रेमळ दयाळू आणि परोपकारी असतो.
कितीही राग आला तरी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवूनच या व्यक्ती काम करतात. त्यांचं मन निष्कप्ट असते. या व्यक्ती कठीण प्रसंगाला सुद्धा या शांततेने त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात.
3) धनु रास – तसे तर या राशीची लोक खूप रागीट स्वभावाची असतात. परंतु या राशीचे लोक देखील अतिशय शांत स्वभावाचे असतात. ते त्यांचा राग योग्य वेळीच व्यक्त करतात. ते त्यांच्या भावना शक्यतो लपवून ठेवतात.
धनु राशीचे लोक नेहमी काहीही न झाल्याचा आव आणण्याचा प्रयत्न करतात. धनु राशीचे लोक इतरांनाही शांत करण्यास मदत करतात. यासाठी ते लोकांना अनेकदा सल्लाही देतात.
4) तूळ रास – तूळ राशीच्या लोकांचा स्वभाव समतोल राखणारा असतो. या राशीचे लोक लोकांवर अन्याय होताना पाहू शकत नाही. त्या गोष्टीची त्यांना प्रचंड चीड येते. परंतु तरीही प्रत्येक परिस्थितीत शांत राहून योग्य तोच निर्णय घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.