छातीत दुखणे, भरलेली छाती, चोंदलेले नाक यासारख्या समस्यांवर झटपट आराम मिळेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण घेतो ती हवा खरच शुद्ध असते का ? अन्ना, हवा ,पाणी ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि यांच्या शिवाय माणूस कदाफि जगू शकत नाही हो अन्न आणि पाणी नाही मिळाले तरी ही माणूस नऊ दिवस जगू शकतो परंतू जर त्याला हवा मिळाली नाही तर तो क्षणभर ही जिवंत राहू शकत नाही हो पण वाढत्या प्रदूषणामुळे हवा दूषित झाली आहे आणि ही दूषित हवा जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा आपले आरोग्य बिघडते.
आपल्या फुफुसांना त्रास होतो आणि तसेच छातीचे त्रास होतात छातीत दुखणे हा आज कालची समान्य समस्या बनली आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आमच्या या लेखात असा एक घरगुती उपाचार सांगणार आहोत जो केल्यावर तुमच्या छातीचे तसेच श्वसनाचे सर्व आजार दूर होतील होय तुम्ही सुद्धा हा घरगुती उपाय वाचून आश्चर्य चकित होवून जाल चला तर जाणून घेवूया नक्की काय आहे हा रामबाण उपाय.?
मित्रांनो हा उपाय तर तसा जुनाच आहे फक्त मानवाच्या राहणीमानात बदल होत गेला आणि हा उपाय इतिहासात कुठे तरी कैद होवून राहिला. आपली आजी-पणजी जेव्हा डॉक्टर दवाखाने नव्हते तेव्हा हा उपाय वापरुनच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायचे. मित्रांनो आम्ही तुम्हाला एका पुरचुंडी बद्द्ल सांगणार आहोत. ती कशी बनवावी त्या मध्ये आपल्या घरातील कोणते घटक किती प्रमाणात टाकवेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख अगदी शेवट पर्यंत वाचा.
मित्रांनो ही पुरचुंडी बनवण्यासाठी सर्व प्रथम भारतीय स्वयंपाकघरात अगदी आरामात मिळणार ओवा घ्या होय ओव्याला अजवाईन सुद्धा म्हणतात. ओवा अतिशय गरम असतो याच्या वापरणे चोंदलेले नाक साफ होते तसेच ओवा खाल्याने देखील कफ नाहिसा होतो मात्र ज्यांना मुळव्याधाचा त्रास आहे त्यांनी ओवा खावू नये मुख्य:ता ज्यांना रक्ती-मुळव्याध आहे त्यांनी ओव्या पासून दूरच रहावे शिवाय गरोदर बायकांनी सुद्धा ओव्याचे सेवन करु नये.
मित्रांनो आपण दोन चमचे ओवा हाताने चुरगळून घ्यायचा आहे ओवा अश्या प्रकारे चुरगळल्यामुळे ओव्याचा सुगंध अजून वाढतो ओव्याच्या फक्त वासाने चोंदलेले नाक साफ होते. त्यानंतरच घटक म्हणजे कापूर कापूर सुद्धा एक आयुर्वेदीक औषधी आहे जर दाढ दुखत असेल त्यावर कापूर ठेवल्यास तिचे दुखणे कमी होते. बाजारात दोन प्रकारचे कापूर मिळतात एक साधा कपूर आणि दुसरा भीमसेन कापूर आपण भीमसेन कापूर वापरायचा आहे.
हा कापूर किराणा मालाच्या दुकानात उपलब्ध होतो. कापराच्या अगदी वासाने आपली ऑक्सीजन लेवल वाढण्यास सुरवात होते. आता कापराचे दोन तुकडे बोटांच्या मदतीने बारीक करुन ओव्यामध्ये टाका हे दोन्ही पदार्थ आता एका रुमालात घट्ट बांधून त्याची पुरचुंडी बनवा. त्यानंतर तवा घ्या आणि आपल्याला सोसवेल एवढ्या तापमानावर गरम करा आणि तुम्ही बनवलेली पुरचुंडी आता या तव्यावर गरम करा आणि याने आपल्या पाठीवर, छातीवर आणि कपळावर शेक द्यायचा आहे मात्र लहान मुलांना शेक देताना पुरचुंडीच्या तापमानाचा अंदाज घेवूनच मग द्यावा.
हा उपाय शक्यतो रात्रीच करावा त्यामुळे तुम्हाला झोप सुद्धा निवांत लागेल. ज्यांना सर्दीचा त्रास आणि जे या आजाराला अगदी कंटाळले आहेत रात्री झोपण्यास ज्याना खूप त्रास होतो त्यांनी हा उपचार नक्की करुन पहा. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरातील सामग्री वापरुन छोटे-मोठे विकार अगदी आरामात बरे करु शकता शिवाय या संक्रमणाच्या काळात घरच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. म्हणूनच आम्ही सांगितलेला उपाय करुन आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. घरी रहा सुरक्षित रहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.