चुकूनही या तीन गोष्टी खरेदी करू नका; अन्यथा घरामध्ये येईल कायमची गरिबी.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंगळ ग्रहाचा प्रभाव ज्या दिवशी मोठ्या प्रमाणावर असतो तो वार म्हणजे मंगळवार. या दिवशी लोक मोठ्या प्रमाणावर बजरंगबली यांची आराधना करत असतात. संध्याकाळी बजरंगबली यांच्या मंदिरात दिवा प्रज्वलित करतात त्यांना भक्तीभावाने अर्पण करतात. या दिवशी विशेष पूजा केल्याने आपल्या घरातील आजारपण ,बाधा संपूर्णपणे नष्ट होते.
मंगळवारच्या दिवशी मंगळ ग्रहाचा या वारावर खूप मोठा प्रभाव असतो म्हणून या दिवशीच काही कामे कटाक्षाने टाळायला हवे तसेच काही शुभकाम केल्याने या दिवशी तसा लाभ सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया मंगळवारी कोणती कामे आपल्याला करायला पाहिजेत व कोणती कामे कटाक्षाने टाळायला हवी. सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे या दिवशी कोणालाही चुकूनही पैसे उधार देऊ नका.
उधार दिलेले पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्ज म्हणून पैसे देणार असाल तर मंगळवार या कामास अशुभ ठरतो उलट जर तुम्ही कर्ज मुक्त करू इच्छित असाल तर मंगळवारचा दिवस हा शुभ असतो म्हणूनच या दिवशी जर तुम्ही कर्ज फेडत असावीत असे केल्याने तुमच्या डोक्यावरील कर्ज लवकर दूर होते. धर्मशास्त्रात मंगळवारच्या दिवशी पुरुषांनी दाढी करू नये असे मानले जाते यामुळे मंगळ दोष लागू शकतो.
मंगळवारच्या दिवशी विवाहित महिलांनी शृंगार चे सामान विकत घेऊ नये. असे म्हणतात की या दिवशी शृंगाराचे सामान विकत घेतले तर वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. पती पत्नी मधील प्रेम संबंध कमी होतात. नात्यांमध्ये वैर सूडाची भावना निर्माण होते. शृंगाराचे सामान आपण शुक्रवारी किंवा सोमवारी विकत घेऊ शकतो हे दिवस या पद्धतीचे सामान विकत घेण्यासाठी शुभ मानले गेले आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या बाधा निर्माण होत आहेत आणि विशेष करून त्यांच्या कुंडली मध्ये मंगळ दोष आहे अशा व्यक्तीने मंगळवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यसन तसेच मांस , अ’ल्को’होलचे सेवन करू नये.
मंगळवारच्या दिवशी उडीद डाळीचे सेवन करू नये यादिवशी उडीद डाळीचे सेवन केल्यामुळे मंगळ व शनि देव यांचा संयोग होऊन त्याचा विपरीत परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. मंगळवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. ते अशुभ मानले जाते. मंगळवारी मंगळ ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता यामुळे मंगळ दोषाचा प्रभाव सुद्धा कमी होतो. मंगळवारच्या दिवशी मोठ्या भाव व बहीण यांच्याशी भांडण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये वाईट घटना घडू लागतात आणि जीवन कष्टमय बनू लागते.
जर तुम्हाला अतिशय महत्वाच्या कामासाठी जर घराच्या बाहेर पडायचे असेल किंवा त्या कामासाठीच प्रवास करायचा असेल तर उत्तर वायव्य दिशेला चुकुनी प्रवास करू नका यामुळे ते काम यशस्वी होण्याची शक्यता नसते त्याच बरोबर उत्तर दिशेला सुद्धा प्रवास करू नये. जबाबदार महत्वाचे काम असेल तर तोंडामध्ये थोडासा गूळ टाकून मगच बाहेर पडा त्यामुळे आपल्या कार्यातील बाधा व विघ्न दूर होतील. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये संकटे येत असतील त्याच बरोबर मंगळवारच्या दिवशी तेव्हा कोणत्याही पद्धतीने लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नका कारण की लोखंड वस्तुंवर शनी देव यांचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम व प्रभाव असतो.
म्हणून मंगळवारच्या दिवशी शुक्र ग्रहावर प्रभाव निर्माण करणाऱ्या तसेच शनी ग्रहावर प्रभाव निर्माण करणाऱ्या वस्तू विकत घेऊ नये. मंगळवारच्या दिवशी एक महत्त्वाचा असा उपाय तुम्ही करू शकता त्यादिवशी हनुमान मंदिरांमध्ये जाऊन मोगऱ्याचे तेल किंवा मोहरीचे तेल यामधील २ लवंग टाकून तसेच २ लवंग हनुमान यांच्या चरणी वाहिल्याने तसेच अकरा वेळा हनुमान चालीसाचे पठण केल्याने तुमच्या आयुष्यातील मोठे संकट लवकरच दूर होईल आणि तुमच्या आयुष्य सुखाने समृद्धीने भरून निघेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.